agriculture news in Marathi farmers want permission for watermelon selling Maharashtra | Page 2 ||| Agrowon

साहेब, टरबूज विक्रीला परवानगी द्या 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 मे 2021

दरवर्षी रमजान महिन्यात टरबुजाला चांगली मागणी राहते. या काळात दरही चांगले मिळतात. यंदा रमजान महिन्याला डोळ्यासमोर ठेवून टरबूज लागवड गेलेल्या शेतकऱ्यांना कोरोनामुळे प्रचंड नुकसान झेलावे लागत आहे.

अकोला ः दरवर्षी रमजान महिन्यात टरबुजाला चांगली मागणी राहते. या काळात दरही चांगले मिळतात. यंदा रमजान महिन्याला डोळ्यासमोर ठेवून टरबूज लागवड गेलेल्या शेतकऱ्यांना कोरोनामुळे प्रचंड नुकसान झेलावे लागत आहे. आता तर लॉकडाउनमुळे तयार झालेली फळे शेतात खराब होण्याची स्थिती उद्‍भवली आहे. अशा परिस्थितीत तयार असलेली फळे विकण्याची परवानगी दिली जावी, अशी मागणी शेतकरी प्रशासनाकडे करीत आहेत. मात्र कुठलाही अधिकारी प्रतिसाद द्यायला तयार नाही. 

उन्हाळा, रमजान महिना पाहता या काळात टरबुजाला मागणी असते. यामुळे शेतकरी भाव मिळेल या अपेक्षेने टरबूज लागवडीचे नियोजन करतात. यंदा अकोला, बुलडाणा जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे. सध्या या फळांची कुठे काढणी सुरू आहे तर कुठे माल तयार होत आहे. अशा परिस्थितीत विक्रीची व्यवस्था गरजेची आहे. परंतु गेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे सर्वत्र बाजार बंद करण्यात आले. शहरांमध्ये सुरू असलेली छोटी-मोठी विक्री दुकाने बंद करण्यात आली. यामुळे व्यापारी आता टरबुजाला विचारायलाही तयार नाही. 

बाजारात दर पाचशे रुपयांच्या आत आलेला आहे. टरबूज व्यवस्थापनावर एकरी ५० हजारांवर खर्च होत असतो. आता विक्रीच करण्याची सोय नसल्याने हा खर्च निघण्याची शक्यता दिसत नाही. यामुळेच चिंतातूर झालेले शेतकरी प्रशासनाकडे विक्रीसाठी परवानगी मागत आहेत. सवडद (ता. सिंदखेडराजा) येथील तरुण शेतकरी विनोद देशमुख यांनी बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांना ई-मेल करत शेतातील टरबूज विकण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. तत्पूर्वी त्यांनी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली. अद्याप कोठूनही परवानगीबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नसल्याचे देशमुख यांनी सांगितले. 

प्रतिक्रिया
मला माझ्या मालाची लॉकडाउनचे सर्व नियम पाळून विक्री करण्याची परवानगी दिल्यास मी गाडी घेऊन गावात व शहरात गर्दी न करता फिरून विक्री करू शकतो. परवानगी मिळाली तर मी माझे किमान दोन लाख रुपयांचे नुकसान टाळू शकतो. 
- विनोद मदनराव देशमुख, शेतकरी, सवडद, जि. बुलडाणा 


इतर अॅग्रो विशेष
कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा पुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत मॉन्सून...
राज्यात ठिकठिकाणी धुव्वांधार पुणे : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे...
दूध उत्पादकांचे उत्पन्न पोचेल २५...गायी म्हशींमधील लिंग विनिश्‍चित वीर्यमात्रांच्‍या...
धरणक्षेत्रांत पावसाचा जोर पुणे : तीन दिवसांपासून कोकणसह, सह्याद्रीच्या...
सरळ कापूस वाण बियाण्यांचा खानदेशात...जळगाव : खानदेशात केळी पट्ट्यात सरळ वाणांची...
मॉन्सूनची वाटचाल सुरूच पुणे : उत्तर भारतात मॉन्सून दाखल झाल्यानंतर...
कृषी सचिव एकनाथ डवले रमले शिवारात नांदेड : राज्याचे कृषी सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे...
विद्यापीठाच्या कांदा बियाणे विक्रीत ‘...नाशिक/नगर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बियाणे...
कृषी पर्यटनातून शेतकऱ्यांना पूरक...पुणे ः सहकार विकास महामंडळाबरोबर झालेल्या...
कोकण, घाटमाथा, विदर्भात अतिवृष्टीचा...पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार...
दूध उत्पादकांना रोज १४ कोटींचा फटका नगर ः लॉककाडउनमुळे दुधाची मागणी घटल्याचे सांगत...
महिला गटाने रुजविले शेती, पूरक...कुशिवडे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) आणि म्हाप्रळ...
डिजिटल सात-बारासाठी ५१ बँकांनी केले...पुणे : शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी डिजिटल...
कांदा बीजोत्पादनात कंपन्याच मालामाल जळगाव : खानदेशात अनेक कांदा बियाणे निर्मात्या...
‘डीएससी’अभावी हजारो कोटी पडून पुणे ः पंधराव्या वित्त आयोगाचा पाच हजार कोटी...
घृष्णेश्‍वर कंपनीची सातत्यपूर्ण उंचावती...एका गटापासून सुरुवात करून विविध उपक्रम, त्यात...
२५ एकरांत शेडनेट्‍स, आदिवासींची सामूहिक...नगर जिल्ह्यात म्हाळुंगी (ता. अकोले) परिसरातील...
विदर्भात पावसाचा जोर पुणे : मॉन्सून उत्तरेकडे सरकत असताना राज्यातील...
लिंबे तोडणीलाही महाग अकोला ः कोरोनामुळे यंदा शेतकऱ्यांना मोठा फटका...
मॉन्सून जोमात, पीककर्ज कोमात पुणे ः दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना...