agriculture news in Marathi, farmers will plant 21 lac trees, Maharashtra | Agrowon

‘कन्या वनसमृद्धी योजने’अंतर्गत शेतकरी लावणार 21 लाख झाडे

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 जुलै 2019

मुंबई : शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर तिच्या जन्माचे स्वागत म्हणून तिच्या नावाने शेतात, शेतबांधावर १० वृक्षांची लागवड करण्याचा संस्कार वन विभागाने ‘कन्या वनसमृद्धी योजने’अंतर्गत घालून दिला. या योजनेने शेतकऱ्यांच्या लेकीचे तिच्या नावाने लावल्या जाणाऱ्या झाडाशी असलेले नाते अधिक दृढ केले. योजनेत नमूद केल्याप्रमाणे ग्रामपंचायतीमार्फत ५ सागाची तर ५ फळझाडांची रोपे देण्यात येणार आहेत. ३३ कोटी वृक्ष लागवडीत ही २१ लाख ५९ हजार ५३० झाडे शेतकऱ्यांच्या लेकीच्या नावाने लावली जाणार आहेत.

मुंबई : शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर तिच्या जन्माचे स्वागत म्हणून तिच्या नावाने शेतात, शेतबांधावर १० वृक्षांची लागवड करण्याचा संस्कार वन विभागाने ‘कन्या वनसमृद्धी योजने’अंतर्गत घालून दिला. या योजनेने शेतकऱ्यांच्या लेकीचे तिच्या नावाने लावल्या जाणाऱ्या झाडाशी असलेले नाते अधिक दृढ केले. योजनेत नमूद केल्याप्रमाणे ग्रामपंचायतीमार्फत ५ सागाची तर ५ फळझाडांची रोपे देण्यात येणार आहेत. ३३ कोटी वृक्ष लागवडीत ही २१ लाख ५९ हजार ५३० झाडे शेतकऱ्यांच्या लेकीच्या नावाने लावली जाणार आहेत.

 २०१७-१८ आणि २०१८-१९ या दोन वर्षांच्या काळात ग्रामपंचायत क्षेत्रात साधारणत: ५ लाख ६५ हजार ६७१ मुलींचा जन्म झाला. त्यापैकी योजनेत २ लाख १५ हजार ९५३ इतके ऐच्छिक लाभार्थी निश्चित करण्यात आले. 
ज्या शेतकरी दांपत्याच्या घरी मुलगी जन्माला येईल त्यांना वन विभागाकडून पाच सागाची, तर पाच फळझाडांची रोपे प्रोत्साहन म्हणून दिली जातात. ५ सागाच्या रोपांशिवाय दिल्या जाणाऱ्या फळझाडांच्या रोपांमध्ये २ रोपे आंब्याची, १ रोप फणसाचे, १ रोप जांभळाचे तर एक रोप चिंचेचे आहे. भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन वृक्षांची निवड करण्यात आली आहे.

मुलीच्या जन्माबरोबर वृक्ष लावल्यास मुलगी जशी मोठी होईल, तसे वृक्षही मोठे होत जातील. तिच्या लग्नापर्यंत हे वृक्ष मोठे झालेले असतील. फळांनी लगडलेले असतील. त्यातून पर्यायी उत्पन्नाचा स्रोतदेखील विकसित होऊ शकेल. सागाच्या वृक्षांपासून मिळणाऱ्या उत्पन्नातून तिच्या विवाहाच्या वेळी आवश्यक असणारी पैशांची निकडही भागवता येऊ शकेल.

शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या मुलीच्या पालकांनी मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीच्या ठिकाणी मुलीच्या नावाची नोंद करावयाची आहे. त्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीकडे विहित नमुन्यात या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावयाचा आहे.

पहली बेटी धन की पेटी, दुसरी बेटी तूप रोटी असे सांगून घरात जन्माला येणाऱ्या लेकीचे स्वागत करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीने घालून दिली आहे. मुळातच मुला-मुलीत फरक न करता मुलीच्या जन्माचे स्वागत करायला सांगणारा हा विचारच खूप महत्त्वाचा आहे. याच विचाराला अधिक सशक्त करण्याचे काम विविध स्तरांवरून होत असताना शेतकऱ्यांच्या घरी जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावाने दहा झाडे देण्याचा वन विभागाचा हा निर्णय खऱ्या अर्थाने समाधान देणारा आहे.


इतर अॅग्रो विशेष
कोल्हापूर जिल्ह्यात एकरकमी एफआरपी...कोल्हापूर : नव्या सरकारकडून कर्जमाफीची शक्यता...
हिवाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभनागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला...
कापूस वेचणी यंत्राचा पर्याय कधी मिळणार...अमरावती ः राज्यात कापसाचे सरासरी सुमारे ४० लाख...
...आता बटाट्याचीही टंचाईकोल्हापूर: कांद्यापाठोपाठ आता बाजारपेठांमध्ये...
कर्जमाफीची `कट ऑफ डेट` ३१ ऑगस्ट ठेवासोलापूर : युती सरकारने दीड लाखाची कर्जमाफी देऊनही...
गारठ्यात हळूहळू वाढपुणे  ः कोरड्या हवामानामुळे किमान तापमानात...
गरजेनुसार दर्जेदार शेतीयंत्रांची...जोगवडी (ता. बारामती, जि. पुणे) येथील राजेभोसले...
सोयाबीन दर विक्रमी पातळी गाठण्याचे संकेतनवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या सोयाबीन...
`उज्ज्वला` योजनेत मोठा भ्रष्टाचारनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी...
गारठा पुन्हा वाढणारपुणे  ः राज्यात अंशतः ढगाळ हवामान असून...
पूरबाधित ऊस तोडीस कारखान्यांकडून टाळाटाळपुणे  ः राज्यातील गाळप हंगाम सुरू होऊन...
नाशिक जिल्ह्यात द्राक्षमणी पोखरणाऱ्या...नाशिक  : जिल्ह्यात द्राक्ष पीक फुलोरा व मणी...
मराठवाड्यातील ५५ प्रकल्प कोरडेचऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमधील पावसाने दुष्काळाने...
पंजाबचे पशुपालक वापरतात सुधारित तंत्रलुधियाना (पंजाब) येथे प्रोग्रेसिव्ह डेअरी...
शेती, दुग्धव्यवसायाने बनविले...कोल्हापूर जिल्ह्यातील शेळेवाडी (ता. राधानगरी)...
म्हणे शेतात, पीक असल्याने वीज जोडणीस...अमरावती  ः शेतात पीक असल्यामुळे शेतकरी वीज...
देशी गोसंगोपन, गांडूळखतासह दूध...सातारा जिल्ह्यातील कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड)...
दर्गनहळ्ळी येथे वाढलाय पक्ष्यांचा...सोलापूर : पूर्वी सूर्यकिरणांसोबतच पक्ष्यांचा...
अवकाळी पावसामुळे बाधितांसाठी साडेचार...मुंबई : ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांतील अवकाळी...
डाळिंब बियाच्या तेलापासून ‘सॉफ्टजेल...सोलापूर ः येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने...