agriculture news in Marathi farmers would not labor of corporate Maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांना धनदांडग्यांचे मजूर होऊ देणार नाही : राहुल गांधी

वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

कॉंग्रेस पक्ष शेतकऱ्यांना धनदांडग्यांचे मजूर होऊ नेणार नाही आणि केंद्रात सत्तेत येताच तीनही कृषी कायदे रद्द करेल असे आश्‍वासन कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी येथे दिली.

लुधियाना, पंजाब: कॉंग्रेस पक्ष शेतकऱ्यांना धनदांडग्यांचे मजूर होऊ नेणार नाही आणि केंद्रात सत्तेत येताच तीनही कृषी कायदे रद्द करेल असे आश्‍वासन कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी येथे दिली. 

लुधियाना येथे केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात रविवारी (ता.४) आयोजित ट्रॅक्टर रॅलीसमोर श्री. गांधी बोलत होते. राहुल गांधी म्हणाले,‘‘अंबानी आणि अदानी यांनी शेतजमीन आणि शेतमालाची खरेदी करावी अशी इच्छा नरेंद्र मोदी यांची आहे. तुम्ही संपूर्ण देशाला अन्न पुरविता आणि आता मोदी तुमचा हमीभाव काढून तुम्हाला अंबानी आणि अदानी यांचे मजूर करण्याच्या तयारी आहेत. तुम्हाला आश्वासित करतो, की भारतातील शेतकऱ्यांना मी त्यांचे मजूर होऊ नेणार नाही. आम्ही आमचे जीवनसंपवू मात्र, भारतीय शेतकऱ्यांना कोणाचेही गुलाम होऊ देणार नाही.’’

श्री. गांधी म्हणाले,‘‘आपण एकत्रितरीत्या या कायद्यांना संपूया. कॉंग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता शेतकऱ्यांबरोबर उभा असेल आणि मी आश्‍वासित करतो, ज्या दिवशी कॉंग्रेस केंद्रात सत्तेत येईल, त्यादिवशी तीनही कृषी कायद्ये आपण फाडून-फेकून देऊ.’’ या तीन कायद्यांवर प्रश्‍न उपस्थित करत राहुल गांधी म्हणाले, की कोरोनाच्या काळात गरिबांना आणि शेतकऱ्यांना एकही रुपयाची मदत न करता, या कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत एवढी घाई का करण्यात 
आली?  

प्रतिक्रिया
जोपर्यंत तीनही कायद्यांमध्ये हमीभाव सक्तीची तरतूद करण्यात येत नाही, तोपर्यंत त्यांनी दिलेल्या आश्‍वासनांचा काहीच उपयोग होणार नाही.
-अमरिंदर सिंग, मुख्यमंत्री, पंजाब

अमेरिकेत अपयशी ठरलेली व्यवस्था भारतातील शेतकऱ्यांवर लादण्याचा प्रकार केला जात आहे. भांडवलशाह हा देश चालवत आहेत. शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या मदतीला अनुदान म्हटले जाते आणि श्रीमंतांना देण्यात येणारी मदत ही प्रोत्साहन निधी म्हटले जाते.
- नवज्योतसिंग सिद्धू, आमदार, पंजाब


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...
उत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...
तुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...
चिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...
फळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
चार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...
राज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...