शेतकऱ्यांची नाराजी भोवली, १० पैकी ९ जागांवर आघाडी

शेतकऱ्यांची नाराजी भोवली, १० पैकी ९ जागांवर आघाडी
शेतकऱ्यांची नाराजी भोवली, १० पैकी ९ जागांवर आघाडी

पुणे ः कर्जमाफीतील गोंधळ, शेतकरी सन्मान योजनेचे अपयश, शेतीप्रश्‍नांकडे सरकारचे झालेले दुर्लक्ष यामुळे शेतकऱ्यांची नाराजी, निवडणुकीच्या तोंडावर केलेले पक्षबदल, आघाडीचे प्रामाणिक काम आणि शरद पवार यांच्याबद्दलची सहानुभूती या घटकांवर राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात (शहर, पिंपरी चिंचवड वगळता) मुसंडी मारत पुन्हा वर्चस्व मिळविले. २०१४ ला १० पैकी ६ जागांवर युतीचे उमेवार होते. २०१९ ला ९ जागांवर आघाडीने वर्चस्व मिळविले आहे. 

जिल्ह्यात ‘राष्ट्रवादी’चे नेते अजित पवार यांनी बारामतीमध्ये राज्यात सर्वाधिक मताधिक्‍याने विजय मिळविला; तर दिलीप वळसे पाटील यांनी सातव्यांदा सहज विजय मिळविला. भाजपचे राज्यमंत्री बाळा भेगडे, शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा पराभव झाला. प्रतिष्ठेच्या इंदापूरमधील लढतीमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील पराभूत झाले. 

शेतीप्रश्‍नांकडे सरकारचे झालेले दुर्लक्ष, शेतकरी सन्मान योजनेचे अपयश, कर्जमाफीमधील अटी व शर्ती, शेतमालाला बाजारभाव नसणे, कांदा निर्यातबंदीचा शेतकऱ्यांना बसलेला फटका आदी विविध कारणांनी कृषीप्रधान जिल्ह्यातील शेतकरी सरकारवर नाराज होता. ही नाराजी शेतकऱ्यांनी मतदानांतून व्यक्त केल्याचे दिसते.  

जुन्नरमध्ये जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके यांची हकालपट्टी केल्याने, त्यांनी अपक्ष लढत आमदार शरद सोनवणेंना अडचणी निर्माण केल्या. यात सोनवणेंना पराभवाला सामोरे जावे लागले; तर खेडमध्ये भाजपाचे तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांनी बंडखोरी करत आमदार सुरेश गोरे यांना अडचणी निर्माण करत राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते यांचा विजयाचा मार्ग सुकर केला.

मतदारसंघनिहाय विजयी उमेदवार २०१४  २०१९ 
जुन्नर   शरद सोनवणे (शिवसेना)  अतुल बेनके (राष्ट्रवादी) 
खेड  सुरेश गोरे (शिवसेना)  दिलीप मोहिते (राष्ट्रवादी) 
आंबेगाव  दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी)  दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी) 
शिरूर  बाबुराव पाचर्णे (भाजपा)  अशोक पवार (राष्ट्रवादी) 
बारामती  अजित पवार (राष्ट्रवादी)  अजित पवार (राष्ट्रवादी) 
इंदापूर  दत्ता भरणे (राष्ट्रवादी)  दत्ता भरणे (राष्ट्रवादी) 
दौड  राहुल कुल (रासप)  राहुल कुल (भाजपा) 
पुरंदर  विजय शिवतारे (शिवसेना)  संजय जगताप (कॉंग्रेस) 
मावळ  संजय भेगडे (भाजपा)  सुनील शेळके (राष्ट्रवादी) 
भोर  संग्राम थोपटे (कॉंग्रेस)  संग्राम थोपटे (कॉंग्रेस) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com