Agriculture news in Marathi Farmers in Varada are more inclined towards soybean | Agrowon

वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक कल

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 जुलै 2020

अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या आहेत. बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात लागवड ९० टक्क्यांवर गेली असून अकोला जिल्ह्यात ७५ टक्क्यांवर लागवड झाली आहे. या हंगामातही पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावर विश्‍वास ठेवला असून या पिकाचे वऱ्हाडात यंदा सुमारे साडेसात लाख हेक्टरपेक्षा अधिक लागवड क्षेत्र होत आहे.

अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या आहेत. बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात लागवड ९० टक्क्यांवर गेली असून अकोला जिल्ह्यात ७५ टक्क्यांवर लागवड झाली आहे. या हंगामातही पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावर विश्‍वास ठेवला असून या पिकाचे वऱ्हाडात यंदा सुमारे साडेसात लाख हेक्टरपेक्षा अधिक लागवड क्षेत्र होत आहे.

अकोला, बुलडाणा, वाशीम हे जिल्हे मिळून सुमारे १७ लाख हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. जूनमध्ये असमतोल पाऊस झाल्याने जुलैचा दुसरा आठवडा सुरू होऊनही पेरण्या पूर्ण झालेल्या नाहीत. यंदाच्या हंगामात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी तीनही जिल्ह्यात मोठ्या संख्येत आलेल्या आहेत.

गेल्या हंगामात सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसानही शेतकऱ्यांनी झेलले होते, तरीही या हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावरच पूर्ण विश्‍वास टाकलेला आहे. यानंतर अकोला, बुलडाण्यात कपाशी तर वाशीम जिल्ह्यात तुरीच्या पिकाचा क्रमांक आहे.

कमी खर्चाचे पीक
कापसाच्या तुलनेत सोयाबीनचा उत्पादन खर्च व पिकाचा कालावधीसुद्धा कमी लागतो. शिवाय सोयाबीन कापणीसाठी यंत्राचा उपयोग करता येतो. प्रामुख्याने सोयाबीन काढून रब्बीत दुसरे पीक घेता येते. यामुळे शेतकरी सोयाबीनची पसंती कायम ठेवून आहेत. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांचा सोयाबीनवरील कल कायम असून अद्यापही काही भागात पेरणी सुरू आहे, तर जूनमध्ये मृग नक्षत्रात लागवड झालेल्या सोयाबीनचे पीक एक महिन्याचे होत आले आहे. या पिकात डवरणीचे फेरसुद्धा झाले आहेत.

यंदा मी सहा एकरांत सोयाबीनची लागवड केली आहे. सुरुवातीपासून योग्य नियोजन केल्याने पीक चांगले उगवले व सध्या स्थितीही चांगली आहे. आमच्या तालुक्यात सुरुवातीपासून जोरदार पाऊस झालेला असल्याने पीक स्थिती जुळून आली आहे.
- विष्णू खडसे, शेलू खडसे, ता. रिसोड, जि. वाशीम


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात सततच्या पावसाने मुगाचे...नगर  ः नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून...
नांदेड जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टरवर...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील खरिपाच्या पेरणी...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी पट्टा...पुणे  ः चालू वर्षी खरीप हंगामात ड्रम सीडर...
दोंडाईचा मालधक्क्यावर अधिकाऱ्यांच्या...धुळे ः युरिया वितरणातील घोळ, शेतकऱ्यांच्या...
नगर जिल्ह्यात फळबाग लागवड वाढण्याचा...नगर  ः यंदा पाऊस चांगला, शिवाय मागील काही...
कोल्हापुरात अर्धा टक्के शेतकऱ्यांनी ...कोल्हापूर : राज्यात पंतप्रधान पीक विमा योजनेला...
रत्नागिरी जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाची...रत्नागिरी  ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
अकोला जिल्ह्यातील दोन लाखांवर ...अकोला  : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
नागपूर कृषी महाविद्यालय राबवणार ‘ई-...नागपूर  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन...
उभ्या पिकात मूलस्थानी जलसंवर्धनकोरडवाहू शेतीमध्ये जमिनीतील पाण्याची कमतरता पाहता...
दूध प्रश्न बाजूला; शेतकरी संघटनांमधील...कोल्हापूर  : दूध दरप्रश्नी सरकारवर दबाव...
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा संतुलित; दर...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
घरोघरी असावी पोषण परसबागपरसबागेचा आकार हा जागेची उपलब्धता, कुटुंबातील...
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक;...मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या...
अपचन, खोकला, कफावर गुणकारी पिंपळी पावडर आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींना पिंपळी नक्कीच...
मागण्यांसाठी मराठवाड्यात दूध...औरंगाबाद : दूध उत्पादन खर्चाच्या तुलनेत परवडणारा...
नैसर्गिकरीत्या वाढवा रोगप्रतिकारक शक्तीरोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच शरीरात बाहेरून प्रवेश...
परभणी जिल्ह्यात रास्ता रोको, दूध संकलन...परभणी : दूध दरवाढीसाठी भाजपतर्फे शनिवारी (ता.१)...
दूध दरप्रश्नी आंदोलनाला विदर्भात...नागपूर : दूध दरप्रश्नी भाजपच्या वतीने...
दूध दरप्रश्नी भाजपचे सातारा जिल्ह्यात...सातारा  : गाईच्या दुधाला प्रतिलिटर १० रुपये...