agriculture news in Marathi farmers used home seed of 650 crore Maharashtra | Page 2 ||| Agrowon

शेतकऱ्यांनी वापरले ६५० कोटींचे घरचे बियाणे 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 2 ऑगस्ट 2021

राज्यात यंदा सोयाबीनच्या पेऱ्यात मोठी वाढ होत असून शेतकऱ्यांनी अंदाजे ६५० कोटी रुपये किमतीचे घरचे बियाणे वापरल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

पुणेः राज्यात यंदा सोयाबीनच्या पेऱ्यात मोठी वाढ होत असून शेतकऱ्यांनी अंदाजे ६५० कोटी रुपये किमतीचे घरचे बियाणे वापरल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे महाबीज व खासगी कंपन्यांकडून बियाणे पुरवठा कमी होतो. मात्र, ग्रामबिजोत्पादनामुळे शेतकऱ्यांनी घरचे बियाणे मुबलक वापरत टंचाईवर मात केली आहे. 

सोयाबीन ग्रामबिजोत्पादनासाठी गेल्या खरीप व उन्हाळी हंगामात राबविलेली मोहीम घेण्यात आली होती. त्यातून साडेसहाशे कोटी रुपये किमतीचे अंदाजे ३१ लाख क्विंटल बियाणे तयार झाले. राज्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ३९ लाख हेक्टर आहे. मात्र, यंदा पेरा ४३ लाख ५० हजार हेक्टर राहील, असा प्राथमिक अंदाज होता. त्यासाठी बियाणे बदलाचा दर ३५ टक्के राहावा, असे लक्षांक ठेवले गेले होते. लक्षांकानुसार शेतकऱ्यांनी हेक्टरी ७५ किलो बियाणे वापरतील, असेही गृहीत धरण्यात आले. 

पेरा व बियाणे बदलाचा दर याचा हिशेब मांडल्यास राज्याच्या बियाणे बाजारात यंदा ११ लाख ४१ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्यांची गरज होती. ही गरज पाहून महाबीजने २.१० लाख क्विंटल, राष्ट्रीय बियाणे महामंडळाने ८ हजार क्विंटल आणि खासगी बियाणे कंपन्यांनी ९ लाख ६५ हजार क्विंटल बियाणे पुरवावे, असे नियोजन ठरले होते. 

“अपेक्षेप्रमाणे खासगी बाजारात बियाण्यांचा पुरवठा मर्यादित स्वरूपाचा होता. दुसरीकडे पेराही वाढत होता. मात्र, शेतकऱ्यांनी घरचे ३१ लाख क्विंटल बियाणे वापरले. त्यामुळे यंदा सोयाबीनचा बंपर पेरा होऊनसुद्धा बियाणे टंचाई जाणवली नाही,” असे कृषी आयुक्तालयातील सूत्रांनी स्पष्ट केले. 

कंपन्यांकडून १२ लाख क्विंटल पुरवठा 
यंदा सोयाबीनचा पेरा ५० लाख हेक्टरपर्यंत होण्याची शक्यता गृहीत धरल्यास त्यासाठी बियाणे ३७ लाख ५० हजार क्विंटल वापरले जाईल. त्यात बियाणे बदलाचा दर बघता शेतकऱ्यांना ११.५५ लाख क्विंटल बियाणे बाजारातून लागू शकते. सुदैवाने जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात कंपन्यांनी १२ लाख क्विंटलच्या आसपास सोयाबीनचा पुरवठा केलेला होता, असेही आयुक्तालयाचे म्हणणे आहे. 

प्रतिक्रिया 
शेतकऱ्यांनी यंदा घरचे बियाणे भरपूर वापरले आहे. बाजारातून शेतकऱ्यांनी किमान साडेसहा लाख क्विंटल बियाणे विकत घेतलेले नाही, असे गृहीत धरल्यास साडेसहाशे कोटी रुपये वाचले आहेत.मुळ पीक हाती येण्यापूर्वीच ही बचत झाली आहे. कृषी खात्याने विस्तार कामात बिजोत्पादनासाठी राबविलेल्या अभियानाचे हे यश आहे. 
- दिलीप झेंडे, कृषी संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग 
 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...
‘पीएम किसान’, ‘ई-पीक’चा तिढा सुटलापुणे ः महसूल व कृषी खात्यात तयार झालेल्या...
गणेशोत्सवात आंबा, काजू मोदकांनी खाल्ला...गणेशोत्सवामध्ये मोदकांना चांगली मागणी असते. हे...
उत्कृष्ट, दर्जेदार उत्पादनातून कांदा...नाशिक जिल्ह्यातील धोडांबे (ता. चांदवड) येथील...
द्राक्षशेतीत हवी कृत्रिम बुद्धिमत्ता ः...पुणे ः देशाच्या द्राक्षशेतीला आधुनिक वळण...
राज्यात जोरदार पावसाची शक्यतापुणे : राज्यात पावसाने सर्वदूर समाधानकारक हजेरी...
कोकणात पावसाची दमदार हजेरीपुणे : राज्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे....
द्राक्षशेतीत परीक्षणानंतर...पुणे ः ‘‘अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन उत्तमरीत्या...
देशभरात सोयाबीन ५५०० ते ७३००च्या दरम्यानपुणे : सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनपैकी ज्या...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला...
द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे...
मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची...पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी...पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक...
द्राक्ष पिकातील कलम वर्षभर यशस्वी...महाराष्ट्रात द्राक्ष, आंबा व अन्य फळपिकांचे कलम...
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटीपुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या...
पेरणी ते काढणी- जपला यांत्रिकीकरणाचा वसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...