वैजापूर कांदा बाजारात शेतकऱ्यांनी लिलाव पाडला बंद

वैजापूर कांदा बाजारात शेतकऱ्यांनी लिलाव पाडला बंद
वैजापूर कांदा बाजारात शेतकऱ्यांनी लिलाव पाडला बंद

वैजापूर, जि. औरंगाबाद ः शहरालगत असलेल्या कांदा मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी बुधवारी (ता.२६) कांद्याला प्रतिक्विंटल वीस रुपये भाव देण्यास सुरवात केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी दुपारी बाराच्या सुमारास जवळपास दोन तास लिलाव बंद पाडला; मात्र तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी वेळीच मध्यस्थी केल्याने दोनच्या सुमारास लिलावास पुन्हा सुरवात करण्यात आली.

येथील कांदा मार्केटमध्ये बुधवारी व्यापाऱ्यांनी कांदा वीस रुपये प्रतिक्विंटल खरेदी करण्यास सुरवात केली; मात्र शेतकऱ्यांनी यावेळी रुद्र रूप धारण करीत लिलाव त्वरित बंद पाडत बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील कांदा बाजारात चांगल्या प्रतीच्या कांद्याला ४७५ रुपये भाव सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना सुनावले. मात्र  व्यापाऱ्यांनी यावर दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांनी शेवटी लिलाव बंद पाडला. 

यावेळी बाजार समितीचे सभापती बाहेरगावी, तर सचिव व्ही. डी. सिंनगर हे सुटीवर असल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. तहसीलदार गुंडमवार हे कांदा मार्केट येथे  येताच व्यथा त्यांच्यासमोर मांडत कांदा वाहतुकीचा खर्चसुद्धा निघत नसून व्यापारी हे शेतकऱ्यांची लूट करीत असल्याचा आरोप केला. याशिवाय कांदा मार्केटमध्ये ५६ नोंदणीकृत व्यापारी असून फक्त सहा व्यापारीच लिलावात सहभागी होतात. जे व्यापारी सहभागी होत नाहीत त्यांचे परवाने रद्द करा, अशी मागणी तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष उमेश नाईकवाडी यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com