आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील इसुका दार्सी या गावातील शेतकरी जी.
अॅग्रो विशेष
ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत
मागील दोन दिवसांतील थंड वारे, ढगाळ वातावरण यामुळे द्राक्षबागायतदार चिंतेत आहेत. ढगाळ वातावरणामुळे भुरी, द्राक्षकूज आणि मणीगळ होण्याची शक्यता असल्याने उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सांगली ः : मागील दोन दिवसांतील थंड वारे, ढगाळ वातावरण यामुळे द्राक्षबागायतदार चिंतेत आहेत. ढगाळ वातावरणामुळे भुरी, द्राक्षकूज आणि मणीगळ होण्याची शक्यता असल्याने उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हवामान वेगाने बदलत आहे. बदलत्या वातावरणाचा फटका द्राक्षपिकाला बसण्याची शक्यता आहे. फुलोरा अवस्थेमध्ये असलेल्या बागांमध्ये द्राक्षकूज, मणीगळ होण्याची शक्यता आहे. याशिवाय वातावरण निवळल्यानंतर द्राक्षबागेमध्ये भुरीचा प्रादुर्भाव होण्याची भीती असल्याने बागायतदार धास्तावले आहेत. आधीच यावर्षी द्राक्ष उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे आणि त्यातच बदलत्या हवामानाचा आणखी फटका बसण्याची शक्यता आहे.
सध्या परिपक्व झालेल्या द्राक्षबागांमध्ये ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाचा परिणाम होऊ शकतो. यावर्षी अति पावसामुळे आणि बागेत पाणी साचल्याने द्राक्षाचे घड जिरल्याची समस्या दिसून आली. या संकटातून शेतकरी सावरतोय तोपर्यंत ढगाळ हवामानामुळे संकटात आणखी वाढ झाली आहे.
प्रतिक्रिया
ढगाळ वातावरणामुळे द्राक्षकूज, मणीगळ ही समस्या दिसणार आहे. यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
- चंद्रकांत लांडगे, विभागीय अध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायतदार संघ, सांगली विभाग .
- 1 of 655
- ››