सातारा : पावणेदोन लाख शेतकऱ्यांना मिळणार नुकसानभरपाई

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा  : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी नुकतीच पीक नुकसानभरपाई जाहीर केली. यानुसार जिल्ह्यातील एक लाख ७८ हजार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार आहे. यात जिरायती क्षेत्र असलेले ९२ हजार ५०४ शेतकरी, बागायती क्षेत्र असलेले ८१ हजार ४४० शेतकरी; तर फळपिकाखालील बाधित क्षेत्रातील ४५२२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. एकूण भरपाईची रक्कम ७६ कोटी ८५ लाखांवर जात असून, बागायती शेतकऱ्यांना ४४.८६ कोटींची भरपाई मिळणार आहे.

अतिवृष्टी आणि मॉन्सूनोत्तर पावसाने जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाने पूर्ण केले. जिल्ह्यात एकूण एक लाख ७८ हजार ४६६ शेतकऱ्यांचे ६१ हजार ७०९ हेक्‍टरवरील जिरायती आणि बागायती पिकांचे नुकसान झाले. याची भरपाईची रक्कम ६४.५४ कोटी रुपये होती. याबाबतचा अहवाल राज्यपालांकडे देण्यात आला होता. राज्यात राष्ट्रपती राजवट असल्याने राज्यपालांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिरायती क्षेत्राकरिता हेक्‍टरी आठ हजार रुपये; तर बागायती क्षेत्राकरिता हेक्‍टरी अठरा हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली.

त्यानुसार जिल्ह्यातील १.७८ लाख शेतकऱ्यांना ७६.८५ कोटींची भरपाई मिळणार आहे. जिरायती पिकांचे ३४ हजार २१५ हेक्‍टर वरील नुकसान झाले होते. यामध्ये ९२ हजार ५०४ शेतकरी बाधित झाले होते. राज्यपालांच्या भरपाई सूत्रानुसार जिरायती क्षेत्रातील शेतकऱ्यांना एकूण २७ कोटी ३७ लाख ७२ हजार रुपयांची भरपाई मिळणार आहे. बागायती क्षेत्रातील २४ हजार ९२५ हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले होते. यातील ८१ हजार ४४० शेतकरी बाधित झाले होते. या शेतकऱ्यांना १८ हजार हेक्‍टरीप्रमाणे एकुण ४४ कोटी ८६ लाख ५८ हजार रुपयांची भरपाई मिळणार आहे. तसेच ४५२२ फळबागाधारक शेतकऱ्यांचे २५६८.२३ हेक्‍टरवरील क्षेत्राचे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना चार कोटी ६२ लाख २८ हजार रुपयांची भरपाई मिळणार आहे.

तालुकानिहाय बाधित क्षेत्र आणि मिळणारी भरपाईची रक्कम (रुपये,कोटी) ः जिरायत क्षेत्र : सातारा : ६०२६.१४ (४.८२ कोटी), कोरेगाव : १३६९.२९ (१.०९ कोटी), जावली : ५६६.९२ (४५.३५ लाख), कऱ्हाड : ६१३.६८ (४९.०९ लाख), पाटण : २८३५.१८ (२.२६ कोटी), वाई १२१५ (९७.२० लाख), महाबळेश्‍वर : १११६.०२ (८९.२८ लाख), खंडाळा : २७३८.५५(२.१९ कोटी), फलटण : २३२३.२६ (१.८५ कोटी), माण : ९२२४ (७.३७ कोटी), खटाव : ६१८६.८५ (४.९४ कोटी).

फळबागधारकांना साडेचार कोटींची भरपाई फळबागांच्या नुकसानीत कोरेगावमध्ये ५३.१६, कऱ्हाडमध्ये ५.८४, वाईत २.९५, महाबळेश्‍वरला तीन, खंडाळ्यात १०.१, फलटणला १५४५.९९, माणमध्ये ४८४, खटावमध्ये ४६२.३९ हेक्‍टर असे एकुण २५६८.२३ हेक्‍टरवरील बागांचे नुकसान झाले आहे. याची १८ हजार रुपयांप्रमाणे भरपाईची रक्कम चार कोटी ६२ लाख २८ हजार इतकी होते.

बागायती क्षेत्र व कंसात भरपाई तालुकानिहाय ः सातारा : ४२५.८९ (७६.६६ लाख), कोरेगाव : २२१२.८३ (३.९८ कोटी), जावली : १७.८५(३.२१ लाख), कऱ्हाड १०२०.०२(१.८३ कोटी), पाटण : १६४.६८(२९.६४ लाख), वाई ४९४.११(८८.९३ लाख), महाबळेश्‍वर : २३४.९४ (४२.२८ लाख), खंडाळा : १८७६.४९ (३.३७ कोटी), फलटण : ११,६९७.२१ (२१.०५ कोटी), माण : ३३००(५.९४ कोटी), खटाव :३४८१.४६ (६.२६ कोटी).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com