agriculture news in Marathi farmers worry about cloudy weather Maharashtra | Agrowon

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 8 मे 2021

राज्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. शुक्रवारी (ता.७) सकाळपासून मध्य महाराष्ट्र कोकण व मराठवाड्याच्या अनेक भागांत ढगाळ वातावरण तयार झाले होते.

पुणे : राज्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. शुक्रवारी (ता.७) सकाळपासून मध्य महाराष्ट्र कोकण व मराठवाड्याच्या अनेक भागांत ढगाळ वातावरण तयार झाले होते. कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा, नाशिक, नगर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस पडला. त्यामुळे शेतकरी चांगलेच चिंतेत असून पिकांच्या नुकसानीत वाढ होत आहे. 

राज्यात तीन ते चार दिवसांपासून आकाश निरभ्र असल्याने उन्हाचा चटका वाढला होता. तरीही दुपारनंतर अचानक ढगांची दाटी होऊन पाऊस पडत होता. सुरूच आहे. मराठवाडा, खानदेश आणि तळकोकण भागात कमीअधिक स्वरूपात वादळ, वारे, मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. काही ठिकाणी वित्तहानी व जीवितहानी झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. मात्र कालपासून मध्य महाराष्ट्र व परिसरातील अनेक भागांत पावसासाठी ढगाळ वातावरणाची स्थिती तयार झाल्याने कमाल तापमानात चांगलीच घट झाली आहे. 

साताऱ्यातही म्हसवड परिसरात पावसाने हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या. यामुळे द्राक्षे उत्पादकांसमोर आव्हान उभे राहिले आहे. नगर जिल्ह्यातही नेवासा, श्रीरामपूर परिसरात पावसाचे तुटक तुटक थेंब पडले असून कर्जत जामखेड तालुक्यातही पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांपुढे चिंतेचे ढग जमा झाले होते. 

आंबा पिकाला फटका 
सध्या अनेक ठिकाणी आंबा काढणी सुरू आहे. मात्र ढगाळ वातावरण तयार झाल्याने आंब्याचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. तसेच इतर पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. गुरुवारी सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडल्या. रत्नागिरीमधील खेड, संगमेश्‍वर परिसरातही पावसाने चांगलीच हजेरी लावली. यामुळे आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 


इतर अॅग्रो विशेष
तुरळक ठिकाणी मुसळधार शक्य पुणे : कोकणसह राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस...
हा तर मत्स्य दुष्काळाच! जगातील आघाडीच्या ‘ब्लू इकॉनॉमी’मध्ये भारताचा...
कोकण, मराठवाड्यात जोरदार पावसाची हजेरी पुणे : राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला...
पेरणीची घाई नको : कृषी आयुक्तालयपुणेः राज्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर...
मॉन्सूनला पोषक वातावरण पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने प्रवास...
दूध दरातील कापतीने शेतकऱ्यांची परवड औरंगाबाद: महिनाभरातच दुधाच्या दरात तब्बल ११...
पीककर्ज व्याज सवलत योजनेचे पालकत्व...पुणेः शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने तीन...
राज्यातील प्रकल्पांमध्ये केवळ २१ टक्के...पुणे ः मे आणि जून महिन्यात पाण्याची मागणी...
कमी दराने कांदा खरेदी सुरूच नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोयाबीन लागवड क्षेत्रात दहा टक्के...नागपूर : देशात सोयाबीन लागवड क्षेत्र आणि...
दूध दरासाठी गुरुवारी आंदोलन नगर : लॉकडाउनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक...
विद्यापीठाच्या वाणांमुळे शेतकऱ्यांना ९५...नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित...
गांडुळखताचा लोकप्रिय केला शुभम ‘ब्रॅण्ड’सोलापूर जिल्हयातील उपळाई बुद्रूक येथील महादेव...
सिंधुदुर्गमध्ये मुसळधारसिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार...
प्रयोगशील, अभ्यासपूर्ण शेतीचा आदर्शतिडका (जि. औरंगाबाद) येथील युवा शेतकरी ईश्‍वर...
शेतकऱ्यांचे धान बोनसचे १७ कोटी रुपये...चंद्रपूर : गेल्या खरीप हंगामात विक्री केलेल्या...
मॉन्सून उद्या दिल्लीत पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने उत्तरेत...
समुद्रातील माशांचा साठा केवळ ६६ टक्के...रत्नागिरी ः समुद्रातील माशांचा साठा कमी होत असून...
दीडपट हमीभावाचा केंद्राचा दावा फसवा पुणेः किमान आधारभूत किमतीच्या (एमएसपी) माध्यमातून...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याची ...नाशिक : अनेक शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन पेरणीला...