agriculture news in marathi, farmers union leader under police obeservation | Agrowon

शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांची नजर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 एप्रिल 2019

नाशिक : शेतकरी आंदोलनाचा केंद्रबिंदू राहिलेल्या नाशिक जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आज (ता.२२) येथे होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दूरध्वनी वरून नजरकैदेत राहण्यासंदर्भात सूचना केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी, नाशिक व धुळे येथील उमेदवारांच्या प्रचारार्थ पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान मोदी यांची आज सकाळी ९ वाजता पिंपळगाव बसवंत येथे प्रचारसभा होत आहे. या सभेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, या यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. 

नाशिक : शेतकरी आंदोलनाचा केंद्रबिंदू राहिलेल्या नाशिक जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आज (ता.२२) येथे होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दूरध्वनी वरून नजरकैदेत राहण्यासंदर्भात सूचना केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी, नाशिक व धुळे येथील उमेदवारांच्या प्रचारार्थ पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान मोदी यांची आज सकाळी ९ वाजता पिंपळगाव बसवंत येथे प्रचारसभा होत आहे. या सभेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, या यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. 

शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व आंदोलक शेतकरी यांना नजरकैदेत राहण्याच्याबाबत संपर्क साधला आहे. नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शेतकऱ्यांना पोलिसांकडून शेतकऱ्यांना दूरध्वनी गेले असून लवकरात लवकर ताब्यात राहण्याबाबत सांगण्यात आले. 

नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आंदोलक, मराठा आरक्षण आंदोलन, समृद्धी महामार्ग संघर्ष समिती आंदोलनातील दाखल कोणतेही गुन्हे मागे घेतले नाहीत. मुख्यमंत्री घोषणा करतात गुन्हे मागे घेण्याची फक्त. प्रश्न विचारणाऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न लोकशाहीला मारक आहे. अहिंसेच्या मार्गाने होणाऱ्या आंदोलनास परवानगी दिली पाहिजे. प्रत्यकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राखले जाणे आवश्यक आहे. संविधानिक पद्धतीने होणाऱ्या आंदोलनास परवानगी दिली पाहिजे. पिंपळगाव येथे निदर्शने आंदोलनास इपीएस 95 पेन्शनर्स फेडरेशन नाशिक यांच्या वतीने परवानगी मागितली आहे.

आम्ही निवडणुकीच्या प्रचारात तालुक्याबाहेर व्यस्त आहोत. मात्र आम्हाला पोलिसांचे फोन आले. लवकरात लवकर नजरकैदेत राहण्याबाबत पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. आम्ही सूचनेप्रमाणे हजर राहू मात्र आमच्या जेवण व चहापाण्याची रीतसर सोय करावी. दिवसभर काळजी घ्यावी.
- सुधाकर मोगल, जिल्हाध्यक्ष, 
स्वाभिमानी शेतकरी संघटना.

निवडणुका जवळ आल्यावर राजकीय पक्षनेते आश्वासन देतात. मत मिळवून घेतात. सत्तेत आल्यावर विसरतात. त्यांना आठवण करून देणे लोकशाहीत गुन्हा कसा ठरू शकते? ज्यांनी फसवणूक केली त्यांना पोलिस जाब विचारत नाहीत. मात्र फसवणूक झालेल्या ना कायदा सांगितला जातो. निवडणुकीत दिलेले आश्वासन न पाळणाऱ्याना जाब विचारणे लोकशाहीत गुन्हा कसा? 
- राजू देसले, कार्याध्यक्ष, 
अखिल भारतीय किसान सभा 

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...