agriculture news in Marathi farmers who got GI will be user Maharashtra | Agrowon

‘जीआय’प्राप्त शेतकरी ‘वापरकर्ते’ करणार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

राज्यातील पिकांना भौगोलिक निर्देशांक मिळाले तरी शेतकऱ्यांकडे या पिकाचा अधिकृत वापरकर्ता म्हणून पुरावा नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांना अशी प्रमाणपत्रे मिळवून देण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

पुणे: राज्यातील पिकांना भौगोलिक निर्देशांक मिळाले तरी शेतकऱ्यांकडे या पिकाचा अधिकृत वापरकर्ता म्हणून पुरावा नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांना अशी प्रमाणपत्रे मिळवून देण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

आतापर्यंत राज्यातील १३ संस्थांच्या नावे भौगोलिक निर्देशांक प्रमाणपत्र मिळवण्यात कृषी विभागाला यश आले आहे. त्यासाठी गेल्या सात वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. फलोत्पादन विभागाने यात महत्वाची भूमिका बजावली आहे.

भौगोलिक निर्देशांक अर्थात जीआय (जिओग्रोफिकल इंडिकेशन) मिळालेल्या पिकांना देशी व विदेशी बाजारात लाभ होत असल्याचा दावा केला जातो. मात्र, अशा पिकांना ‘जीआय’ मिळून देखील त्याचे लाभ कार्यक्षेत्रात दिसून येत नाहीत. कारण ‘अधिकृत वापरकर्त्या’ शेतकऱ्यांचीच वानवा आहे. चिन्हांकनाचा फायदा शेतकऱ्यांना व्यापक प्रमाणात मिळण्यासाठी यापूर्वी मोहिम राबविली गेली नव्हती.

‘‘निर्देशांक मिळालेल्या पिकाच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना या पिकाचा अधिकृत वापरकर्ता म्हणून एक प्रमाणपत्र मिळवून देण्याचा मुख्य मुद्दा दुर्लक्षित राहिला. त्यामुळे चिन्हांकन मिळून देखील स्थानिक बाजारात किंवा निर्यातीमध्ये शेतकरी ‘जीआय’च्या नावाखाली आपल्या पिकाचे ब्रॅंडिंग करण्यात पिछाडीवर राहिले आहेत,’’ अशी माहिती एका जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याने दिली.
 
कृषी आयुक्तालयाच्या फलोत्पादन विभागाने ही उणीव दूर करण्याचे ठरवले आहे. शेतकऱ्यांना ‘वापरकर्ता प्रमाणपत्र’ मिळवून देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मोहिमेचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांकडून अर्ज गोळा करून चेन्नईच्या भौगोलिक निर्देशांक कार्यालयाकडे पाठविले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रमाणपत्रे उपलब्ध होतील. ‘‘शेतकऱ्यांना केवळ दहा रुपयात वापरकर्ता होण्याची सुविधा केंद्रीय कृषी मंत्रालयाने उपलब्ध करून दिली आहे.’’ असे सूत्रांचे म्हणणे आहे.

भौगोलिक चिन्हांकन मिळालेले पीक व  संस्थेचे नाव

 • लासलगाव कांदाः बळीराजा शेतकरी गट, नाशिक
 • जळगाव भरीत वांगीः निसर्गराजा कृषी विज्ञान केंद्र, तांदुळवाडी, जळगाव
 • सासवड अंजीरः महाराष्ट्र अंजीर उत्पादक संघ, पुणे
 • सोलापूर डाळिंबः महाराष्ट्र डाळिंब उत्पादक व संशोधन संघ, पुणे
 • सांगली बेदाणाः महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ, सांगली
 • सांगली हळदः सांगली हळद क्लस्टर, सांगली
 • जालना मोसंबीः जालना जिल्हा मोसंबी उत्पादक संघ, जालना
 • बीड सीताफळः बालाघाट सीताफळ संघ, बीड
 • वेंगुर्ला काजूः कोकण काजू समुह, सिंधुदुर्ग
 • घोलवड चिक्कूः महाराष्ट्र काजू उत्पादक संघ,डहाणू
 • मराठवाडा केसरः आंबा उत्पादक संघ, औरंगाबाद
 • कोकण हापूसः केळशी परिसर संस्था, रत्नागिरी

प्रतिक्रिया
भौगोलिक संकेत चिन्हांकनाचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी फलोत्पादन विभागाने पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेण्यासाठी संबंधित संस्थांसोबत मोहिम उघडावी, तसेच पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांशीही समन्वय साधावा, अशा सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आहेत. 
— कैलास मोते, कृषी संचालक (फलोत्पादन व मृदसंधारण विभाग)


इतर अॅग्रो विशेष
मूळ दुखण्यावर इलाज कधी?सरकार कितीही सांगत असले की आम्ही शेतकऱ्यांना...
‘सूक्ष्म उद्योग’ घडवतील मोठा बदल पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन...
केंद्र सरकारचा समितीचा प्रस्ताव...नवी दिल्ली : विज्ञान भवनात झालेली बैठक कोणत्याही...
यंदा हिवाळ्यात गारठा जरा अधिकच राहणारपुणे : चालू वर्षी डिसेंबर ते फेब्रुवारी या हिवाळा...
इथेनॉल प्रकल्प तारण घेऊन कारखान्यांना...पुणे : “राज्याच्या शेती व ग्रामीण अर्थकारणाला...
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ सक्रिय;...पुणे : बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या...
नव्या कायद्यामुळेच मिळाले पैसे;...धुळे : कृषी व पणन सुधारणा कायदा अस्तित्वात...
शेतकरी संघटनांचा उद्या राज्यव्यापी...नगर : केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या...
कापूस खरेदीतील कटती अयोग्य; सीसीआय...जळगाव : कापूस महामंडळ (सीसीआय) शेतकऱ्यांसाठी काम...
राज्यात ‘पणन’ची दहा हजार क्विंटल कापूस...नागपूर : राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी...
मराठवाड्यात कुठे मोहर, तर कुठे...औरंगाबाद : मराठवाड्यातील केसर आंब्याच्या झाडाला...
विविध तंत्रांचा वापर सांगणारी लंबे...बुलडाणा जिल्ह्यातील माळखेड येथील गणेश लंबे यांनी...
संवादातून मिटेल संघर्षकृषी व पणन सुधारणांबाबतच्या तीन नव्या...
हमीभाव ः वादीवाल्यांचा सापळालातूरला पुर्वी वादीवाले लुटारु टोळके असायचे. ते...
केंद्राचा चर्चेचा प्रस्ताव नाकारला;...नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या वतीने...
...येथे कांदा रोपे राखणीसाठी...विसापूर, जि. सातारा  : सोन्याचे दाग-दागिने,...
कृषी विभागात आगामी बदल्या समुपदेशनाने...पुणे : कोविड-१९ साथीमुळे कृषी विभागात यंदा...
बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या...पुणे :  निवार चक्रीवादळाचा प्रभाव निवळत...
कृषी पदव्युत्तर पदवीच्या प्रवेश...पुणे : राज्यातील चारही कृषी विद्यापीठाअंतर्गत...
सातत्य राखलेले पशुपालन ठरले शेतीलाही...यवतमाळ जिल्ह्यातील लोही (ता. दारव्हा) येथील...