दुष्काळी भागात जनावरांसाठी चारा छावण्यांची प्रतीक्षा 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर: यंदा अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळाचे सावट आहे. नुकतीच सरकारकडून राज्यात सहा ठिकाणी जनावरांसाठी छावण्या मंजूर करण्यात आल्या. जिल्ह्यातील पशुधनाला आधार देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात १३० छावण्यांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. मात्र, छावण्यांचा प्रस्तावाला सरकारकडून अद्यापही मंजुरीचा कौल न मिळाल्याने शेतकरी प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्याच्या शेजारील बीड, उस्मानाबाद, औरंगाबादसह आदी ठिकाणी जनावरांच्या छावण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. जिल्ह्यात खरिपापाठोपाठ रब्बीचा हंगाम वाया गेला. यंदा संक्रातीच्या आधीच चाराटंचाई तीव्र झाली आहे. जिल्ह्यातील २८ लाख पशुधन छावणी कधी सुरू होणार याकडे डोळे लावून बसले आहे.

जिल्ह्यात लहान-मोठ्या सर्व संवर्गातील पशुधनाची आजमितीला संख्या २७ लाख ९४ हजार ७५४ आहे. त्यात १६ लाख ४० हजार ९१८ मोठी जनावरे तर ११ लाख ५३ हजार ८३६ लहान जनावरे आहेत. या पशुधनाला जोपासण्यासाठी प्रती दिवस ९ हजार ३०२ मेट्रिक टन चारा लागतो. 

यावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत अवघा ६९.४७ टक्के पाऊस झाला. भूजलस्तरही दोन ते तीन मीटरने घटला आहे. गाव - शिवारात असणारे छोटे-मोठे तलाव बंधारे यांची संख्या सुमारे बाराशे आहे. तसेच अधिकृत नोंदणी असलेल्या विहिरींची संख्या सव्वा दोन लाख आहे. पावसाने दडी मारल्यामुळे हे तलाव आणि विहिरी डिसेंबर अखेरीसच कोरड्‌या पडल्या आहेत.

जिल्ह्यात भंडारदरा, मुळा, आढळा, निळवंडे, घाटशीळ, सीना, विसापूर, खैरी असे मोठे व मध्यम प्रकल्प आहेत. शेत शिवाराला सिंचनाची हमी देणारे म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जाते. या तलावांच्या पाण्यावरच जिल्ह्यातील मोठे क्षेत्र हिरवेगार राहते. मात्र, पाण्याचे दुर्भिक्ष्य दिवसेंदिवस वाढत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com