शेतकऱ्यांनो, सेंद्रिय शेतीकडे वळा ः राहिबाई पोपेरे

परभणी :रासायानिक खते, कीटकनाशकांच्या अतिरेकी वापरामुळे आरोग्यावर परिणाम होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे. नैसर्गिक पध्दतीने भाजीपाला, अन्नधान्यांचे उत्‍पादन घ्यावे,’’ असे आवाहन बीजमाता राहिबाई पोपेरे यांनी केले.
 Farmers, turn to organic farming: Rahibai Popere
Farmers, turn to organic farming: Rahibai Popere

परभणी : ‘‘अनेक पिकांचे देशी वाण मानवासाठी आरोग्‍यदायी आहेत. देशी वाणांच्या बियाण्यांचे नैसर्गिकरित्या जतन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी महिला, प्रगतिशील शेतकऱ्यांनी प्रयत्न करावे. रासायानिक खते, कीटकनाशकांच्या अतिरेकी वापरामुळे आरोग्यावर परिणाम होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे. नैसर्गिक पध्दतीने भाजीपाला, अन्नधान्यांचे उत्‍पादन घ्यावे,’’ असे आवाहन बीजमाता राहिबाई पोपेरे यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप), सेंटर ऑफ एक्सलन्स उत्पादकता वाढीकरता यंत्रमानव, ड्रोन आणि स्वयंचलित यंत्राद्वारे शेती प्रकल्पा‍तर्फे ‘डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शेतकरी महिलांची आत्‍मनिर्भरता’ यावर सोमवार (ता. ६) ते शुक्रवार (ता. १०) या कालावधीत आयोजित राज्यस्तरीय वेबिनारचे उद्‌घाटन सोमवारी (ता. ६) झाले.

कुलगुरू डॉ. अशोक ढवण, पुणे येथील अटरी संस्‍थेचे संचालक डॉ. लखनसिंग, दौंड येथील अंबिका मसालेच्‍या संचालिका कमल परदेशी, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, सामुदाय विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या जयश्री झेंड, डॉ. गोपाल शिंदे आदी उपस्थित होते. 

डॉ. ढवण म्‍हणाले, ‘‘शेतकरी महिलांचे काबाडकष्ट कमी करून त्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी विद्यापीठ प्रयत्‍नशील आहे. विद्यापीठाने शेतकरी महिलांसाठी उपयुक्‍त तंत्रज्ञान विकसित केले आहे. शेतकऱ्यांनी शेतमाल ऑनलाइन मार्केटिंगद्वारे थेट ग्राहकांना विकावे.’’

परदेशी यांनी महिलांना उद्योग व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी केलेल्या उपाययोजना सांगितल्या. डॉ. गोदावरी पवार यांनी प्रास्‍ताविक केले. डॉ. विना भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. तर, डॉ. मेघा जगताप यांनी आभार मानले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com