सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा

सांगली : पावसाची यंदा दमदार सुरुवात झाली आहे. १ जून ते २७ जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरी १५५ मिलिमीटर इतक्‍या पावसाची नोंद झाली. गतवर्षीच्या तुलनेत हा दुप्पट पाऊस आहे; पण सध्या पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
Farmers waiting for rain in Sangli district
Farmers waiting for rain in Sangli district

सांगली : पावसाची यंदा दमदार सुरुवात झाली आहे. १ जून ते २७ जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरी १५५ मिलिमीटर इतक्‍या पावसाची नोंद झाली. गतवर्षीच्या तुलनेत हा दुप्पट पाऊस आहे; पण सध्या पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या वर्षीपेक्षा अधिक पाऊस झाला असला तरी पेरणी ३० टक्केच झाली आहे. 

जिल्ह्यात गेल्या वर्षी जून महिना बऱ्यापैकी कोरडाच गेला होता. जुलैअखेर आणि ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस झाला. यामुळे महापुराच्या संकटाचा शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना सामना करावा लागला होता. यंदाही जिल्ह्यात चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता; परंतु जिल्ह्यात पावसाने उशिरा हजेरी लावली. मृग नक्षत्रावर जिल्ह्यात पाऊस बरसू लागला. आठ ते दहा दिवसच पाऊस झाला. त्यावर खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली. त्यानंतर पावसाने उघडीप दिली. 

दरम्यान, दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, जत, कवठेमहाकांळ तालुक्‍यातदेखील जून महिन्यात दमदार पावसाने हजेरी लावली. दुष्काळी पट्ट्यातदेखील या वर्षी पावसाची अधिक नोंद झाली. जून महिन्यात १२ ते १३ दिवस पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्याही खोळंबल्या असल्याचे चित्र आहे. गतवर्षीपेक्षा चालू वर्षात जून महिन्याच्या २७ तारखेपर्यंत जरी दुप्पट पाऊस झाला असला, तरी शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत असल्याचे चित्र आहे.  तालुकानिहाय २७ जूनपर्यंतचा पाऊस (मि.मी.) 

तालुका जून २०१९ जून २०२० 
मिरज ९२ १०५
जत ९३.८ ११७.९ 
खानापूर ६०.४ १२१.४ 
वाळवा ७४.८ १७४.१ 
तासगाव १०४.९ १५६.७
शिराळा ९५.२ ३१२ 
आटपाडी ९०.५. १५५.१ 
कवठेमहांकाळ ६७.४ १२५५ 
पलूस ६५.४ १३६.२
कडेगाव ७३.८ १३७.३ 
एकूण सरासरी ८२.६. १५५.६ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com