शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची प्रतीक्षा

वरुणराजाच्या लहरीपणामुळे पिके नष्ट झाली आहेत. त्यामुळे शासकीय मदतीची आशा उराशी बाळगून परिसरातील शेतकरी आता रब्बीकडे वळला आहे. परिसरात शेतीच्या कामांना सुरुवात झाली. सततच्या पावसामुळे जमिनीत ओलावा आल्याने मशागतीसाठी अडचणी येत असून, घरधन्याच्या मदतीसाठी संपूर्ण परिवार शेतात उतरला असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.
Farmers waiting for help from the government
Farmers waiting for help from the government

तऱ्हाडी, जि. धुळे : वरुणराजाच्या लहरीपणामुळे पिके नष्ट झाली आहेत. त्यामुळे शासकीय मदतीची आशा उराशी बाळगून परिसरातील शेतकरी आता रब्बीकडे वळला आहे. परिसरात शेतीच्या कामांना सुरुवात झाली. सततच्या पावसामुळे जमिनीत ओलावा आल्याने मशागतीसाठी अडचणी येत असून, घरधन्याच्या मदतीसाठी संपूर्ण परिवार शेतात उतरला असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.

जोरदार परतीच्या पावसानंतर तऱ्हाडी परिसरातील शेतीचे अतोनात नुकसान झाले. ऐन कापणीला आलेले पीक डोळ्यांदेखत मातीमोल झाले. पै-पै जोडून जमवलेले पैसे खरिपाच्या पेरणीच्या गुंतवल्यानंतरही हातात काहीच न आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

मका, कापूस, सोयाबीन सगळंच हातातून निसटलं आहे. शासनाकडून मदतीची मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागल्यानंतर अखेरीस मुख्यमंत्र्यांनी मदतनिधी जाहीर केला. मात्र, शेतकऱ्यांच्या पदरी कधी पडेल किंवा नाही याची शाश्वती नाही. मदतीच्या प्रतीक्षेत असताना आता समोर रब्बी हंगाम उभा ठाकला आहे. त्यामुळे मागचे सगळे विसरून शेतकरी आता रब्बीच्या पेरणीच्या कामात गुंतला आहे.

जमिनीतील ओलाव्यामुळे मशागतीच्या कामामध्ये अडचणी येत आहेत. खरिपातील नुकसानीचे अवशेष अद्याप शेतभर पसरलेले असल्याने अतिरिक्त कामे वाढली आहेत. पावसामुळे शेतात तणसंख्या देखील वाढले आहेत. अशावेळी घरातील बाया-बापड्यादेखील शेतकामामध्ये घरधन्याच्या मदतीला पुढे सरसावल्याचे चित्र आहे.

यंदा शिरपूर तालुक्यात एकंदरीत हरभरे, गहू, दादर, मका, हेक्टरमध्ये यंदा रब्बीचे क्षेत्र असून गहू, ज्वारीचे उत्पादन वाढण्याची शक्यता शेतीतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. जिल्ह्यात पाणीटंचाईने सिंचनात मोठी अडचण येत होती. जिल्ह्यातील पाणीसाठे कोरडेठाक पडल्याने सिंचनाचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे होता. यंदा मात्र भरपूर पाऊस झाल्याने परिसरातील पाणीसाठे तुडुंब भरले असून भूजल पातळीत लक्षणीय वाढ झालेली आहे. त्यामुळे यंदा पाण्याचा मुख्य प्रश्न मिटलेला असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

आर्थिक मदतीची अपेक्षा शेतकरी शासनाकडून मिळणाऱ्या मदतीकडे आस लावून आहे. नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. शेतकरी व शेतकरी नेत्यांनी आक्रोश केला होता. त्यामुळे अखेरीस मुख्यमंत्र्यांनी मदतीची घोषणा केली आहे. मदतनिधी लवकरात लवकर मिळावी यासाठीही शेतकऱ्यांचा आग्रह आहे. या मदतीची आशा बाळगून शेतकरी आता नव्या जोमाने रब्बीच्या कामात गुंतला आहे. दरम्यान, मदतनिधी पदरी पडेपर्यंत उधारीवर, कर्ज काढून, नातेवाइकांकडून उसनवारी करून पैसे उभा करून रब्बीच्या कामांना सुरुवात केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com