agriculture news in Marathi farmers waiting for subsidy Maharashtra | Agrowon

नियमित कर्जफेड करणारे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत

टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

जिल्ह्यातील एक लाख ९७ हजार नियमित कर्जफेड करणारे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. हे अनुदान एप्रिल २०२० पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग वर्ग होणार होते. परंतु अद्याप अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही.

कोल्हापूर ः जिल्ह्यातील एक लाख ९७ हजार नियमित कर्जफेड करणारे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. हे अनुदान एप्रिल २०२० पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग वर्ग होणार होते. परंतु अद्याप अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही.

राज्य शासनाने सप्टेंबर २०१९ अखेरची दोन लाखांपर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही ५० हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली. या वेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर एप्रिल २०२० पर्यंत अनुदान देण्याचे करण्याचे आश्‍वासन शासनाने दिले होते. 

जिल्ह्यातील एक लाख ७७ हजार थकबाकीदार शेतकऱ्यांना ३०३ कोटींची कर्जमाफी मिळाली, तर दोन लाखांवरील थकबाकीदार यासाठी वन टाइम सेटलमेंट योजना लागू केली. त्यातून दोन हजार शेतकऱ्यांना सव्वीस कोटी १४ लाखांचा लाभ मिळाला. यामुळे सुमारे पावणेदोन लाख शेतकरी कर्जमुक्त झाले, पण नियमित परतफेड करणारे शेतकरी मात्र अनुदानापासून वंचित राहिले. जानेवारीपासून कर्जमुक्त योजनेची अंमलबजावणी झाली परंतु अद्याप ही नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र योजनेचा लाभ मिळाला नाही.


इतर अॅग्रो विशेष
राज्यामध्ये थंडीत वाढ होण्याची शक्यतापुणे : राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे...
मराठवाड्यात रब्‍बीत कपाशीची लागवडऔरंगाबाद : मराठवाडा म्हणजे कपाशीचा पट्टा. या...
मर रोगामुळे तुरीचे उभे पीक वाळू लागलेनांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या तडाख्यातून...
बळिराजासाठी पोलिस आले धावूनसिरोंचा, गडचिरोली : शेतात पांढरे सोने, अर्थात...
आंदोलनातील शहिदांना आर्थिक भरपाई द्यावी...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी...
आरक्षण नाही, तर मतदान नाही; ओबीसींचा...भंडारा : २७ टक्के ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने...
सोयाबीन बाजारात हेलकावेपुणे ः पंधरा दिवसांपासून सोयाबीन बाजारात चढ-उतार...
नांदेड जिल्ह्यात फळपीक विमा मंजुरीची...नांदेड : मागील वर्षी मृग तसेच आंबिया बहरासाठी...
औरंगाबाद : जमिनीवरील अत्याचार थांबवू;...औरंगाबाद : आम्ही आमच्या गावातील जमिनीवर होणारे...
उत्पादन खर्च वाढल्याने येवल्याची पैठणी...येवला, जि. नाशिक : राजवस्त्र, अर्थात येवल्याची...
रेशीम कोषाला सोनेरी दिवसपुणे : चालू वर्षी रेशीम कोषाला सोन्याचे दिवस आले...
सेंद्रिय खतनिर्मिती तंत्रातून आंबा...रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्‍वर तालुक्यातील पोचरी...
किमान तापमानात घट होण्याची शक्यतापुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान...
‘महाडीबीटी’च्या कामात अडथळाअकोला ः कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ...
कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने आता...पुणे ः राज्यातील कृषी सेवा केंद्रांना परवान्याची...
आयातीमुळे कडधान्य दर दबावातपुणे ः तुरीचा हंगाम पुढील काही दिवसांत सुरू होईल...
...तर द्राक्षाचे नुकसान टळले असतेनाशिक : गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील...
साहित्य संमेलनाचे अनुदान शेतकरी,...नाशिक : वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्यनगरी...
देशी वाणाने सकस उत्पादन ः राहीबाई पोपेरेसांगली : पारंपरिक बियाणाला रासायनिक खताच्या...
शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा...कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी...