पुणे जिल्ह्यातील पूर्व भागाला प्रतीक्षा पावसाची

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाची संततधार सुरू असतानाच पूर्व भागातील दुष्काळी पट्ट्यामध्ये मात्र पावसाची प्रतीक्षा आहे. यामुळे या भागात खरिपाच्या पेरण्या रखडल्या असून, हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, हवेली, शिरूरसह जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यांच्या पूर्व भागात जोरदार पावसाची आवश्‍यकता अाहे.

जुलै महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांत जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात १० ते १४ दिवस संततधार पाऊस पडला आहे. अनेक ठिकाणी सातत्याने मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. मात्र पूर्व भागातील तालुक्यांमध्ये मात्र बहुतांशी एक ते तीन दिवस हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. काही ठिकाणीतर १५ दिवसांहून अधिक काळ पाऊस पडला नसल्याचे चित्र आहे.

शुक्रवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मावळ तालुक्यातील मुठे, भोरमधील भोलावडे, मावळातील काले, कार्ला येथे १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. या भागात बहुतांशी धरणांच्या क्षेत्रातही पावसाचा जोर अधिक असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ सुरूच आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्रोत कृषी विभाग) : घोटावडे ४५, माले ७८, मुठे १०३, पिरंगुट ४७, भोलावडे १३५, संगमनेर ५४, निगुडघर ५८, काले १५४, कार्ला १०४, खडकाळा ५७, लोणावळा ८०, शिवणे ४५, वेल्हा ६३, पानशेत ५३, राजूर ५९, कुडे ५६.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com