शेतकरी सन्मान निधी योजनेच्या दोन वर्षपूर्तीच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या
बातम्या
प्रदर्शनातील कृषी ज्ञानाचा खजाना पाहून शेतकरी भारावले
कृषिक २०२१- कृषी तंत्रज्ञान सप्ताहाच्या निमित्ताने शारदानगर (ता. बारामती) येथील कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी गडचिरोली ते रत्नागिरीपर्यंतच्या शेतकऱ्यांनी आज तिसऱ्यादिवशी सकाळपासूनच हजेरी लावल्याचे दिसून आले.
माळेगाव, जि. पुणे ः कृषिक २०२१- कृषी तंत्रज्ञान सप्ताहाच्या निमित्ताने शारदानगर (ता. बारामती) येथील कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी गडचिरोली ते रत्नागिरीपर्यंतच्या शेतकऱ्यांनी आज तिसऱ्यादिवशी सकाळपासूनच हजेरी लावल्याचे दिसून आले. नांदेड , हिंगोली, परभणीपासून अगदी सातारा, कोल्हापूर, चंदगड, बेळगाव, रत्नागिरी पर्यंतचे शेतकरी शेतीची विविध प्रात्याक्षिके पाहून प्रभावित झाल्याचे दिसून आले. त्यामध्ये महिला शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय दिसून आली, हे विशेष होय.
आपल्याला जे शाश्वत शेतीसाठी उपयोगी पडते, त्याची माहिती घेत अनेक शेतकऱ्यांनी आजचा दिवस शेती ज्ञानासाठी वापल्याचे दिसून आले. स्वयंस्फूर्तीने आलेल्या या शेतकऱ्यांनी शेतीची विविध प्रात्याक्षिके व यांत्रिक अवजारे व यांत्रिकी अवजारे पाहण्यास पसंती दिली. बहुतांशी शेतकरी हे आपल्या कुटुंबासमवेत आले होते. शेतीत नवे काहीतरी करू पाहणारे युवा उद्योजकांची प्रयोग दाखविणाऱ्या शास्त्रज्ञांकडे गर्दी करताना दिसून आले.
शुगरबिटच्या नव्या जाती, फुलझाडांच्या नव्या जाती, भाजी पाल्याची रोपे इथपासून सीताफळ, पेरू, कलिंगड बाजारात येऊ पाहत असलेल्या नवनव्या जातींविषयी संबंधित शेतकऱ्यांना असलेले आकर्षण आज या कृषी सप्ताहामध्ये दिसून आले. दरम्यान, शेतकऱ्यांना शेतीशी निगडित माहिती, शिक्षण व संवाद हवा आहे, जो बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रासारख्या संस्थेत अत्यंत संवेदनशिलतेने पुरविला जातो, अशी प्रतिक्रिया रत्नागिरीचे शेतकरी सोमनाथ दहिकोडे यांनी दिली.
शेतीतील समस्या सातत्याने येत राहतात, अर्थात या समस्यांवर मात करण्याचा मार्ग खरेतर प्रदर्शनात येऊन सापडला, असे मत बेळगावमधील प्रयोगशील शेतकरी हेमंत पांड्या यांनी व्यक्त केले. दूरदृष्टीने शेती करण्यासाठी व नव्या कृषी संस्कृतीची, कृषी क्रांतीची दिशा शोधण्यासाठी यंदाचा कृषी तंत्रज्ञान सप्ताह आमच्यासाठी फायद्याचा ठरलेला आहे, अशी भावना माजी कृषी अधिकारी (जालना) सीताराम गाडेकर यांनी व्यक्त केली.
‘‘अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व केव्हीके हे ज्याप्रमाणे महाराष्ट्राची शेतीतील प्रतिमा उंचविण्याचे काम करून देशातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञानातील नवे ज्ञान पुरवत आहे. त्याचप्रमाणे या कृषी प्रदर्शनातून ज्ञान घेतलेल्या शेतकऱ्यांनी इतरांना द्यावे,’’ असे आवाहन संस्थेचे सीईओ नीलेश नलवडे यांनी केले.
आम्ही घरच्या महिलांना आणले आहे, जेणे करून नवे तंत्र महिला शेतकरी खूप लवकर आत्मसात करतात. सहाजिकच त्याचा ज्ञानाचा उपयोग प्रयोगशील शेती करण्यासाठी फायद्याचे ठरते.
- चंद्रकांत पाटील, शेतकरी, सातारा
- 1 of 1536
- ››