agriculture news in Marathi farmers will get new 16 crop varieties Maharashtra | Page 2 ||| Agrowon

शेतकऱ्यांना मिळणार पिकांचे नवे १६ वाण

टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांना आतापर्यंत विविध पिकांसाठी ६८५ वाण उपलब्ध करून दिले आहेत. यंदा अजून १६ नवीन वाण तयार करण्यात यश आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पुणे: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांना आतापर्यंत विविध पिकांसाठी ६८५ वाण उपलब्ध करून दिले आहेत. यंदा अजून १६ नवीन वाण तयार करण्यात यश आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

कृषी शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, ‘‘१९७३ पासून विद्यापीठांकडून संशोधन सुरू आहे. या संशोधनातून विविध पीक वाण, कृषी यंत्रे, शेती अवजारे तसेच कृषी तंत्रज्ञानाच्या शिफारशी हाती आल्या. संशोधन खुले केल्यामुळे शेतकऱ्यांच्या उन्नतीमध्ये मोठा हातभार लावला गेला आहे. आतापर्यंत चारही विद्यापीठांनी एकूण पाच हजार ८०३ बाबी शोधल्या अथवा विकसित केल्या आहेत. यात ६८५ वाण, ४९८६ शिफारसी आणि १३२ यंत्रे-अवजारांचा समावेश आहे.’’ 

‘‘विद्यापीठाने नवे वाण तयार केले किंवा यंत्राचा शोध लावल्यास त्याचा प्रसार मात्र परस्पर केला जात नाही. त्यासाठी विद्यापीठाला ‘संयुक्त कृषी संशोधन व विकास समिती’ची ‘जॉईंट अॅग्रेस्को’ची मान्यता घ्यावी लागते. यंदा समितीसमोर विद्यापीठांकडून २०८ नव्या शिफारशी मांडल्या जात आहेत. चारही विद्यापीठांनी शोधलेल्या नव्या १६ पीक वाणांची शास्त्रीय माहिती समितीला दिली जाणार आहे. समितीने शिक्कामोर्तब केल्यास या संशोधनाची उपलब्धता शेतकऱ्यांसाठी होईल. अर्थात, मान्यतेनंतर शेतकऱ्यांच्या हातात संशोधन जाण्यास अजून वेळ जाणार आहे. 

राज्यातील विद्यापीठांच्या इतिहासात राहुरीमधील विद्यापीठ ब्रिटिश काळापासून संशोधनाचा वारसा चालवत आहे. त्यामुळे संशोधन व प्रसारित होणाऱ्या वाणांची संख्या यात राहुरी विद्यापीठ आघाडीवर आहे. दरम्यान, राज्याच्या कृषी क्षेत्रात ''विकेल ते पिकेल'' असे धोरण राबविण्याचा प्रयत्न महाआघाडी सरकारकडून धरला आहे. त्यामुळे या धोरणाला पूरक ठरणारे संशोधन पुढे यावे, असाही आग्रह सरकारी यंत्रणेकडून होत आहे. त्यामुळे विद्यापीठांमधील संशोधनाला संबंधित कुलगुरू वेगळी दिशा देतात की संशोधनाची पारंपरिक चौकट टिकवून ठेवतात, याकडे शास्त्रज्ञांचे लक्ष लागून आहे.


इतर अॅग्रो विशेष
ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू बागायतदार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले...
आश्वासक रब्बीही ठरतोय आव्हानात्मकखरीप हंगामात झालेली अतिवृष्टी आणि लांबलेल्या...
खासगीकरणाचा वारू किती उधळणार?सरकारने उद्योगधंद्यात सामील असता कामा नये, अशी...
खानदेशात पपई दराचा पुन्हा तिढाजळगाव : खानदेशात पपईचे पीक बऱ्यापैकी काढणीवर आले...
आंदोलक शेतकऱ्यांचा दिल्लीत तळनवी दिल्ली  : दिल्ली पोलिसांनी परवानगी...
राज्यातील आठ जिल्ह्यांत बिबट्याची दहशतनगर : कोरोनामुळे, त्यानंतर पावसाने अडचणीत आलेल्या...
आई-वडिलांकडे दुर्लक्ष केल्यास ३० टक्के...नगर ः आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या जिल्हा परिषद...
कापूस गाठींच्या दरात सुधारणाजळगाव ः जगातील वस्त्रोद्योग ९५ ते ९७ टक्के...
सोयाबीनचे ३६ लाख क्विंटल बियाणे...पुणे : राज्यातील शेतकरी बाजारातून दहा लाख क्विंटल...
काही ठिकाणी हलक्या सरी पुणे : निवार चक्रिवादळ निवळत असताना जमिनीवरून...
सामाजिक दायीत्वातून जीवनात फुलले ‘...आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी आणि...
सोयाबीन दरात मंदीची शक्यता नाही पुणे ः केंद्र सरकारने गुरुवारी (ता.२७) कच्च्या...
राज्यात १०९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत १४९...
शेतकरी मोर्चावर केंद्राकडून दडपशाही :...नगर : केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या...
सव्वा दोन हजार कोटी रब्बीसाठी कर्जवाटप पुणे : रब्बी हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना १६...
हिंद महासागरात कमी दाबाचे क्षेत्र पुणे:  ‘निवार’ चक्रीवादळ निवळत नाही तोच...
ऐंशी प्रकारचा प्रक्रियायुक्त कोकणमेवासिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहिबाव (ता.देवगड) येथील...
मार्केटिंग, ब्रॅंडिंगद्वारे अळिंबी...बेलखेड (जि. अकोला) येथील विलास व छायाताई या कुयटे...
‘सूक्ष्म सिंचन’प्रकरणी चौकशी...औरंगाबाद/जालना : जालना जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन...
बीजोत्पादन क्षेत्र नोंदणीला मुदतवाढपुणे : राज्यात रब्बी हंगामासाठी घेतल्या जाणाऱ्या...