agriculture news in Marathi farmers visited HTBT plot Maharashtra | Agrowon

एचटीबीटी कपाशीची शेतकऱ्यांकडून पाहणी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 जुलै 2020

शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळावे यासाठी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारलेले आहे. यंदाच्या हंगामातही संघटनेच्या नेतृत्वात जिल्ह्यात प्रतिबंधित एचटीबीटी कपाशी वाणाची काही शेतकऱ्यांनी लागवड केली आहे.

अकोला ः शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळावे यासाठी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारलेले आहे. यंदाच्या हंगामातही संघटनेच्या नेतृत्वात जिल्ह्यात प्रतिबंधित एचटीबीटी कपाशी वाणाची काही शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. या क्षेत्राची तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुद्रूक येथे पाहणी करण्यात आली. 

राज्यात एचटीबीटी कपाशी लागवडीला मान्यता नाही. शेतकऱ्यांनी या बियाण्याला मान्यता मिळावी अशी मागणी केली आहे.  शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना तंत्रज्ञान मिळावे याची मागणी गेल्या दोन वर्षांपासून केली जात आहे. यंदाही काही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे.  शेतकरी संघटनेचे माहिती व तंत्रज्ञान आघाडी जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत कौठकर यांच्या शेतात कपाशीच्या वाणाची चाचणी व निरीक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आला. 

या पिकात तणनाशकाची फवारणी केलेली असून फक्त एका सरीला तणनाशक मारलेले नव्हते. ज्या भागात तणनाशकाचा प्रयोग केलेला होता त्या भागातील संपूर्ण गवत नष्ट झालेले दिसून आले. जेथे तणनाशक फवारले नव्हते तिथे खूप गवत दिसले. या एका सरीला तण काढणीकरिता आठशे रुपये मजुरी लागली. या वानाला तणनाशक फवारले असता तणनाशक व मजुरी मिळून ५२० रुपये खर्च आला. निंदन, डवरणी, वखरणी मुळे जमीन मोकळी होत असल्याने जमिनीतील आर्द्रता कमी होत पिकांची मुळे कमजोर होतात. पीक पिवळे पडते. परंतु या कपाशीत तणनाशकाच्या फवारणीमुळे तण सुकून पिकात नैसर्गिक मल्चिंगचे काम झाल्याचे शेतकऱ्यांना सांगण्यात आले. 

यावेळी शेतकरी तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रहाच्या फलकाचे अनावरण शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते  ललित बाहाळे यांच्या हस्ते करण्यात आले.  शेतकरी संघटनेचे माजी जिल्हा प्रमुख सतीश  देशमुख,  लक्ष्मीकांत कौठकर, तालुका प्रमुख निलेश नेमाडे, युवा आघाडीचे दिनेश देऊळकार, अमोल मसुरकार, संजय ढोकणे, मोहन खिरोडकार, दिनेश गिर्हे, जाफर खाँ, विलास इंगळे, गोपाल निमकर्डे, शेख आरिफ, आकाश देऊळकार, महेश उमाळे, शेख इस्माईल, संतोष चतारे, राजीक कुरेशी, नरेंद्र निमकर्डे, मकसूद मुल्लाजी, प्रल्हाद निमकर्डे व इतर शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
पावसाची सर्वदूर संततधार; धरणसाठ्यात वाढपुणे : गेल्या दोन दिवसापासून राज्यातील बहुतांशी...
राज्यात आज आणि उद्या पाऊस जोर धरणारपुणे :  गेल्या तीन ते चार दिवसापासून...
`सक्ती’चे होईल स्वागतयुरिया विकत घेताना सोबत जैविक (जीवाणू) खते...
देशाला स्वातंत्र्य मिळाले पण...शेतमालाचेच भाव का कोसळतात? कांदा, टोमॅटो ...
नवी बाजार व्यवस्था नवी आव्हानेसध्यातरी बाजार समितीचा कर नाही म्हणून व्यापारी...
आकडे, आरोग्य अन् आयातखाद्यतेलावरील आयातशुल्कात वाढ करून आयातीवर...
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना... पुणे : ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना...
द्राक्ष पीककर्ज कर्जमाफीत बसेना आणि...नाशिक : द्राक्षासाठी घेतलेले पीककर्ज  ...
कर्जमाफीसाठी दीड हजार कोटीमुंबई: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जैविक खतांचा वापर सक्तीचा होणार पुणे: युरिया विकत घेताना जैविक खते देखील विकत...
राज्यातील पंधरा जिल्हा बँकांना ...लातूर ः राज्यातील अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
राज्यात पावसाची रिपरिप सुरुच पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात रिमझिम असून...
निकृष्ट बियाणेप्रकरणी ४० न्यायालयीन खटलेवाशीम ः यंदाच्या हंगामात निकृष्ट बियाण्यामुळे...
चांदोली धरणग्रस्त विस्थापीतांनी केली २५...मांगले, जि. सांगली ः  चांदोली धरणग्रस्तामधील...
लोकसहभागातून शेती अन् ग्रामविकासाला...उंबरीवाडी (ता.जावली,जि.सातारा) हे लहानसे गाव....
जलसंधारण मोहिमेतून पाणी टंचाईवर मातआजही माण, खटाव हे  दुष्काळी तालुका म्हणून...
पावसाचा जोर कायम राहणार पुणे: गुजरातच्या दक्षिण भागात चक्राकार...
कृषी अधीक्षक, उपसंचालकांच्या बदल्यापुणे : कोविड १९ रोगाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत...
मका विक्रीचे चुकारे ४० दिवसांनंतरही थकितजळगाव ः जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार मका...
कोकणात मुसळधारेचा अंदाजपुणे ः  उत्तर प्रदेशचा नैऋत्य भाग ते...