agriculture news in Marathi farmers will get alternative business for farmers Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कृषी पर्यटनातून शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय उपलब्ध : आदित्य ठाकरे

टीम अॅग्रोवन
रविवार, 13 जून 2021

सहकार विकास महामंडळाबरोबर झालेल्या करारामुळे राज्यातील कृषी पर्यटनाला चालना मिळेल. तसेच शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय उपलब्ध होणार असून, त्यांचा आर्थिक स्तर उंचावेल.

पुणे ः सहकार विकास महामंडळाबरोबर झालेल्या करारामुळे राज्यातील कृषी पर्यटनाला चालना मिळेल. तसेच शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय उपलब्ध होणार असून, त्यांचा आर्थिक स्तर उंचावेल, असा विश्‍वास पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. 

राज्यातील कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ (एमसीडीसी) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील श्री एकवीरा देवी मंदिर येथे तसेच राजगड किल्ला येथे रोपवे मार्गाच्या निर्मितीसाठी आर्थिक आणि तांत्रिक सुसाध्यता अहवाल तयार करणे, निविदा व्यवस्थापन प्रक्रिया राबविणे यासाठी देखील भारतीय पोर्ट रेल व रोपवे महामंडळ (आयपीआरसीएल) यांच्यासोबत पर्यटन संचालनालयाचा (डीओटी) सामंजस्य करार शुक्रवारी (ता.११) पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. 

या वेळी पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर, भारतीय पोर्ट रेल व रोपवे महामंडळाचे संचालक अनिलकुमार गुप्ता, सहकारी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे आदी मान्यवर उपस्थित होते. 

राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या, की कोरोनामुळे दीड वर्षापासून प्रत्यक्षात पर्यटन बंद असले तरी भविष्यात राज्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगाने विभागाने अनेक निर्णय घेतले आहेत. राज्याचे बीच शॅक धोरण, कृषी पर्यटन धोरण, कॅराव्हॅन पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे. वल्सा नायर-सिंह म्हणाल्या, की आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन परिषद आयोजित करून आपण जागतिक बाजारपेठेत प्रवेश केला आहे. ज्यास सुमारे २० ते २५ देशांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. रोपवे व कृषी पर्यटन या दोन्ही प्रकल्पांसाठी आयपीआरसीएल आणि एमसीडीसी यांच्या माध्यमातून राज्याच्या पर्यटनात महत्त्वपूर्ण भर पडेल. 

एका वर्षात नियोजन करावे 
एकवीरा देवी मंदिर व राजगड किल्ला ही ठिकाणे राज्याची शक्तिपीठ व शक्तिपीठ आहेत. या ठिकाणी रोपवे झाल्यास भाविक, पर्यटकांसाठी सुविधा निर्माण होणार आहे. आज झालेल्या करारानुसार भारतीय पोर्ट रेल व रोपवे महामंडळाने सर्व बाबींची एका वर्षात पूर्तता करून पुढील वर्षी या दोन्ही ठिकाणी भूमिपूजन करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. पर्यटनातून शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय उपलब्ध होणार आहे, असेही पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले. 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आज हलक्या सरींची शक्यता पुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
पशुचिकित्सा व्यवसायींचा राज्यभर बेमुदत...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पावसाची...पुणे : हवामान विभागाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचा...
पीकविमाधारकांना मिळणार २५ टक्के तात्काळ...पुणेः राज्यात प्रतिकूल परिस्थितीमुळे खरीप...
खोटे बोलण्यासाठी नाही, प्रामाणिक...भिलवडी, जि. सांगली : ‘‘मी तत्काळ मदतीबाबत विचार...
'रेडग्लोब’ द्राक्षवाणात मिळवली ओळखपुणे जिल्ह्यातील खोडद येथील सुहास थोरात यांनी...
उत्पन्नाच्या विविध स्त्रोतांमधून मिळवली...बोरगाव खुर्द (ता.. जि.. अकोला) येथील महेश वानखडे...
शेतकऱ्यांनी वापरले ६५० कोटींचे घरचे...पुणेः राज्यात यंदा सोयाबीनच्या पेऱ्यात मोठी वाढ...
कोकणात हलक्या पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र...
अडीच लाख शेतकऱ्यांच्या जमिनी सावकाराकडे...अमरावती : राष्ट्रीय व खासगी बँकांनी हात आखडता...
धरणक्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
सर्वदूर हलक्या पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या...
पीक विम्यात कुचराई केल्यास नोटिसा काढा...नाशिक: पीकविमा योजनांची संबंधित कंपन्यांच्या...
मत्स्यबीज केंद्रामुळे महिला झाल्या...भिगवण (जि. पुणे) येथील पाच उपक्रमशील महिलांनी...
गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर...सोलापूर ः शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि...
चीनची खत निर्यातीवर बंदी बीजिंग ः चीनमध्ये खतांचे घटलेले उत्पादन, विजेच्या...
राज्याची पीकपेरा नोंद आता शेतकरीच करणार पुणेः सातबारा उतारावरील पीकपेऱ्याची नोंद आता...
निसर्गदूतांच्या सहयोगाने ‘झाडांची भिशी...सोलापुरातील उपक्रमशील डॅाक्टर, इंजिनिअर्स,...
खानदेशात मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...जळगाव : खानदेशात मका पिकाची लागवड यंदा बऱ्यापैकी...
पंधरा दिवस पावसाचा जोर कमी राहणार पुणे : गेल्या पंधरा दिवस कोकण आणि घाटमाथ्यावर...