Agriculture news in marathi Farmers' waiting to the summer rotations of the 'mhaisal' | Agrowon

`म्हैसाळ`च्या उन्हाळी आवर्तनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष

टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

सलगरे, जि. सांगली : म्हैसाळ पाणी योजनेचे कालवे पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. उन्हाळी आवर्तनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मागणी अर्ज भरून घेण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून गावनिहाय बैठका सुरू करण्यात आल्या आहेत. 

मिरज पूर्व, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्‍यांतील काही भाग आणि जत या तालुक्‍यातील दुष्काळाची तीव्रता कमी करणारी म्हैसाळ योजना सुरू करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून आदेश प्राप्त झाले. त्यानंतर पाणी सोडण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

सलगरे, जि. सांगली : म्हैसाळ पाणी योजनेचे कालवे पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. उन्हाळी आवर्तनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मागणी अर्ज भरून घेण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून गावनिहाय बैठका सुरू करण्यात आल्या आहेत. 

मिरज पूर्व, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्‍यांतील काही भाग आणि जत या तालुक्‍यातील दुष्काळाची तीव्रता कमी करणारी म्हैसाळ योजना सुरू करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून आदेश प्राप्त झाले. त्यानंतर पाणी सोडण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

कालव्याचे अस्तरीकरण, काटेरी झुडुपे जेसीबीच्या साहाय्याने काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. योजनेच्या प्रत्येक टप्प्यातील विद्युत मोटरी आणि विद्युत पुरवठा सुरळीत आहे, का नाही, याची तपासणी विद्युत विभागाकडून करण्यात येत आहे. खराब विद्युत मोटरी काढून काही ठिकाणी नवीन मोटरी बसवण्याचे काम सुरू आहे. म्हैसाळ, आरग, (लांडगेवाडी) सलगरे, डोंगरवाडी सलगरे येथील मुख्य पंपहाउसमधील विद्युत मोटरी व कालवा दुरुस्ती आणि रंगरंगोटीचे काम सुरू आहे. 

पाटबंधारे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून गावनिहाय पाणी मागणी अर्ज भरून घेण्याचे काम सुरू केले आहे. पाणीटंचाईग्रस्त भागातील शेतकऱ्यांकडून त्याला प्रतिसाद मिळत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सलगरे, बेळंकी, कदमवाडी, डोंगरवाडी, संतोषवाडी, जानरावाडी, खटाव, लिंगनूर, शिपूर, कोगनोळी, कुकटोळी, करोली पाणी कमी पडत असल्याने शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. 

मागणी अर्ज द्या 

पाणी सोडण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. सध्या उन्हाळी आवर्तनासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाणीटंचाई असल्याचे ठराव घेण्यात येत आहेत. ग्रामपंचायतीतर्फे शेतकऱ्यांना पाणी मागणीचे अर्ज देण्यासाठी गावपातळीवर आवाहन करण्यात येत आहे, असे खंडेराजुरी येथील उपकालवा शाखा अभियंता सावंत यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
शैक्षणिक वर्ष जूनपासूनच : मुख्यमंत्री...मुंबई : ‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते...
राज्यात नवे २४८७ रुग्ण; सध्या ३४,४८०...मुंबई : राज्यात आज दिवसभरात २४८७ नवीन रुग्णांचे...
परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा...अमरावती ः घरपोच बियाणे वाटपाच्या माध्यमातून...
लोकांना पूर धोक्‍याची जाणीव करुन द्या ः...भंडारा ः वैनगंगा नदी तसेच इतर नदीकाठावरील खोलगट...
गोंधळी शिवारात ६२ हजारांचा एचटीबीटी...यवतमाळ ः कृषी विभागाच्या पथकाने अमरावती, यवतमाळ...
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील यंत्रमाग...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘लॉकडाऊनमुळे यंत्रमागाची...
टोळधाड प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राला...भंडारा ः भंडारा जिल्ह्यातील टोळधाड...
शेतकऱ्यांनी डिजिटल व्यासपीठाचा वापर...पुणे ः कोरोनामुळे शेतीक्षेत्राचे चित्र बदलणार आहे...
नांदेड जिल्ह्यात पाच हजारावर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ७ जूनला...अकोला ः कोरोनामुळे उद्योगधंदे, व्यापार, शेती,...
‘कुकडी’चे उन्हाळी आवर्तन सहा जूनला...नगर : ‘कुकडी’च्या उन्हाळी आवर्तनासाठी पुणे येथे...
नगर अर्बन बॅंकेला चाळीस लाखांचा दंडनगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला रिझर्व्ह...
नांदेडमधील कापूस संशोधन केंद्रात...नांदेड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
‘सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिये’...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
दोन वाहनांतील कापूस घेण्याचे आदेश द्या...परभणी : भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) मानवत...
दुग्ध व्यवसायाने घराला आधारशेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वीपासूनच...
पंतप्रधान मोदी यांच्याकडून संशोधक...नाशिक : जिल्ह्यातील वऱ्हाणे (ता.बागलाण) येथील...
ग्रामविकास विभागामार्फत मोफत आर्सेनिक...कोल्हापूर  : नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती...
कापसाच्या वाती करून शासनाची आरती...अमरावती  ः पूर्व विदर्भातील पांढऱ्या...
एचटीबीटीबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा...नागपूर  ः एचटीबीटीचा विषय केंद्र सरकारच्या...