Farmers will sell live vegetables in 6 places in Nagpur
Farmers will sell live vegetables in 6 places in Nagpur

नागपूरात शेतकरी २४ ठिकाणी करणार थेट भाजीपाला विक्री

नागपूर ः महात्मा फुले भाजी बाजार (कॉटन मार्केट) परिसरात भाजीपाला खरेदीसाठी होणारी गर्दी नियंत्रणाकरिता आता शहरात २४ ठिकाणी भाजीपाला विक्री केली जाणार आहे. महापालिका आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी हा निर्णय घेतला असून त्याअंतर्गंत केवळ शेतकऱ्यांना थेट भाजीपाला विक्री करता येईल.

नागपूर ः महात्मा फुले भाजी बाजार (कॉटन मार्केट) परिसरात भाजीपाला खरेदीसाठी होणारी गर्दी नियंत्रणाकरिता आता शहरात २४ ठिकाणी भाजीपाला विक्री केली जाणार आहे. महापालिका आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी हा निर्णय घेतला असून त्याअंतर्गंत केवळ शेतकऱ्यांना थेट भाजीपाला विक्री करता येईल. 

केंद्र सरकारने १४ एप्रिलपर्यंत २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यासोबतच कोणत्याही खरेदीच्यावेळी सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कॉटनमार्केटमधील भाजी बाजारात हे दिशानिर्देश पाळणे शक्‍य होणार नाहीत. याच जाणीवेतून महापालिका आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी शहरात २४ ठिकाणी थेट शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीकरीता जागा उपलब्ध करुन दिल्या आहेत. याच ठिकाणावरुन ग्राहकांनी भाजीपाला खरेदी करावी, असे आवाहन देखील श्री. मुंढे यांनी केले आहे. विक्रेत्यांनी ‘कोरोना’ प्रतिबंधात्मक उपायांवर भर द्यावा. त्यासोबतच इतरही काही अटी घालून देण्यात आल्या आहेत.

या ठिकाणी मिळेल भाजीपाला

  • लक्ष्मीनगर झोन ः जयताळा आठवडी बाजार.
  • धरमपेठ झोन ः रामनगर मैदान, यशवंत स्टेडियम.
  • हनुमान नगर झोन ः रेशीमबाग मैदान, कलोडे महाविद्यालय बेलतरोडी रोड इंद्रप्रस्थ सोसायटीची जमीन, ढगे यांच्या बंगल्याजवळ पिंपळा रोड.
  • धंतोली झोन ः उंटखाना मैदान टाटा कॅपिटल हाईटसमोर, राजाबाक्षा मैदान, भगवान नगर मैदान पोस्ट ऑफिसवह, बालाजी नगर मैदान वेलू कॉर्नरजवळ, रेणुका विहार कॉलनी मौन, नरेंद्र नगर एन.आय.टी. मैदान.
  • गांधीबाग झोन ः दिघोरीकर मैदान जुना बगडगंज, मनपा शाळा नवी शुक्रवारी मॉडेलमिल चौक गाडीखाना.
  • लकडगंज झोन ः सरदार वल्लभाई पटेल मैदान कच्छीविसा भवन जवळ सतनामीनगर, भास्कर व्यास मैदान पूर्व वर्धमान नगर.
  • आसीनगर झोन ः एच.आर. कॅन्सर हॉस्पिटल जवळ कळमना रिंग रोड दीपक नगर उप्पलवाडी रोड.
  • मंगळवारी झोन ः नारा रोड उजव्या बाजूला नारा. क्रिष्णाधाम झिंगाबाई टाकळी, गुमान लॉन गोरेवाडा.
  • असे आहेत विक्रीचे निकष

  • सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
  • गर्दीवर नियंत्रणासाठी मार्कींग.
  • मास्क, सॅनिटायजरचा वापर.
  • भाजीपाला वाहतुकीच्या वाहनासोबत आरटीओ नियमानुसार सर्व कागदपत्रे.
  • वाहन चालकाचा परवाना असावा.
  • वाहन चालकास सर्दी, खोकला, ताप जाणवल्यास त्याने तत्काळ शासकीय रुग्णालयात तपासणी करावी.
  • सदरचे वाहनाचा वापर केवळ भाजीपाला वाहतुकीसाठीच वापरता येईल.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com