Agriculture news in marathi; Farmers in Warhad without crop loan | Agrowon

वऱ्हाडातील शेतकरी पीककर्जाविनाच
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

अकोला ः ऑगस्ट महिन्याच्या मध्यानांतही पीक कर्जवाटपाने गती घेतलेली नाही. वऱ्हाडात अकोला जिल्ह्याने २५ टक्के पीक कर्जवाटप केले. मात्र, बुलडाणा जिल्ह्यात जेमतेम १४ टक्के तर वाशीममध्ये २१ टक्क्यांपर्यंत पीक कर्जवाटप पोचले आहे. 

खरीप हंगामाचे अडीच महिने होत आले आहेत. परंतु, अद्यापही बॅंकांनी शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप केलेले नाही. त्यामुळे बॅंकांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी बघायलाच मिळत आहे. शेतकरी वारंवार बॅंकांच्या पायऱ्या झिजवत असताना शेतकऱ्यांच्या खात्यात पीककर्जाची रक्कम मात्र पडत नाही. 

अकोला ः ऑगस्ट महिन्याच्या मध्यानांतही पीक कर्जवाटपाने गती घेतलेली नाही. वऱ्हाडात अकोला जिल्ह्याने २५ टक्के पीक कर्जवाटप केले. मात्र, बुलडाणा जिल्ह्यात जेमतेम १४ टक्के तर वाशीममध्ये २१ टक्क्यांपर्यंत पीक कर्जवाटप पोचले आहे. 

खरीप हंगामाचे अडीच महिने होत आले आहेत. परंतु, अद्यापही बॅंकांनी शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप केलेले नाही. त्यामुळे बॅंकांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी बघायलाच मिळत आहे. शेतकरी वारंवार बॅंकांच्या पायऱ्या झिजवत असताना शेतकऱ्यांच्या खात्यात पीककर्जाची रक्कम मात्र पडत नाही. 

वऱ्हाडातील शेतकऱ्यांना पीक कर्जवाटपाचा आढावा घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली. अकोला जिल्ह्याला १३९८ कोटींचा लक्ष्यांक देण्यात आला होता. आत्तापर्यंत सर्व बँकांमिळून ३६२.३५ कोटींचे वाटप झाले. २५.९१ टक्के पीक कर्जवाटप झाले. वाशीम जिल्ह्यात १५३० कोटींचा लक्ष्यांक असून येथे ३०९.६० कोटी म्हणजेच २०.२४ टक्के वाटप झाले. सर्वाधिक बिकट अवस्था बुलडाणा जिल्ह्यात आहे. येथे १७७३ कोटी ७७ लाख रुपयांचे उद्दिष्ट बॅंकांना देण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत जेमतेम २३३ कोटी १९ लाखांचे पीक   कर्जवाटप झाले. १३.१५ टक्के पीक कर्जवाटप होऊ शकलेले आहे. 

सलग तीन वर्षांपासून पीक कर्जवाटपाची टक्केवारी घसरलेली आहे. एकाही हंगामात ५० टक्क्यांपर्यंतही पीक कर्जवाटप पोचलेले नाही. अकोला, वाशीम जिल्ह्यांत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने पीक कर्जवाटप करण्यात आघाडी घेतल्याने तेथील टक्केवारी अधिक दिसते. मात्र बुलडाण्यात जिल्हा बॅंकेची आर्थिक स्थिती तितकी चांगली नसल्याने या बॅंकेला जेमतेम कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. 

पीक कर्जवाटप वाढले पाहिजे यासाठी सर्वच मंत्र्यांनी आढावा बैठका घेतल्या. जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधकांनी वेळोवेळी बॅंकांना पीककर्ज वाढविण्याबाबत सूचना केल्या. इशारे देण्यात आले. मात्र, पीककर्जाची गती वाढलेली नाही. खरिपासाठी सप्टेंबरपर्यंत पीक कर्जवाटप केले जाते. एप्रिलपासून पीक कर्जवाटपाला सुरवात केली जाते. आत्तापर्यंत साडेचार महिन्यांचा कालावधी लोटला आहे.

जिल्हा लक्ष्यांक वाटप टक्केवारी
अकोला १३९८ ३६२ २५.९१
वाशीम १५३० ३०९ २०.२४
बुलडाणा १७७३ २३३ १३.१५

 

इतर बातम्या
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
मांजरपाड्याचे पाणी दरसवाडी धरणात पोचलेनाशिक : येवल्याच्या दुष्काळी भागात पाणी...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...