Sugar-Factory
Sugar-Factory

शेतकऱ्यांना प्रतिक्षा एफआरपीची

यापूर्वी महापुरातून मोठा खर्च करून शेतकऱ्यांनी ऊस पीक वाचविले आहे. कारखान्यांना ऊस घातला, मात्र अद्याप शेतकऱ्यांना एफआरपी दिलेली नाहीय. कोरोनामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांना तत्काळ एफआरपी देऊन करखान्यांनी दिलासा द्यावा. - सुनील फराटे, शेतकरी संघटना

सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम बंद झाला तरी दहा साखर कारखान्यांनी अद्यापही शेतकऱ्यांना एफआरपी दिलेली नाही. सांगलीचा वसंतदादा साखर कारखाना चालवायला घेतलेल्या दत्त इंडियाने आणि निनाईदेवी कारखाना घेतलेल्या दालमिया शुगरने एकरकमी एफआरपी देत शेतकऱ्यांना दिलासा दिला. कारखानदारी अडचणीतून वाटचाल करीत असताना दोन्ही कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी दिली, मात्र इतर कारखान्यांनी मात्र एफआरपी कायद्याला वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या आहेत. कोरोना विषाणुमुळे संचारबंदी लागू असल्याने शेतीची कामेही ठप्प आहेत. या परिस्थितीत कारखाने एफआपीची उर्वरित रक्कम देणार का? याबाबतची उत्सुकता लागली आहे.

चालू हंगामात ऊसाचे उत्पादन घटले आहे. महापूर आणि अवकाळी पावसाने ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे कारखान्यांना ऊस कमी पडणार असल्याचे अटळ आहे. यंदा ऊसाचा तुटवडा जाणवणार असल्याने एकरकमी एफआरपी मिळेल, असा विश्वास उत्पादकांना होता. याशिवाय साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरु होण्यापूर्वी शेतकरी संघटनांनी एफआरपी अधिक २०० रुपयांची मागणी केली होती.  कोल्हापूर जिल्ह्यात कारखानदारांची बैठक झाली. तेथेही तोडगा निघाला नाही. जिल्ह्यातील बारा कारखान्यांनी हंगाम घेतला. जिल्ह्यातील दत्त इंडिया आणि दालमिया कोकरुड वगळता अन्य कारखान्यांनी उसाची एकरकमी एफआरपी दिलेली नाही. एकरकमी एफआरपी देण्यात अडचणी आहेत. सरकार मदत करायला तयार नसल्याने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी एफआरपी दोन ते तीन टप्प्यात देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात राजारामबापू, वाटेगाव युनिट, सर्वोदय, दत्त इंडिया (वसंतदादा), हुतात्मा, क्रांती, सोनहिरा, विश्वास, मोहनराव शिंदे, उदगिरी शुगर, दालमिया (निनाईदेवी) आणि श्री श्री सद्गुरु हे साखर कारखाने सुरु होते. या कारखान्यांनी १८ लाख ६३ हजार टन ऊसाचे गाळप केले आहे. मात्र सध्या एफआरपीसाठीच संघर्ष करावा लागत आहे. या परिस्थितीत सांगलीच्या दत्त इंडियाने २७८० रुपयाप्रमाणे असलेली नोव्हेंबरअखेरची शंभर टक्के एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली. याशिवाय १५ डिसेंबरपर्यंची बीले पुढील आठवड्यात जमा केली जाणार आहेत.  साखरेचा दर २९०० रूपये क्विंटल निश्चित करण्यात आला आहे. या रकमेच्या आत साखर विकता येत नाही. सध्या बाजारपेठेत प्रति क्विंटल दर ३३०० ते ३५०० रूपये झाला आहे. किरकोळी साखरेची विक्री ३७ ते ३८ रुपये किलो असा आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हंगाम सुरु झाल्यानंतर ऊस आंदोलन सुरु केले. अनेक कारखान्यांच्या वाहने अडविण्यात आली. एफआरपी अधिक दोनशे रुपये दर मागितला आहे. याशिवाय कोणत्याही परिस्थितीत एफआरपीचे तुकडे करू देणार नसल्याची भूमिका घेतली होती. दत्त इंडियाने गतवर्षीही एकरकमी एफआरपी दिली होती, परंतू अन्य कारखाने ऊस दराबाबत काहीही बोलायला नाही. काही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून एफआरपीचे टप्पे घेण्यास तयार असल्याबाबतचे हमीपत्र लिहून घेतले आहे. जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांनी २४०० ते २५०० रुपयांचा पहिला हप्ता दिला आहे. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असून त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झाला आहे. शेती व्यवसायासह विकास सोसायट्यांना त्याचा दणका बसला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील विकास सेवा सोसायट्या बंद आहेत. लॉकडाऊनमुळे आधीच आर्थिक अडचणीत शेतकरी सापडले असताना कर्जपुरवठाही थांबला आहे. मार्चएण्डची कामामुळे प्रारंभी कर्ज देणे बंद करण्यात आले होते. त्यानंतर कोरोनाचा दणका बसला आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना साखर कारखान्यांकडून एफआरपीची उर्वरित रक्कम देत दिलासा देणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

कारखान्यांकडे शिल्लक एफआरपी (रुपये) क्रांती कुंडलः २८०२ हुतात्माः २९६८ दत्त इंडियाः २७१५ राजारामबापूः २९६७ वाटेगाव शाखाः २९०६ सर्वोदयः २९२० विश्वासः २८५२ निनाईदेवीः २८१० मोहनराव शिंदेः २४४५ सोनहिराः २७५४ श्री श्रीः २४६१ उदगिरीः २६२६ (तोडणी वाहतूक वजा करुन कारखान्यांची एफआरपी आहे.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com