Agriculture news in Marathi Farmers worried about the corn crop | Agrowon

मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुर

टीम अॅग्रोवन
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

अकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या मक्यावर अमेरिकन लष्करी अळी धिंगाणा घालत असून, शेतकऱ्यांना उपाययोजना करण्यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे.

अकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या मक्यावर अमेरिकन लष्करी अळी धिंगाणा घालत असून, शेतकऱ्यांना उपाययोजना करण्यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे.

गेल्या वर्षी कोरडा दुष्काळामुळे चाऱ्याची समस्या निर्माण झाली होती. अनेक शेतकऱ्यांवर गुरे विकण्याची वेळ आली. यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी मक्याच्या लागवडीला पसंती दिली. मक्यावर सुरुवातीपासूनच लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेला दिसून आला. या रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी पैशांची तजवीज करून पेरणी केली. त्यानंतर पेरणी झाली. मक्यासारखे पीक लष्करी अळीमुळे पोखरू लागले आहे.  

असंख्य शेतकऱ्यांनी दोन ते तीन फवारण्या केल्या आहेत. एवढ्यामुळेही अळी नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे काही शेतकरी पोंग्यांमध्ये थेट औषधी टाकण्याचे काम करीत आहेत. फवारणी, पोंग्यात औषध टाकण्यासाठी औषधी, मजुरीचा खर्च वाढत चालला आहे.

मी या वर्षी तीन एकरांत मक्याची लागवड केली आहे. मक्यावर मी आत्तापर्यंत दोन फवारण्या केल्या. लवकरच तिसरी पेरणी करावी लागणार आहे. पण, पाहिजे तेवढा फरक पडलेला दिसत नाही. यासाठी कृषी विभाग, कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी तातडीने मार्गदर्शन करण्याची गरज आहे. या भागात बऱ्याच शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवड केली आहे. चारा आणि उत्पन्न हेतूने शेतकरी मक्याकडे वळला. पण, आता अमेरिकन लष्करी अळीमुळे हतबल झाले आहोत. 
- महादेव गावंडे, मका उत्पादक, बोर्डी, जि. अकोला


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद बाजार समितीत मिरचीची १३०...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
'राज्यातील पोलीस पाटील, ग्रामसेवकांनाही...बुलडाणा : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
उद्धव ठाकरे परिषदेवर जाणार विधानसभेतून...मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव...
मुद्रित माध्यमेच सर्वाधिक विश्‍वसनीय :...नागपूर: कोरोनाविषयी विविध माध्यमे आणि सोशल...
परभणीत पहिल्या दिवशी १७५ किलो...परभणी : कृषी विभागाच्या महाराष्ट्र...
‘कोरोना’च्या सावटातही पैसे काढण्यासाठी...अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटात मदत...
पणन हेल्पलाईनला फोन केला.. अन्‌ ढोबळी...पुणे : पणन मंडळाच्या आंतरराज्य शेतमाल वाहतूक...
बीसीजी लस घेतलेल्यांना कोरोनाचा धोका...पुणे : क्षयरोगाचा (ट्यूबरक्यूलोसिस-टीबी) प्रतिबंध...
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या...मुंबई: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
पुणे विभागात यंदा कमी पाणीटंचाईपुणे : मॉन्सून कालावधीतील दमदार पाऊस,...
कृषिरत्न फाउंडेशनची ‘आधारतीर्थ’तील...नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सध्या...
पुणे विभागात धान्याचा साडेसतरा हजार...पुणे : ‘‘पुणे विभागाात दोन एप्रिल रोजी...
लॉकडाऊनमुळे कृषी यांत्रिकीकरणाचे ९...पुणे: राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण मोहिमेला...
सांगलीतील नागवेलीच्या पानांना मागणी...सांगली : कोरोना विषाणूमुळे परराज्यातून...
कराडमधील ग्राहकांच्या घरी १४० पेट्या...रत्नागिरी : ऐन हंगामात ‘कोरोना’च्या...
पीकविम्याची रक्कम कर्जखात्यांत जमा करू...अकोला : ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर बँकांनी खरीप...
मोफत धान्य देण्यासंदर्भात केंद्राचे...मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या...
‘जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांत ‘सोशल...नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील...
आठवड्याचा अंदाज : ढगाळ हवामानासह...महाराष्ट्रावर हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतके...
आरोग्यदायी लसूणआपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण...