साहेब, टरबूज विक्रीला परवानगी द्या 

दरवर्षी रमजान महिन्यात टरबुजाला चांगली मागणी राहते. या काळात दरही चांगले मिळतात. यंदा रमजान महिन्याला डोळ्यासमोर ठेवून टरबूज लागवड गेलेल्या शेतकऱ्यांना कोरोनामुळे प्रचंड नुकसान झेलावे लागत आहे.
watermelon
watermelon

अकोला ः दरवर्षी रमजान महिन्यात टरबुजाला चांगली मागणी राहते. या काळात दरही चांगले मिळतात. यंदा रमजान महिन्याला डोळ्यासमोर ठेवून टरबूज लागवड गेलेल्या शेतकऱ्यांना कोरोनामुळे प्रचंड नुकसान झेलावे लागत आहे. आता तर लॉकडाउनमुळे तयार झालेली फळे शेतात खराब होण्याची स्थिती उद्‍भवली आहे. अशा परिस्थितीत तयार असलेली फळे विकण्याची परवानगी दिली जावी, अशी मागणी शेतकरी प्रशासनाकडे करीत आहेत. मात्र कुठलाही अधिकारी प्रतिसाद द्यायला तयार नाही.  उन्हाळा, रमजान महिना पाहता या काळात टरबुजाला मागणी असते. यामुळे शेतकरी भाव मिळेल या अपेक्षेने टरबूज लागवडीचे नियोजन करतात. यंदा अकोला, बुलडाणा जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे. सध्या या फळांची कुठे काढणी सुरू आहे तर कुठे माल तयार होत आहे. अशा परिस्थितीत विक्रीची व्यवस्था गरजेची आहे. परंतु गेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे सर्वत्र बाजार बंद करण्यात आले. शहरांमध्ये सुरू असलेली छोटी-मोठी विक्री दुकाने बंद करण्यात आली. यामुळे व्यापारी आता टरबुजाला विचारायलाही तयार नाही.  बाजारात दर पाचशे रुपयांच्या आत आलेला आहे. टरबूज व्यवस्थापनावर एकरी ५० हजारांवर खर्च होत असतो. आता विक्रीच करण्याची सोय नसल्याने हा खर्च निघण्याची शक्यता दिसत नाही. यामुळेच चिंतातूर झालेले शेतकरी प्रशासनाकडे विक्रीसाठी परवानगी मागत आहेत. सवडद (ता. सिंदखेडराजा) येथील तरुण शेतकरी विनोद देशमुख यांनी बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांना ई-मेल करत शेतातील टरबूज विकण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. तत्पूर्वी त्यांनी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली. अद्याप कोठूनही परवानगीबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नसल्याचे देशमुख यांनी सांगितले. 

प्रतिक्रिया मला माझ्या मालाची लॉकडाउनचे सर्व नियम पाळून विक्री करण्याची परवानगी दिल्यास मी गाडी घेऊन गावात व शहरात गर्दी न करता फिरून विक्री करू शकतो. परवानगी मिळाली तर मी माझे किमान दोन लाख रुपयांचे नुकसान टाळू शकतो.  - विनोद मदनराव देशमुख, शेतकरी, सवडद, जि. बुलडाणा 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com