agriculture news in marathi, Farmers will get Kagpur traps on the principle of grant | Agrowon

शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर कामगंध सापळे मिळणार

टीम अॅग्रोवन
रविवार, 15 जुलै 2018

जळगाव : बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने तयारी केली असून, बोंड अळीच्या पतंगांना अटकाव करण्यासाठी कामगंध सापळे उपलब्ध केले आहेत. एकरी पाच सापळे शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर वाटप करण्यात येणार आहेत.

जळगाव : बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने तयारी केली असून, बोंड अळीच्या पतंगांना अटकाव करण्यासाठी कामगंध सापळे उपलब्ध केले आहेत. एकरी पाच सापळे शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर वाटप करण्यात येणार आहेत.

गतवर्षीच्या हंगामात कापूस पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्नावर परिणाम झाला. जिल्ह्यात कापसाची सर्वाधिक लागवड असून, गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी कामगंध सापळ्यांचे तातडीने वितरण केले जावे, अशी सूचना जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी कृषी समितीच्या मासिक सभेत केली.
जिल्हा परिषदेचे सभापती आणि उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सदस्यांसह कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी, कृषी उपसंचालक अनिल भोकरे आदी उपस्थित होते. या वेळी कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय काळजी घ्यावी लागेल, यावर चर्चा करण्यात आली.

असे करा बोंड अळीचे नियंत्रण  
बोंड अळी रोखण्यासाठी निंबोळी अर्कची फवाणी केल्यास अळीचा प्रसार रोखणे शक्‍य आहे. लिंबाच्या पानापासून अर्क तयार करून फवारणी केल्यास त्याचा उपयोग होतो. यासोबतच शेतात पक्षी थांबे (ॲण्टीने) लावावेत. यावर पक्षी बसून ते अळी वेचून खातील आणि बोंड अळीचे नियंत्रण होईल. कामगंध सापळे, निंबोळी अर्क, पक्षी थांबे, सापळा पिके याचा उपयोग करून गुलाबी बोंड अळीवर नियंत्रण करता येईल, अशी माहिती या वेळी देण्यात आली.

भडगाव तालुक्‍यात आढळले पतंग
गुलाबी बोंड अळीचे संकट कायम असल्याचा मुद्दा चर्चेत आला. त्या वेळी भोकरे म्हणाले, ‘‘आम्ही भडगाव तालुक्‍यात कापसाच्या शेतीला भेट दिली आहे. तेथे काही शेतांमध्ये गुलाबी बोंड अळीचे पतंग आढळून आले आहेत. पुढे गुलाबी बोंड अळी येऊ शकते. त्यामुळे उपाययोजना तातडीने व्हाव्यात. त्यानुसार जनजागृती केली जात आहे.``


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ४३ हजार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा...सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका...
विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ....बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक...
चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून...चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात...
जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले...मुंबई : राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा...
खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसादजळगाव  ः जिल्ह्यात तूर नोंदणीसंबंधी १०...
नागपूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकाचे चांगलेच...
मागासवर्गीयांपर्यंत फडणवीस सरकारच्या...मुंबई: राज्यात गत सरकारच्या कार्यकाळात...
सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी निधी...मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण...
औरंगाबादेत पाणीप्रश्‍नावर भाजपचे उद्या...औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या...
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचे...जळगाव  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
जामनेरातील टेक्स्टाइल पार्क रखडलेजळगाव ः खानदेशातील कापसावर अधिकाधिक प्रक्रिया...
पुणे जिल्हा परिषद कृषी सभापतिपदी...पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य...
पुणे बाजार समितीत कांद्याची विक्रमी ३२५...पुणे ः नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक...
नियोजनात हिवरे बाजार देशाचे मॉडेल ः डॉ...नगर ः हिवरे बाजार हे दूरदृष्टी नियोजनाचे देशाचे...
वऱ्हाडात रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...अकोला  ः यंदा वऱ्हाडात रब्बीची लागवड बुलडाणा...
राज्यात आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम...मुंबई : ग्रामविकास विभागामार्फत राज्यात कै. आर....
हृदयविकारामुळे होणारे मृत्यू...मुंबई : हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्याच्या...