'थेट शेतीमाल विक्रीमुळे गावाचे उत्पन्न वाढते'

शेतकऱ्यांकडून थेट माल खरेदीला प्राधान्य राहील. तसे खडकेश्वरा समूहाचे धोरण आहे. त्यासाठीचे सर्व सहकार्य पुरवले जाईल. - संजय नळगीरकर, संचालक मराठवाड्यातील शेतकरी कंपन्यांना एकत्र आणून संपूर्ण महाराष्ट्रात थेट मका पुरवठ्याचे उदिष्ट आहे. त्यासाठी शेतकरी कंपन्यांनी संपर्क करावा." - भारत सपकाळ, संचालक, करमाड फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, जि. औरंगाबाद
'थेट शेतीमाल विक्रीमुळे गावाचे उत्पन्न वाढते'
'थेट शेतीमाल विक्रीमुळे गावाचे उत्पन्न वाढते'

करमाड, जि. औरंगाबाद : थेट शेतीमाल खरेदीमुळे गावातच पायाभूत सुविधा तयार होतात. शेतकऱ्यांचे व पर्यायाने गावाचे उत्पन्न वाढते. शेतकरी व एंड युजर्स या दोन्ही घटकांसाठी थेट खरेदी-विक्री लाभदायी ठरते, असा सूर ''थेट मका व बाजरी पोच'' कार्यशाळेत निघाला. 

शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून पोल्ट्री व फीड्स कंपन्यांना थेट मका व बाजरी पुरवठा या विषयावर करमाड येथे मंगळवारी (ता. १०) करमाड फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या प्रांगणात कार्यशाळा पार पडली. 

औरंगाबादस्थित खडकेश्वर पोल्ट्री समूहातील अधिकऱ्यांनी शेतकरी कंपन्यांच्या प्रतिनिधींना व्यापारविषयक संधीबाबत प्रशिक्षित केले. शेतातून मका व बाजरीचा पुरवठा हा पोल्ट्री व फीड्स एंड युजर्सच्या गेटपर्यंतची सर्व प्रक्रिया अधिकाऱ्यांनी समजावून सांगितली. गुणवत्ता, वाहतूक, पेमेंट, सातत्यपूर्ण व्यापार आदींबाबत शेतकरी कंपनीच्या प्रतिनिधींना माहिती देण्यात आली.

खडकेश्वर समूहाचे संचालक संजय नळगीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली खडकेश्वर फीड्सचे न्यूट्रिशनिष्ट डॉ. सुनील चव्हाण, खरेदी विभागाचे सहायक सरव्यवस्थापक संतोष कंधारकर यांच्यासह दिलीप इंगळे, बाबासाहेब काळे, भास्कर गाडेकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. करमाड फार्मर्स प्रोड्यूस कंपनीचे संचालक भारत सपकाळ यांच्या संयोजनातून १५ शेतकरी कंपन्यांच्या सदस्यांनी सहभाग घेतला.

या कार्यशाळेसाठी 'इंडियन सोसायटी ऑफ अॅग्री बिझनेस प्रोफेशनल्स'ने (आयसॅप) नेटवर्किंग इनिशिएटर' म्हणून काम पाहिले. 'करमाड एफपीसी'चे संचालक विष्णू घोडके, गोविंद डिके, कार्यकारी अधिकारी जयदीप देशमुख यांनी कार्यशाळा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com