agriculture news in marathi, farmers waiting for tur sold arrears, sangli, maharashtra | Agrowon

सांगलीतील ४५३ शेतकरी तूर विक्री रकमेच्या प्रतीक्षेत
टीम अॅग्रोवन
रविवार, 4 मार्च 2018

सांगली ः जिल्ह्यातील ४५३ शेतकऱ्यांनी ४हजार क्विंटल तुरीची सांगली येथील तूर खरेदी केंद्रावर विक्री केली. तूर खरेदी सुरू होऊन महिना झाला. तूर विक्रीची रक्कम २ कोटी १८ लाख इतकी होते. मात्र, अद्याप एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम वर्ग केली गेलेली नाही. यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तूर विक्रीचे पैसे तातडीने आमच्या खात्यावर वर्ग करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

सांगली ः जिल्ह्यातील ४५३ शेतकऱ्यांनी ४हजार क्विंटल तुरीची सांगली येथील तूर खरेदी केंद्रावर विक्री केली. तूर खरेदी सुरू होऊन महिना झाला. तूर विक्रीची रक्कम २ कोटी १८ लाख इतकी होते. मात्र, अद्याप एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम वर्ग केली गेलेली नाही. यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तूर विक्रीचे पैसे तातडीने आमच्या खात्यावर वर्ग करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

शासनाने तुरीला ५४५० रुपये क्विंटल असा हमीभाव दिला आहे. सांगली बाजार समितीत तूर खरेदी केंद्र आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्‍यातील शेतकरी तुरीची विक्री करण्यासाठी सांगलीला येतात. गेल्यावर्षी तुरीची विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना आठ दिवसांत धनादेश दिले जात होते. मात्र, त्यामध्ये काही अडचणी आल्याने शासनाने चालू वर्षापासून तूर विक्री केली की, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे शेतकऱ्यांनी स्वागतही केले.

त्यामुळे त्वरित पैसे मिळत असल्याने शेतीच्या पुढील कामांसाठी आणि कर्ज भागविण्यासाठी याचा उपयोग होईल. यामुळे आर्थिक नड तातडीने दूर होण्यास मदत होईल. शुक्रवारी (ता. २) फेब्रुवारीपासून तूर खरेदी सुरू झाली. शुक्रवारी (ता. २ मार्च) यास एक महिना पूर्ण झाला आहे. शासनाने तूर खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांची एकूण तूर आणि रक्कम याची माहिती संगणकावर भरली जाते आणि शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाइन रक्कम वर्ग केली जाते, अशी पद्धत आहे. आजमितीस जिल्ह्यात सुमारे ४ हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली असून त्याची रक्कम २ कोटी १८ लाख इतकी आहे. मात्र, एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर तूर खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या तुरीचे पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागेत आहे.

तूर विक्री केलेले पैसे कधी आमच्या खात्यावर जमा होईल, अशी विचारणा शेतकरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे करीत आहेत. आम्ही यादी शासनाकडे पाठवली आहे. पैसे कधी जमा होणार आहेत, याबाबत आम्हाला काहीच माहिती नाही, अशी उत्तरे मिळतात. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. तूर विक्री केलेले पैसे लवकरात लवकर जमा केले नाहीत, तर तीव्र आंदोलन करू अशा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
 

 

 

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...