agriculture news in Marathi farmers waiting for 65 crore Maharashtra | Agrowon

बारदान्याच्या ६५ कोटींची शेतकऱ्यांना प्रतिक्षा 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

गेल्या खरीप व रब्बी हंगामात स्वतःचा बारदाना देऊन शेतकऱ्यांनी धान विक्री केली. त्यापोटी प्रति नग २० रुपये ८६ पैसे शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते. 

भंडारा: गेल्या खरीप व रब्बी हंगामात स्वतःचा बारदाना देऊन शेतकऱ्यांनी धान विक्री केली. त्यापोटी प्रति नग २० रुपये ८६ पैसे शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते. यासाठी ६४ कोटी ८५ लाख ७५ हजार ८४ रुपयांचा निधी मिळाला. मात्र त्याचे वाटप हेतुपुरस्सर केले जात नसल्याचा आरोप सडक अर्जुनी बाजार समितीचे संचालक रोशन बडोले यांनी केला आहे. 

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने २७ ऑक्टोबरला आदेश काढण्यात आले. त्यानुसार, शेतकऱ्यांनी धान विक्रीच्या वेळी आपला बारदाना दिला असेल तर त्याची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी, असे निर्देश आहेत. आदिवासी विकास महामंडळ देवरी अंतर्गत सन २०१९-२० या हंगामात २८ केंद्रावर धान खरेदी करण्यात आली. नवेगाव बांध अंतर्गत १६ केंद्रावर १८६३७ व बिगर आदिवासी शेतकरी २८८८२ तर देवळी क्षेत्रातील ३४१० शेतकऱ्यांनी आधारभूत केंद्रावर आपल्या धानाची विक्री केली. दोन्ही कार्यालयांमार्फत १३ कोटी २३ लाख ३० हजार ३३ रुपयांचे धान खरेदी करण्यात आले. 

या हंगामासाठी बालाजी कार्पोरेशन (गोंदिया) व शुभलक्ष्मी राइस इंडस्ट्रीज (गोंदिया) यांनी महामंडळा सोबत एकदा वापरलेला ५० किलो वजनाचा बारदाना पुरवठा करण्याबाबत करारनामा केला होता. परंतु बालाजी कार्पोरेशन यांना रब्बी हंगामातील ८ मे रोजी महामंडळाने पुरवठा आदेश दिला. २७ ऑगस्टपर्यंत मुदत असताना देखील बारदाना पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून एकदा वापरलेला ११ कोटी ६३ लाख १२९ बारदाना जमा झाला. यासाठीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी त्याकरिता निधी मिळावा, अशा मागणीचा प्रस्ताव आदिवासी विकास महामंडळ भंडाराच्या वतीने शासनाला देण्यात आला होता. 

शेतकऱ्यांची दिशाभूल 
महामंडळाचे व्यवस्थापक यांनी १५ जुलै २०२० रोजी ६४ कोटी ८४ लाख ७५ हजार ५८४ रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याचे सांगितले. मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही. दिशाभूल थांबवीत शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम त्वरित जमा करावी, अशी मागणी रोशन बडोले यांनी केली आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
शेतकरी मागण्यांवर ठाम; ट्रॅक्टर रॅलीही...नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्‍टर...
बर्ड फ्लू नुकसानग्रस्त पोल्ट्री...नागपूर ः राज्यात ११ जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा...
एक लाख शेतकऱ्यांची तूर विक्रीसाठी...अकोला ः राज्यात या हंगामात उत्पादित तूर खरेदीला...
कापूस उत्पादकतावाढीसाठी ‘सीआयसीआर’चा ॲ...नागपूर ः जगाच्या तुलनेत भारताची आणि त्यातही...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष हंगामास उशीरसांगली ः जिल्ह्यात अगदी क्वचितच आगाप छाटणी...
आजरा घनसाळसह तूरडाळ, घेवडा मिळणार...कोल्हापूर : पारंपरिक विक्री व्यवस्थेच्या पलीकडे...
थंडीत चढ-उतार सुरुच पुणे ः हिमालय आणि पश्चिम बंगालच्या परिसरात कमी...
खांबापासून ३० मीटरच्या आतील कृषिपंपांना...पुणे ः राज्यातील शेतकऱ्यांना कृषिपंपांसाठी...
गव्यांच्या कळपाकडून केळी बागांचे नुकसानसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील विलवडे मळावाडी (ता....
भाजीपाला, कणगर, दुधातून उंचावले...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता.वेंगुर्ला)...
केंद्र सरकारकडून कृषी कायदांना...नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी...
ग्रामसभांना ३१ मार्चपर्यंत परवानगी...अकोला : राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये कोविड-१९च्या...
राज्यात साडेचार लाख क्‍विंटल मका...औरंगाबाद : बंद पडलेली मका खरेदी जवळपास एका...
शेतकऱ्यांच्या भूमिकेवर न्यायालयाची...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांवरून निर्माण झालेल्या...
तूर खरेदीसाठी जिल्हानिहाय उत्पादकता...परभणी ः केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत...
कांदा निर्यातदारांसाठी आता ‘ओनियन नेट’ नागपूर : कांदा उत्पादनाच्या बाबतीत जागतीक स्तरावर...
खानदेशात गारठा वाढला पुणे ः उत्तर भारतातील काही राज्यात थंडीची लाट आली...
पावसाच्या पाण्यावर फुलवलेली दर्जेदार...निमगाव घाणा (ता. जि. नगर) येथील रामदास रघुनाथ...
पोतेकरांची देशी केळी वर्षभर खातेय भावसातारा जिल्ह्यातील शेंद्रे (ता. जि. सातारा) येथील...
अजून एक ‘बारामती पॅटर्न’कार्यालय आम्हाला घरच्यासारखे वागवते, कर्मचारी...