agriculture news in Marathi farmers upset due to rate hiked of onion rate Maharashtra | Agrowon

विद्यापीठाच्या कांदा बियाणे दरवाढीने शेतकऱ्यांत नाराजी 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 10 जून 2021

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी घेत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कांदा बियाण्याची विक्री गेल्या वर्षापासून ऑनलाइन पद्धतीने सुरू केली आहे. 

नाशिक : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी घेत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कांदा बियाण्याची विक्री गेल्या वर्षापासून ऑनलाइन पद्धतीने सुरू केली आहे. मात्र मागील वर्षी प्रतिकिलो १५०० रुपये असलेले दर चालू वर्षी २००० रुपये केल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कांदा बियाण्याचे दर मागील वर्षीप्रमाणे ठेवावे, अशी कांदा उत्पादक शेतकरी व महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने मागणी केली आहे. 

मागील वर्षी राज्यातील १३ जिल्ह्यांमधून ५ हजारांवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या ‘फुले समर्थ’ आणि ‘बसवंत-७८०’ या बियाण्यास पसंती दिली होती. विद्यापीठाकडे ४,२२० किलो बियाण्याची उपलब्धता होती. प्रतिकिलो १५०० रुपये दर असल्याने ही उलाढाल ६३ लाखांवर झाली होती. मात्र चालू वर्षी अवघे ३००० किलो बियाणे विक्रीयोग्य असल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे. अपेक्षित उत्पादनात घट आल्याने व उपलब्धता कमी असल्याने ही दरवाढ झाल्याचे सांगण्यात आले. 

चालू वर्षी विद्यापीठाकडून संगणक प्रणालीमध्ये योग्य त्या सुधारणा करून ११ जूनला ऑनलाइन विक्री होणार आहे. या पद्धतीचे शेतकऱ्यांकडून स्वागत असले, तरी दरवाढीला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. यापूर्वी शेतकऱ्यांचे मागील वर्षी खरीप कांदा उत्पादनात मोठे नुकसान झाले असताना ही दरवाढ परवडणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

उत्पादन ७० टक्क्यांनी घटले 
चालू वर्षी १० हजार किलो उत्पादन अपेक्षित होते. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे बीजोत्पादन प्रक्रियेत अडचणी आल्याने ७० टक्के नुकसान झाले. त्यामुळे अवघे ३ हजार किलो बियाणे उपलब्ध आहे. त्यातच बीजोत्पादन प्रक्रियेस कुठलेही अनुदान नसल्याने विद्यापीठ स्व भांडवलातून बियाणे तयार करते.नुकसान अधिक असल्याने दरवाढ झाली. मात्र खासगी बियाण्यांच्या तुलनेत दर कमी असल्याचे बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आनंद सोळुंके यांनी सांगितले. 

१५०० रुपये प्रतिकिलोनेच बियाणे विक्री व्हावी 
चालू वर्षीचे दर किलोमागे ५०० रुपयांप्रमाणे वाढले. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करून मागील वर्षीप्रमाणे १५०० रुपये प्रतिकिलो प्रमाणेच उपलब्ध करून द्या. यासाठी राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांना आदेश द्या, या आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने कृषिमंत्री दादा भुसे यांना देत मागणी केली आहे. 


इतर अॅग्रो विशेष
निर्यातीसाठी संत्रा आंबटच!  सुमारे पाच वर्षांपूर्वी बांगलादेशने...
हळद लागवडीसाठी ट्रॅक्टरचलित यंत्रात...नांदेड जिल्ह्यात हळदीकडे नगदी पीक म्हणून शेतकरी...
फळपीक विमा योजनेत त्रुटी, गोंधळसोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
खर्च, जोखीम करणारे नागरे यांचे तीनमजली...शिवणी आरमाळ (जि.. बुलडाणा) येथील कैलास नागरे...
पूर्वहंगामी द्राक्षाचे विमा कवच चारपट...नाशिक : गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे...
‘एचटीबीटी’ बियाण्याची पाळेमुळे...पुणे ः देशात अवैध तणनाशक सहनशील ‘एचटीबीटी’ कापूस...
डाळिंब विमा अर्जासाठी १४ जुलैपर्यंत...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित...
कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची...
संत्रा आयात शुल्क कपातीसाठी प्रयत्न करा...नागपूर : विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या...
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...