agriculture news in marathi farmers Unions demand not to take vehicle toll in lockdown period from farmers | Agrowon

संकटकाळात टोल वसुली म्हणजे शेतकऱ्यांची लुटच : शेतकरी नेते आक्रमक

सूर्यकांत नेटके 
रविवार, 26 एप्रिल 2020

कोरोना लॉकडाऊनमध्ये शेतमालाचे एकतर प्रचंड नुकसान होत आहे. त्याच जे शेतकरी अशा काळात शेतमाल विक्रीचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्याकडून टोलवसुली केली जात आहे. ही वसुली म्हणजे संकटकाळी शेतकऱ्यांची लुटच आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया राज्यातील शेतकरी नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत

नगर : कोरोना लॉकडाऊनमध्ये शेतमालाचे एकतर प्रचंड नुकसान होत आहे. त्याच जे शेतकरी अशा काळात शेतमाल विक्रीचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्याकडून टोलवसुली केली जात आहे. ही वसुली म्हणजे संकटकाळी शेतकऱ्यांची लुटच आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया राज्यातील शेतकरी नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच या काळात शेतमाल वाहतुकीवरील टोल रद्द करावा अशी मागणी केली आहे. 

लॉकडाऊनमुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी  टोल वसूली करणे हे आर्थिक संकटात आणण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे शेतमालावरील टोलवसुली सारख्या बाबी तातडीने बंद करण्याची मागणी राज्यातील शेतकरी नेत्यांनी केली आहे. 

याविषयी बोलताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील म्हणाले, की कोरोनामुळे राज्यातला, देशातला शेतकरी नेहमीप्रमाणे अडचणीत आला आहे. लाखमोलाची फळे, भाजीपाला शेतात पडून आहे. विक्री करायचा प्रयत्न केला तर दर मिळत नाही. त्यात शहरात जायचे झाले तर टोल भरून वरचेवर खर्चात भर पडत आहे. टोलची रक्कम  शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहे. मुळात वाहन खरेदी करतानाच सर्व टॅक्स वसूल केले जात असताना टोल घेतलाच नाही पाहिजे. त्यात अशा संकटकाळी टोल घेण्याचा काहीही सबंध येत नाही. सध्या सुरू असलेली टोलवसुली तातडीने बंद केली पाहिजे.

शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट म्हणाले, की शेतीमालाच्या वाहनांकडून टोलवसुली होणे म्हणजे एक प्रकारची हेळसांडच आहे. एकतर दर नाही, त्यात टोलवसुली सारख्या प्रकारातून खर्च वाढीस गेला तर शहरात माल जायचा बंद होईल. तोट्यात असलेल्या शेतकऱ्यांकडून टोलवसुली करू नये अशी मागणी आपण शासनाकडे करणार आहे. 

अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले म्हणाले, की लॉकडाऊनमुळे शेतीमाल वाहतूक व विक्री साखळी संपूर्णपणे विस्कळीत झाली आहे. बाजार समित्यांची व्यवस्थाही प्रभावित झाली आहे. शेतीमालाची किंमत यामुळे कवडीमोल झाली झाली. शेतीमाल शेतातून शहरांपर्यंत नेताना शेतकऱ्यांना अनंत अडचणी येत आहेत. अशा पार्श्वभूमीवर सरकारने टोल वसुलीला दिलेली परवानगी अनाकलनीय अशीच आहे. किमान शेतीमाल व अत्यावश्यक सेवांसाठी टोल वसुली बंद करावी अशी मागणी किसान सभा करत आहे.

केंद्र-राज्य सरकारांना पत्र लिहिणार : राजू शेट्टी
सातत्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना अशा काळात मदतीचा हाथ देणे गरजेचे आहे. लॉकडाऊनमुळे भाजीपाला, फळांचे प्रचंड नुकसान होत आहे. विक्री करतानाही समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशाही परिस्थिती शेतकरी शहरात जाऊन फळे, भाजीपाला, शेतमाल विक्री करण्याचा प्रयत्न करत असताना सरकार मात्र आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या वाहनांकडून टोलवसुली करत आहेत, ही बाब दुर्दैवी आहे. एकतर दर मिळत नाही, त्यात अशा कारणाने खर्च वाढत आहे. मुळात अशा काळात टोल वसुली करण्याचे काही कारण नाही. ही टोलवसुली तातडीने थांबावी यासाठी मी तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मागणी करणार आहे, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.   
 


इतर अॅग्रो विशेष
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...