agriculture news in Marathi farmers who ditch by traders recovers 2 crore 74 thousand Maharashtra | Page 2 ||| Agrowon

फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांचे २ कोटी ७४ हजार मिळाले

टीम अॅग्रोवन
रविवार, 11 ऑक्टोबर 2020

नाशिक परिक्षेत्रातील शेतकऱ्यांची शेतमाल विक्री पश्चात जी फसवणूक होते, त्यास आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, नाशिक ग्रामीण या जिल्ह्यांत सक्रिय झाले आहे.

नाशिक: नाशिक परिक्षेत्रातील शेतकऱ्यांची शेतमाल विक्री पश्चात जी फसवणूक होते, त्यास आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, नाशिक ग्रामीण या जिल्ह्यांत सक्रिय झाले आहे. या माध्यमातून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना तब्बल २ कोटी ७४ हजार रुपये मिळवून दिले, अशी माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी दिली.

उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या फसवणुकीसंदर्भात पत्रकारांना माहिती देताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक सचिन पाटील उपस्थित होते.

यावेळी दिघावकर यांनी सांगितले की, नाशिक विभागात १८ कोटींच्या वर शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाली असून यामध्ये साधारण ५ हजार शेतकऱ्यांना फटका बसला. नाशिक विभागात ५९३ तक्रारींची नोंद झाली आहे. यापैकी २ कोटी ७४ लाख रुपये तक्रार करण्यापूर्वी मिळाली असून काही व्यापाऱ्यांनी ३ कोटी ६५ लाख परत देण्याची हमी दिली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे अशा संशयित व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यापूर्वी दहा दिवसांची मुदत दिली जाते. त्यानुसार अनेकांना मुदत दिली आहे. त्यास प्रतिसाद मिळत आहे.

दहा एसआयटी पथकांची नेमणूक
उत्तर महाराष्ट्रात शेतकरी फसवणुकीच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यात नाशिक जिल्ह्यात अनेक प्रकरणे आहेत. शेतकरी फसवणुकीचे पैसे मिळविण्यासाठी १० एसआयटी पथके नेमली असून परराज्यातील व्यापाऱ्यांकडून पैसे मिळविण्याचे प्रयत्न पोलीस करणार आहे. तसेच अनेक वकीलही आता शेतकऱ्यांचे मोफत खटले लढवणार आहेत. बाऊन्स धनादेशाचे खटले लढण्यासाठीही वकील पुढे आले आहेत.

जिल्हानिहाय तक्रारी
नाशिक: 
५५९
नगर: 
जळगाव: १७
नंदुरबार: १३
धुळे : २

प्रतिक्रिया
शेतकऱ्याचे घामाचे पैसे बुडवतील त्यांची गाठ माझ्याशी आहे. कायदेशीर जबाबदारीपेक्षाही नैतिक जबाबदारी मोठी समजून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे वसूल करून देईपर्यंत स्वस्थ बसणार नाही. 
-डॉ. प्रतापराव दिघावकर, विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र.


इतर अॅग्रो विशेष
‘महाडीबीटी’ भक्कम; माघार नाहीपुणे ः कृषी विभागाच्या योजना ‘ऑनलाइन’ तंत्रज्ञान...
नांदेड : हळदीचे कंद जमिनीत सडलेनांदेड : गोदावरी नदीच्या पुरामुळे बागायती पिकांना...
हळद निर्यात ऑगस्टमध्ये ११ टक्क्यांनी...पुणे : देशात निर्यातयोग्य हळदीचा साठा उपलब्ध आहे...
‘पंतप्रधान शेतकरी सन्मान’ची जबाबदारी...न्यायडोंगरी, ता. नांदगाव : पंतप्रधान शेतकरी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र...
ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासूनमुंबई : राज्यात २०२१-२२ साठी उसाचा गाळप हंगाम १५...
सांगली जिल्हा बॅंकेच्या चौकशीचे आदेशसांगली ः सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरोधात...
धरणे अद्याप तहानलेलीचपुणे : जून, जुलै महिन्यात पावसाने धुमाकूळ...
कांदा- लसूण शेतीत जरे यांचे देशभर नावबहिरवाडी (ता. जि. नगर) येथील कृषिभूषण...
शास्त्रीय, उत्कृष्ट व्यवस्थापनातून बीटल...सातारा जिल्ह्यातील शेळकेवाडी येथील जितेंद्र शेळके...
‘महाडीबीटी’ प्रकल्प अधांतरीपुणे ः ऑनलाइन कामकाज आणि थेट लाभ हस्तांतर प्रणाली...
राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाजपुणे : पोषक हवामानामुळे राज्यात दोन ते तीन दिवस...
उडदाचे दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : नवीन हंगामातील मूग आणि उडदाची बाजारात आवक...
‘टेंभू’ची १ हजार कोटींची कामे लवकरच...सांगली : दुष्काळी पट्ट्यात शेतीला टेंभू...
‘लेटर टू डेअरी मिनिस्टर’ मोहिमेला मोठा...नगर : दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ऊस...नगर ः राज्यात ऊस लागवडीत महात्मा फुले कृषी...
‘एफआरपी’वरून ऊस पट्ट्यात पुन्हा...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात एक रकमेऐवजी तीन...
निर्यातक्षम बागांची नोंदणी लाखावर...पुणे ः राज्यातील निर्यात वाढविण्यासाठी यंदा एक...
नगदी पिकांना हंगामी पिकांची जोड देते...आपली शेती प्रयोगशील ठेवत मुदखेड (जि. नांदेड)...
केंद्र सरकारकडून खाद्यतेल आयात शुल्कात...नवी दिल्ली ः देशात खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीवर...