भगूरमध्ये शेतकरी, भाजी विक्रेत्यांकडून अधिकची सक्तीची वसुली ः बलकवडे

नाशिक : लॉकडाऊन दरम्यान शासनाने नियम घालून दिल्यानंतर परिसरातील शेतकरी व भाजीपाला विक्रेते भगूर नगरपालिका क्षेत्रात भाजीपाला विक्री करत आहेत.
 From farmers, vegetable sellers in Bhagur More forced recovery: Balkwade
From farmers, vegetable sellers in Bhagur More forced recovery: Balkwade

नाशिक : लॉकडाऊन दरम्यान शासनाने नियम घालून दिल्यानंतर परिसरातील शेतकरी व भाजीपाला विक्रेते भगूर नगरपालिका क्षेत्रात भाजीपाला विक्री करत आहेत. यावरच त्यांचा उदरनिर्वाह आहे. मात्र, नगरपालिकेचे ठेकेदार त्यांच्याकडून नियमबाह्य शुल्क वसुली करीत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीच्या महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी केला. 

नगरपालिका कर्मचारी व पोलिसांकडून नियमबाह्य कारवाई करून भाजी विक्रेत्यांना हकलवून दिले जाते. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. याबाबत नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे वेळोवेळी तक्रारी केल्या. मात्र तरीही हा प्रकार भगूर नगरपरिषदेच्या संगनमताने सुरू आहे, असे बलकवडे म्हणाल्या. 

भगूर पालिकेत शिवसेनेची सत्ता असून, महाविकास आघाडीच्या दोन पक्षांमध्ये ठिणगी पडली आहे. या ठेकेदाराकडे मार्केट कामाचा ठेका १ ऑगस्ट २०१९ ते ३१ मार्च २०२० पर्यंत आठ महिने होता. लॉकडाऊनमध्ये त्याचे नूतनीकरण करण्यात आले. मात्र यावेळी ठेकेदाराला पालिकेने दरपत्रक फलक स्वखर्चाने लावणे बंधनकारक केले. मात्र भगूर शहरात कुठेही दरपत्रक लावलेले नाही. ३ रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे दर असताना सरासरी ४० रुपयांची सक्तीची वसुली भाजीविक्रेते व शेतकऱ्यांकडून होत असल्याचा आरोप बलकवडे यांनी केला. 

सध्या शेतकरी व भाजी विक्रेते येथील जेष्ठ नागरिक एकनाथ शेटे यांच्या खासगी जागेत विक्री करत आहेत. तरीही पोलिसांना सांगून शेतकऱ्यांना उठवून लावतात. काठी हल्ला करायला लावतात. त्यामुळे अधिकची वसुली म्हणजे खंडणीचा प्रकार आहे. ठेकेदारचा ठेका रद्द करून नगरपालिका प्रशासनावर कारवाई करावी, अशी मागणी बलकवडे यांनी केली. ही अडवणूक थांबली नाही, तर पालिका व ठेकेदाराविरोधात आंदोलन करण्याचा इशारा बलकवडे यांनी यावेळी दिला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com