agriculture news in Marathi farming and allied activity through self help group Maharashtra | Agrowon

महिला बचत गटाच्या माध्यमातून शेती, पूरक व्यवसायाला चालना

टीम अॅग्रोवन
रविवार, 8 मार्च 2020

नांदेड ः जिल्ह्यातील महिला स्वंयसहाय्यता गटांच्या माध्यामातून पुदिना शेती, फुलशेती, भाजीपाला शेती तसेच शेळीपालन, दुग्ध व्यवसाय आदी पूरक व्यवसायाला चालना मिळाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना उपजीविकेसाठी मोठा आधार मिळाला आहे. उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाल्यामुळे महिला आत्मनिर्भर झाल्या आहेत, अशी माहिती जिल्हा समन्वयक चंदनसिंह राठोड यांनी दिली.

नांदेड ः जिल्ह्यातील महिला स्वंयसहाय्यता गटांच्या माध्यामातून पुदिना शेती, फुलशेती, भाजीपाला शेती तसेच शेळीपालन, दुग्ध व्यवसाय आदी पूरक व्यवसायाला चालना मिळाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना उपजीविकेसाठी मोठा आधार मिळाला आहे. उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाल्यामुळे महिला आत्मनिर्भर झाल्या आहेत, अशी माहिती जिल्हा समन्वयक चंदनसिंह राठोड यांनी दिली.

महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत नांदेड जिल्ह्यात तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सबलीकरण योजना, अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, वॅाटर, ई शक्ती अभियान या योजना राबविण्यात येतात. जिल्ह्यात आजवर ३ हजार ६०५ महिला स्वंयसहायता बचत गट स्थापन करण्यात आले आहेत. महिला सदस्याची संख्या ३९ हजार २१० एवढी आहे. 

महिला बचत गटांनी आजवर १९ कोटी ६ लाख रुपये एवढ्या रकमेची बचत विविध बॅंकामध्ये केली आहे. सर्व बचत गटांकडून अंतर्गंत कर्जाची देवाणघेवाण केली जात असून आजवर ११९ कोटी १५ लाख रुपयाचे अंतर्गत कर्जवाटप करण्यात आले. या कर्जाच्या परतफेडीचे प्रमाण ९६ टक्के आहे. विविध व्यवसाय, उद्योग करण्यासाठी बॅंकाकडून एकूण ८३ कोटी ४० लाख रुपये एवढे कर्ज वितरित करण्यात आले असून बॅकांच्या कर्जाची परतफेड करण्याचे प्रमाण ९९ टक्के आहे.

महिला सक्षमीकरण आणि सामाजिक समता उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या १५ सदस्य सरपंच तर ६९ महिला ग्रामपंचायत सदस्य आहेत. ३५ कायदा साथी, २५ महिला हक्क दर्शक साथी, तंटामुक्त समित्यामध्ये ३७ महिला सहभागी आहेत. जिल्ह्यातील २० गावांमध्ये घर दोघांचे अभियान राबविले जात आहे. १५३ गावांमध्ये मुलींच्या जन्माचे स्वागत हा कार्यक्रम राबविण्यात आला. लक्ष्मीमुक्ती अभियानांतर्गत १५० महिलांची नावे ७-१२ उताऱ्यावर लावण्यात आली.

गटांकडून शेतीतही प्रयोग
मेदनकल्लूर (ता. देगलूर) येथील प्रत्येकी एक एकर क्षेत्रावर पुदिनाचे उत्पादन घेत आहेत. नाळेश्वर येथील महिला बचत गटांच्या १५ सदस्यांनी १५ एकरवर फुलशेती सुरू केली आहे. नांदेड येथील मार्केटमध्ये फुलांची विक्री केली जाते. जिल्ह्यातील वेगवेळ्या ठिकाणी १०३ महिलांनी १२५ एकरवर भाजीपाला लागवड केली आहे. मुजळगा येथील एक महिला १ एकर क्षेत्रावर आल्याचे उत्पादन घेत आहे. 

पूरक व्यवसायातही पुढाकार 
शेतीपूरक व्यवसायामध्ये ५७५ महिलांनी शेळीपालन व्यवसाय सुरू केला आहे. ३ महिला बचत गटांनी हंगामनिहाय कृषी निविष्ठा विक्री केंद्र सुरू केले आहे. २९ गावांमध्ये ढेप विक्री केंद्र सुरू करण्यात आले. सरसम येथील एका महिला गटाचे देशी गायीच्या दुधापासून खवानिर्मितीचे केंद्र आहे. धर्माबाद येथे एका गटाचे मसालानिर्मिती उद्योग आहे तर नाळेश्वर येथील एक गटाने मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला आहे. भुसार माल खरेदी विक्री करणाऱ्या महिला बचत गटांची संख्या १५ आहे असे राठोड यांनी सांगितले.


इतर महिला
पूरक उद्योगातून मिळाली आर्थिक साथपरभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावातील झाडे...
आरोग्यदायी फणसवरून काटेरी पण आतून गोड.. असे म्हटले की फणस हे फळ...
गटामुळे मिळाली शेती, पूरक उद्योगाला...  टाकळीमिया (ता. राहुरी, जि. नगर) येथील...
अजीर्ण, अपचनावर गुणकारी बडीशेपकोणताही सण, समारंभ आणि घरगुती कार्यक्रमाच्या...
नाचणी प्रक्रियेतून मिळवली आर्थिक समृद्धीकोकणात भातशेतीबरोबर नाचणीची लागवड मोठ्या प्रमाणात...
गुणकारी कोकमकोकम सरबतामुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत होते....
महौषधी जिरेस्वयंपाकात, पदार्थात, मसाल्यात उपयुक्त असणारे...
किरकोळ आजारांकडे नको दूर्लक्षमहिलांनी घराकडून शेताकडे जाताना चेहऱ्यावर पदर...
आरोग्यदायी ज्येष्ठमधसमस्त महिलावर्गासाठी ज्येष्ठमध काही नवीन नाही....
कुक्कुटपालन, परसबागेने दिली आर्थिक साथचिंचघरी (ता.चिपळूण,जि.रत्नागिरी) येथील अंजली...
महिलांमध्ये तयार झाली स्वयंरोजगाराची ‘...ग्रामीण भागातील महिलांना छोट्या उद्योगातून रोजगार...
आरोग्यदायी कलिंगडकलिंगडात जीवनसत्त्व अ आणि क भरपूर प्रमाणात असून...
शेतीमधील ‘विमेन चॅम्पियन'पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि नाशिक जिल्ह्यातील...
आरोग्यदायी हळदस्वयंपाकात तसेच कोणत्याही धार्मिक कार्यात हळद फार...
औषधी, आरोग्यवर्धित द्राक्षद्राक्षाचे आरोग्यदायी दृष्टीने अनेक फायदे आहेत....
आरोग्यदायी लसूणआपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण...
वाढवा प्रतिकार क्षमतासध्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे....
मुलींना मिळाली जिल्हाधिकारी, पोलिस...बुलडाणा  ः राज्यात जागतिक महिला दिनानिमित्त...
सुनंदाताई भागवत बनल्यात शेकडो मुलींचा...नगर ः त्यांच्या घरची परिस्थिती सर्वसामान्य. मात्र...
राज्यातील चौदा टक्के शेतीक्षेत्राची ‘ती...पुणे: एकविसाव्या शतकात सर्वच क्षेत्रांत महिलांचा...