कळवणच्या शेतीमालाची निर्यात होणार सुलभ

कळवणच्या शेतीमालाची निर्यात होणार सुलभ
कळवणच्या शेतीमालाची निर्यात होणार सुलभ

कळवण, जि. नाशिक  : कळवण निर्यात सुविधा केंद्राला केंद्र सरकारच्या अपेडा या व्यापार मंत्रालयांतर्गत येणाऱ्या प्राधिकरणाची मान्यता प्राप्त झाली आहे. आता या केंद्रावरून थेट निर्यात शक्य होणार आहे.

कळवण तालुक्यातील भेंडी येथे केंद्र व राज्याच्या निधीतून पणन महामंडळामार्फत अंदाजे २० कोटी रुपयांचे निर्यात सुविधा केंद्र व शीतगृहाची निर्मिती झाली. एक्स्प्रेस फीडरअभावी (विद्युत) हे केंद्र धूळ खात पडून होते. मात्र, कळवण शेतकरी सहकारी संघाच्या पाठपुराव्यामुळे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख व पणनचे नवनियुक्त कार्यकारी संचालक सुनील पवार यांच्या माध्यमातून सर्वच उणिवांची पूर्तता झाली. त्यानंतर नोव्हेंबर गेल्या वर्षी या युनिटचा लोकार्पण सोहळा झाला. शेतमाल निर्यात व विक्रीबाबत शेतकरी, व्यापारी वर्गाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या या प्रकल्पातून काही ठिकाणी निर्यात करणे शक्य झाले. आता युरोप, अमेरिकासारख्या प्रगत देशांतही या निर्यात सुविधा केंद्रातून शेतमाल निर्यात होणे सुलभ झाले आहे.

सुनील पवार म्हणाले, की अपेडा मान्यताप्राप्त सुविधा केंद्रातून कंटेनर भरल्यास प्लँट क्वारंटाईन अधिकारी प्रमाणपत्र देतात. युरोप, अमेरिकेत माल थेट पाठवायचा असल्यास कंटेनर अशा मान्यताप्राप्त निर्यात केंद्रातून भरून येणे आवश्यक असते. यापूर्वी केवळ छोट्या देशातच मालाची निर्यात करता येत होती. अपेडाच्या चमनेू दोन वेळा निर्यात केंद्राला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी सुचविलेले सर्व बदल राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांनी करून दिले. त्यानंतर काटेकोर परीक्षण करून केंद्र सरकारने ही मान्यता दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com