agriculture news in marathi, Farmers Union from country announces new political party | Page 2 ||| Agrowon

देशभरातील शेतकरी संघटनांचा स्वतंत्र राजकीय पक्ष
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 डिसेंबर 2017

राष्ट्रीय किसान परिषदेच्या समारोपप्रसंगी
रघुनाथदादा पाटील यांची पुण्यात घोषणा

पुणे : देशभरातील शेतकरी संघटना नविन राजकीय पक्ष काढणार. नवी दिल्लीत घोषणा करणार, अशी घोषणा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांची राष्ट्रीय किसान परिषदेच्या समारोप प्रसंगी मंगळवारी (ता. १२) येथे केली. तसेच, देशभरातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या हक्कासाठी देशभर आंदोलन छेडणार असल्याचे श्री. पाटील यांनी जाहीर केले.

राष्ट्रीय किसान परिषदेच्या समारोपप्रसंगी
रघुनाथदादा पाटील यांची पुण्यात घोषणा

पुणे : देशभरातील शेतकरी संघटना नविन राजकीय पक्ष काढणार. नवी दिल्लीत घोषणा करणार, अशी घोषणा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांची राष्ट्रीय किसान परिषदेच्या समारोप प्रसंगी मंगळवारी (ता. १२) येथे केली. तसेच, देशभरातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या हक्कासाठी देशभर आंदोलन छेडणार असल्याचे श्री. पाटील यांनी जाहीर केले.

‘शेतकरी संघटने’तर्फे आयोजित ‘राष्ट्रीय किसान परिषदे’च्या समारोपप्रसंगी पाटील बोलत होते. परिषदेचा समारोप शनिवारवाड्यावर सभेने झाला. हुतात्मा बाबू गेनू आणि शरद जोशी यांच्या स्मरणार्थ ही परिषद घेण्यात आली. लालबहादूर शास्त्री यांचे नातू संजयनाथ सिंग, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, कर्नल सुरेश पाटील (निवृत्त), शेतकरी नेते लीलाधर राजपूत, समशेरसिंग दहिया, किशोर ढमाले, गणेश जगताप, सुश्‍मिता सोरेन, बलविंदरसिंग बाजवा असे २२ राज्यांतील शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. 

यानिमित्ताने नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहापासून शनिवारवाड्यापर्यंत मोर्चा काढला. यात बैलगाडी आणि ट्रॅक्‍टरसह शेतकरी सहभागी झाले होते. हातात मशाल घेऊन आणि हलगी वाजवत शेतकऱ्यांनी आपले विविध प्रश्‍न मांडले. शनिवारवाड्यात झालेल्या सभेत शेतकऱ्यांना पाठविलेल्या नोटिसांची आणि वीज बिलांची होळी करण्यात आली. 

श्री. पाटील म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या अवस्थेला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. स्वतःची ‘मन की बात’ रेडिओवर बोलण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा शेतकऱ्यांची ‘दिल की बात’ ओळखली पाहिजे. शेतकऱ्यांच्या ‘मन की बात’ मोदी ओळखत नाही, तोपर्यंत ‘अच्छे दिन’ येणार नाहीत.’’
पाटील म्हणाले, ‘‘सर्वांगीण शिक्षण, सक्षम कायदे आणि शेतीला मुबलक पाणी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. त्यासाठी पुण्यातील तरुण उपोषणही करणार आहेत. सरकारचा मनमानी कारभार खपवून घेणार नाही.’’

इतर अॅग्रो विशेष
शेतकरी कंपन्यांकडून हमीभावाने खरेदीची...पुणे : किमान हमीभाव खरेदीच्या कार्यक्रमात शेतकरी...
राज्यात उद्यापासून पावसाची शक्यतापुणे : राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत असल्याने...
राज्यात नवे जलधोरणपुणे : राज्याच्या जुनाट जलधोरणाला अखेर मूठमाती...
कृषी विभाग उभारणार गाव पातळीवर शेतकरी...नागपूर ः ग्रामपंचायत कार्यालयात कृषी सहायकांकरिता...
अनुदान अर्जांना १०० टक्के पूर्वसंमती...पुणे : कृषी विभागाच्या विविध योजनांमधील...
गुरुवारपासून पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशी विश्रांती घेतल्यानंतर अरबी...
कीडनाशके विक्री पात्रतेचा तिढा सुटलापुणे : देशात कीडनाशके विक्रीसाठी शैक्षणिक...
‘अमूल’कडून राज्यात कडवे आव्हानपुणे : राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत...
मॉन्सूनचा मुक्काम लांबणारपुणे : निम्मा सप्टेंबर उलटूनही परतीच्या...
अकोला जिल्ह्यात हजारो हेक्टर शेती नापेरअकोला ः अनियमित पावसाचा यंदा खरिपाला मोठा फटका...
नाशवंत शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी...पुणे : राज्यातील नाशवंत शेतमालाचे काढणीपश्‍चात...
शेतमाल प्रक्रिया उद्योगातून मिळाला...नांदेड जिल्ह्यातील बहाद्दरपुरा (ता. कंधार) येथील...
कुक्कुटपालनातून मिळाली स्वयंपूर्णतापरिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन वळके...
अंगावर काटा येणारच!देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मधुरेमध्ये दाखल...
कामाच्या दर्जात तडजोड न स्वीकारणारा...सर विश्वेश्वरय्या यांच्या कामाची मुहूर्तमेढ धुळे...
कांदा दरवाढीचा कल कायम राहणारपुणे : केंद्र सरकारकृत एमएमटीसी या ट्रेडिंग...
साखर निर्यातीची अधिसूचना अखेर जारीपुणे : देशातील भरमसाठ साखरेचा साठा बघता ६० लाख टन...
जोर काहीसा ओसरला; मंगळवारपासून पावसाची...पुणे : राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर काहीसा...
पूरस्थितीवर मात करण्यासाठी शाश्वत...मुंबई: जागतिक बँक आणि एडीबी (एशियन डेव्हलपमेंट...
दरवर्षी १०० गावे आदर्श करणार ः...पुणे  : राज्याच्या ग्रामविकासाला आदर्श गाव...