agriculture news in Marathi, Farmers will get sufficient and on time BT seed, Maharashtra | Page 3 ||| Agrowon

शेतकऱ्यांना यंदा वेळेत, पुरेसे बीटी बियाणे

टीम अॅग्रोवन
रविवार, 11 मार्च 2018

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना यंदा बियाणे कंपन्यांकडून बीटी बियाणे पुरेसे व वेळेवर उपलब्ध होईल. गेल्या हंगामापेक्षा बीटी बियाण्यांची किमान पाच लाख पाकिटे जादा पुरविली जातील, असा दावा कृषी विभागाने केला आहे. 

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना यंदा बियाणे कंपन्यांकडून बीटी बियाणे पुरेसे व वेळेवर उपलब्ध होईल. गेल्या हंगामापेक्षा बीटी बियाण्यांची किमान पाच लाख पाकिटे जादा पुरविली जातील, असा दावा कृषी विभागाने केला आहे. 

गेल्या हंगामात राज्यात एक कोटी ६० लाखांच्या आसपास बियाण्यांचा पुरवठा झाला होता. शेतकऱ्यांच्या मागणीच्या तुलनेत यंदादेखील पुरवठा चांगला राहील. पाच लाख पाकिटांची जादा उपलब्धता असल्यामुळे बियाण्यांचा काळाबाजार होणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. बीटी बियाण्यांची किंमत गेल्या हंगामात प्रतिपाकिट ८०० रुपये होती. राज्यातील कापूस बियाण्यांपैकी ९८ टक्के वाटा बीटीच्या बीजी-२ वाणांचा आहे. गेल्या हंगामात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव या वाणावर झाल्यामुळे सर्व कंपन्यांना नुकसान भरपाईच्या कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागले आहे.

 ‘‘कृषी विभाग काहीही दावा करीत असले तरी बीटी बियाण्यांचा वेळेत पुरवठा होतो की नाही याविषयी आम्हाला शंका आहे. खानदेशातील शेतकऱ्यांना मे महिन्यापासूनच बीटी बियाण्यांची गरज असते. तथापि, कृषी विभागाने अजून कायदेशीर बाबींमध्येच कंपन्यांना बांधून ठेवले आहे. बीटी बियाण्यांची किंमत, पाकिटाचा नमुना, या संदर्भातील कायदेशीर प्रमाणपत्र वितरण या सर्व आघाडयांवर कृषी विभागाने दिरंगाई केलेली आहे,’’ असे कंपन्यांच्या सूत्रांचे म्हणणे आहे. 

यंदा राज्यात जनुकीय तंत्रज्ञान मान्यता समितीने अर्थात जीईसीने मान्यता दिलेल्या बीटी बियाण्यांच्या मुळ नावासमोर ‘ब्रॅंडनेम’ न टाकण्यास कंपन्या तयार झालेल्या आहेत. मात्र, कायद्यानुसार नवे परवाने देण्याची प्रक्रिया कृषी आयुक्तालयाने अजूनही सुरू केलेली नाही.

जीईसीनेने बीटी कपाशी बियाण्याच्या मान्यताप्राप्त मूळ नावात राज्यातील कंपन्या बदल करून आकर्षक  ‘ब्रॅंडनेम’ने बीटी बियाणे विकत होत्या. कृषी आयुक्तालयाने या पद्धतीला चाप लावून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. ‘ब्रॅंडनेम’ला मान्यता देणारे करार मार्केटिंग कंपनी व मूळ बियाणे उत्पादक कंपन्यांसमवेत केले होते. या करारांना कृषी आयुक्तालय आधी मान्यता देत होते. यंदा तशी मान्यता देण्याची पध्दत बंद करण्यात आलेली आहे.  

ब्रॅंड मार्केटिंगचे परवाने गेले 
पण नव्या पद्धतीला उशीर

ब्रॅंडनेममुळे शेतकऱ्यांमध्ये होत असलेला गोंधळ मिटवण्यासाठी ७४ कंपन्यांचे ‘ब्रॅंड मार्केटिंग परवाने’ रद्द केले आहेत. मात्र, नव्या पद्धतीचे नियोजन करण्यास उशीर होत असल्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार नाही याची काळजी कृषी विभागाने घेण्याची आवश्यकता आहे, असे मत एका बियाणे कंपनीतील अधिकाऱ्याने व्यक्त केले. 


इतर अॅग्रो विशेष
शेती. शिक्षण, विकासकामांतून पुढारलेले...भाटपुरा (जि.धुळे) गावाने सिंचनाचे शाश्‍वत स्त्रोत...
केळी पीलबागेचे व्यवस्थापन, खर्च कमी... माझी काळी कसदार दहा एकर शेती आहे. दोन...
‘अम्फान’ चक्रीवादळ निवळले; पश्‍चिम...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले ‘अम्फान’...
मुंबई बाजार समितीत ‘ई-नाम’ नावापुरतेच मुंबई: शेतकऱ्यांना ऑनलाइन आपला माल विकता यावा आणि...
कोरोनाग्रस्तांच्या संख्येचा देशात नवा...नवी दिल्ली : मे महिना सुरू झाल्यापासून देशात...
राज्यात ‘रोहयो’च्या कामांवर ६ लाख मजूर मुंबई : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यात...
कीडनाशकांवर बंदीबाबत उद्योगातून तीव्र...पुणे : केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या २७ रासायनिक...
काढणी-मळणी यंत्रांना मागणी वाढण्याची...पुणे: कोविड १९ साथीनंतर तयार झालेल्या आपत्कालिन...
विदर्भात उष्ण लाटेचा इशारा पुणे  : बंगाल उपसागरात आलेल्या ‘अम्फाम’...
वर्धा जिल्ह्यात १५०० शेतकरी...वर्धा ः बेभरवश्‍याच्या शेती व्यवसायाने अनेकांची...
बियाणे बदल, संतुलित खत व्यवस्थापनातून...खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. सध्या...
तूर विक्रीपोटी शेतकऱ्यांचे पावणेदोनशे...नगर ः शासकीय हमीभाव केंद्रांवर तूर विक्री...
कुक्कुटपालन, परसबागेने दिली आर्थिक साथचिंचघरी (ता.चिपळूण,जि.रत्नागिरी) येथील अंजली...
‘अम्फान’ चक्रीवादळ किनाऱ्याला धडकलेपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘अम्फान’...
देशात २७ कीडनाशकांवर बंदी; हरकतीही...नवी दिल्ली : केंद्रीय कृषी मंत्रालयाने भारतात...
`अम्फान’ महाचक्रीवादळ आज धडकणार पुणे: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘अम्फान’...
राज्यात सहा लाख क्‍विंटल कापसाची खरेदी अमरावती ः शेतकऱ्यांच्या वाढत्या रेट्यामुळे अखेर...
उन्हाचा चटका, उकाडा वाढणार; अकोला ४४.८...पुणे: राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने कमाल तापमानात...
मॉन्सूनची वाटचाल अद्याप जैसे थे पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...
कापूस विक्रीकरीता शेतकरी मर्यादेची अट...नागपूर ः कापूस खरेदीकरीता असलेली शेतकरी मर्यादेची...