Agriculture news in marathi To the farmers who committed suicide Tribute to Chilgavan | Agrowon

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना  चिलगव्हाणमध्ये श्रद्धांजली 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 मार्च 2021

 साहेबराव करपे कुटुंबीयांच्या ३५व्या स्मृतिदिनानिमित्त किसानपुत्रांनी चिलगव्हाण येथे दिवसभर उपवास करून आत्महत्या केलेल्या तमाम शेतकाऱ्यांना मशाल पेटवून श्रद्धांजली अर्पण केली.

यवतमाळ : देशातील पहिली शेतकरी आत्महत्या, अशी नोंद झालेल्या साहेबराव करपे कुटुंबीयांच्या ३५व्या स्मृतिदिनानिमित्त किसानपुत्रांनी चिलगव्हाण येथे दिवसभर उपवास करून आत्महत्या केलेल्या तमाम शेतकाऱ्यांना मशाल पेटवून श्रद्धांजली अर्पण केली.

आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी व शेतकरीविरोधी कायद्यांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी एका नव्या संस्थेची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने चिलगव्हाण येथे उपोषणाच्या समारोप कार्यक्रमात या संदर्भात घोषणा करण्यात आली. 

या संस्थेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. शेतकरी आत्महत्यांकडे समाजाचे व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी साहेबराव करपे कुटुंबीयांचे चिलगव्हाण येथे स्मारक उभे राहावे यासाठी किसानपुत्र आंदोलन सर्व शक्तीनिशी सहकार्य करेल, असाही निर्णय झाला. शेतकरी

आत्महत्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. या बद्दल किसानपुत्र आंदोलनाने चिंता व्यक्त केली. शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती असून, शेतकरीविरोधी कायदे रद्द करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे सांगून शेतकरी आत्महत्यांबद्दल केंद्र आणि राज्य सरकार गंभीर नाही, असा आरोपही करण्यात आला. 

अशी निघाली पदयात्रा 
औंढा नागनाथ ते चिलगव्हाण अशी १२५ किलोमीटरची पदयात्रा करण्याचा निर्धार डॉ राजीव बसरगेकर, रामकिसन रुद्राक्ष, सुभाष कच्छवे आदींनी व्यक्त केला होता. त्यानुसार ‘शेतकरी संवेदना यात्रा’ ११ मार्च रोजी औंढा नागनाथ येथून निघाली व १९ मार्च रोजी चिलगव्हाण येथे पोहचली. नऊ दिवसांच्या या पदयात्रेत अनेक गावांना भेटी दिल्या. औंढा नागनाथला सुरुवात करून येहळेगाव करीत दिग्रस कऱ्हाळे, हिंगोली, खानापूर, कळमनुरी, मालेगाव, बाभळी, शेंबाळ पिंपरी, मुळावा, पळशी, कृषी महाविद्यालय मरसुळ, उमरखेड, सुकळी, नांदगव्हाण, बिजोरा, मुडाना, महागाव, या मार्गाने ही पदयात्रा १९ मार्च रोजी चिलगव्हाणला पोहचली.


इतर ताज्या घडामोडी
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
खानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...
नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...
परभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...
देशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...
कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...
अन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...
आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...
वनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...
नुकसान टाळण्यासाठी  मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...
सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...
सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...
पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...
प्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...
संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...
मॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...
शेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...