agriculture news in marathi, farmers waiting for compensation of crop damages, karad, maharashtra | Page 2 ||| Agrowon

सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत

हेमंत पवार
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांसह केळी, उसासारख्या नगदी पिकांची लागवड केली होती. मात्र, महापुराने त्यावर पाणी फिरवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. माझ्या शेतातील नुकसानग्रस्त केळी, सोयाबीन, भात पीक शेताबाहेर काढण्यासाठीही पैसे नव्हते. उसने पैसे घेऊन मी पिके बाहेर काढत आहे. याचा विचार करून शासनाने शेतकऱ्यांना तातडीने भरपाई म्हणून काही रक्कम देणे आवश्यक होते. महापुराच्या घटनेला दीड महिना होत आला तरी, आम्हाला अजूनही भरपाई मिळालेली नाही. आम्ही मदतीची प्रतीक्षा करत आहोत.  
- दत्तात्रेय जांभळे, शेतकरी, सुपने, जि. सातारा.

कऱ्हाड, जि.सातारा ः शेतकऱ्यांनी कर्ज काढून, उसनवारी करून फुलवलेली पिके महापुरात जमीनदोस्त झाली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. महापुरामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले. त्यानुसार शासकीय यंत्रणेकडून त्याचे पंचनामे करण्यात आले. त्यानंतर लवकरच भरपाई मिळेल अशी आशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना होती. मात्र महापुराच्या घटनेला दीड महिने उलटत आले तरीही शेतकऱ्यांना आत्तापर्यंत एक रुपयाचीही मदत मिळालेली नाही. महापुरात चिखलाने माखलेली पिके जनावरेही खात नाही, अशी स्थिती आहे. तसेच ही पिके शेतातून काढून टाकण्यासाठीही शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. अतिवृष्टी ही नैसर्गिक आपत्ती असल्याने त्याच्या मदतीला आचारसंहितेचा अडसर येत नाही. मात्र तरीही जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून अद्यापही भरपाई मिळालेली नाही. 

सातारा जिल्हा खरिपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील शेतकरी उसनवारी करून, कर्ज काढून मोठ्या जिद्दीने पिके घेतात. यंदा तर हवामान विभागाने पुरेसा पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामात विविध पिकांची लागवड केली होती. अतिवृष्टी होण्यापूर्वी एक आठवडा अगोदर कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार सोयाबीनची ५९ हजार १९६, भुईमुगाची ३३ हजार २३०, भाताची ४१ हजार २६५, ज्वारीची १६ हजार ८७९, मक्याची ११ हजार ७८१, तृणधान्याची १ लाख ३२ हजार ३४७, कडधान्यांची ५४ हजार १७५, तीळ, सोयाबीन, कारळा, भुईमूग या गळीत धान्याची ९३ हजार २५६, उसाची २ लाख ९० हजार ४३२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती.

पेरणी झाल्यानंतर काही दिवसांतच सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शेतकरी हतबल झाले. मुसळधार पाऊस आणि कोयना धरणातून पाणी सोडण्यात आल्याने महापूर आला. त्यात शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत पिके वाया गेली. दहा दिवसांहून अधिक काळ पिके पाण्याखाली राहिली. त्यामुळे पेरणीसाठी खते, बियाणे खरेदीसह मशागतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची, या चिंतेत शेतकरी आहेत. जिल्ह्यात कृषी विभागाच्या नजर अंदाजाने खरिपातील ऊस, आले, हळद, केळी, भात, सोयाबीन, भुईमूग, कडधान्य, तृणधान्य व अन्य पिकांचे ३८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या नुकसानीचे पंचनामे शासकीय यंत्रणेकडून करण्यात आले. मात्र त्याला दीड महिन्याचा काळ उलटला तरी शेतकऱ्यांना अजूनही शासनाकडून मदत मिळालेली नाही. 
 


इतर ताज्या घडामोडी
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे...फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत...
सेंद्रिय शेतीबाबत शरद पवार घेणार बैठकपुणे ः राज्यातील सेंद्रिय व रासायनिक अवशेषमुक्त...
यवतमाळ जिल्ह्यात चार लाख शेतकऱ्यांनी...यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा...
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...
सोलापुरात दोन लाख ५९ हजार शेतकऱ्यांनी...सोलापूर ः यंदाच्या खरीप हंगामासाठी पीक विमा...
तलाठी हरवल्याची शेतकऱ्यांची तक्रारअमरावती: तिवसा तालुक्यातील अनकवाडी मालपूर...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची मागणी, दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात भाज्यांना उठाव, वांगी,...सोलापूर ः कोरोनामुळे दहा दिवसांचा लॅाकडाऊन आहे....
नगरमध्ये घेवडा, वांग्यांच्या दरात...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील...
नगर जिल्ह्यात सततच्या पावसाने मुगाचे...नगर  ः नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून...
नांदेड जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टरवर...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील खरिपाच्या पेरणी...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी पट्टा...पुणे  ः चालू वर्षी खरीप हंगामात ड्रम सीडर...
दोंडाईचा मालधक्क्यावर अधिकाऱ्यांच्या...धुळे ः युरिया वितरणातील घोळ, शेतकऱ्यांच्या...
नगर जिल्ह्यात फळबाग लागवड वाढण्याचा...नगर  ः यंदा पाऊस चांगला, शिवाय मागील काही...
कोल्हापुरात अर्धा टक्के शेतकऱ्यांनी ...कोल्हापूर : राज्यात पंतप्रधान पीक विमा योजनेला...
रत्नागिरी जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाची...रत्नागिरी  ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
अकोला जिल्ह्यातील दोन लाखांवर ...अकोला  : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
नागपूर कृषी महाविद्यालय राबवणार ‘ई-...नागपूर  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन...
उभ्या पिकात मूलस्थानी जलसंवर्धनकोरडवाहू शेतीमध्ये जमिनीतील पाण्याची कमतरता पाहता...
दूध प्रश्न बाजूला; शेतकरी संघटनांमधील...कोल्हापूर  : दूध दरप्रश्नी सरकारवर दबाव...