पाण्यासाठी शेतकरी करणार पंढरपूर येथे धरणे आंदोलन

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

 सोलापूर  : सांगोला तालुक्‍यातील नीरा उजवा मैल ९३ खालील क्रमांक तीनवरील गावांना उन्हाळ हंगामातील पाणी अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे मिळाले नाही. या पाण्यासाठी तालुक्‍यातील शेतकरी नीरा उजवा पंढरपूर कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन लक्ष वेधणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर मेथवडे फाटा येथे शेतकऱ्यांची बैठक पार पडली. 

नीरा उजवा मैल ९३ खालील क्रमांक तीनवरील सांगोला तालुक्‍यातील संगेवाडी, शिरभावी, धायटी, हलदहिवडी, मांजरी, देवकतेवाडी, मेथवडे, गायगव्हाण, खिलारवाडी,  महूद, उंबरगाव, भवाळी आदी गावांतील शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. अधिकाऱ्यांनी कालवा सल्लागार समितीची बैठक न घेता उन्हाळी हंगामाचे पाणी सोडले आहे. पंढरपूर तालुक्‍यातील लाभक्षेत्रातील अनेक गावांना पाणी मिळाले. परंतु, सांगोला तालुक्‍यात पाणी आल्यानंतर पाणी बंद करण्यात आले. टेल टू हेड पाणी देण्याची व्यवस्था असताना टेलकडील गावांवर मोठा अन्याय होत आहे. तालुक्‍यातील लाभक्षेत्रातील पाणीवापर संस्था व शेतकऱ्यांनी पाणी बाकी भरली असून रीतसर पाणी मागणी अर्ज असताना तालुक्‍याच्या हिश्श्याचे पाणी दिले गेले नाही, या पार्श्‍वभूमीवर या बैठकीत चर्चा झाली. 

दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बोलणी सुरू असून सांगोल्यातील गावांना पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाईल. शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारू नये. आंदोलन न करताही पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागेल, असे नीरा उजवा शाखेचे उपअभियंता माणिक देशमुख यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com