रस्त्याच्या कामामुळे शेतकऱ्याची विहीर भुईसपाट

रस्त्याच्या कामामुळे शेतकऱ्याची विहीर भुईसपाट
रस्त्याच्या कामामुळे शेतकऱ्याची विहीर भुईसपाट

वर्धा  ः सेलडोह-सिंदी महामार्गाच्या रुंदीकरण आणि सिमेंटीकरणाच्या कामात नाल्याच्या पाण्याला वाट मिळाली नाही. परिणामी, नाल्याचे पाणी शेतात घुसून पीक खरडून गेले, विहीरही खचली. याची भरपाई मिळावी, अशी मागणी संबंधित शेतकऱ्याने शासनाकडे केली आहे.  गेल्या दीड वर्षापासून सेलडोह-सिंदी रस्त्याचे रुंदीकरण आणि सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. एम. डी. पाटील ग्रुप ऑफ कंपनीमार्फत हे काम होत आहे. या कंत्राटदाराने २० मे २०१९ रोजी पोकलेनने शेतकरी रामकृष्ण आणि संजय बोंगाडे यांच्या मौजा डोरली शेत सर्व्हे क्रमांक ३५ लगत खोदकाम केले. नाल्यावरील पुलाच्या कामासाठी हे खोदकाम करण्यात आले. मात्र, खोदकामादरम्यान निघालेली माती निष्काळजीपणे चुकीच्या ठिकाणी टाकण्यात आली. त्यामुळे वीस फूट उंच मातीचा ढीग लागला. पावसाळ्यात नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याला मार्ग न मिळाल्याने श्री. बोंगाडे यांच्या शेतातून हे पाणी वाहिले. यात श्री. बोंगाडे यांचे ७२ आर. क्षेत्रातील सोयाबीन आणि तूर पीक पूर्णपणे खरडून गेले. एवढेच नाही तर शेतातील जुनी विहीरसुध्दा भुईसपाट झाली. कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा त्यांचा आरोप आहे. याप्रकरणी भरपाईसाठी त्यांनी सेलू तहसीलदार, कृषी अधिकारी पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती सभापती, सिंदी पटवारी कार्यालय, सेलडोह ग्रामसेवक यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर शासकीय यंत्रणेकडून पंचनाम्याचा सोपस्कार पार पाडण्यात आला. परंतु, अद्यापही भरपाईसाठी कोणत्याच प्रकारची हालचाल झाली नाही. या घटनेत सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी बोंगाडे सांगतात. संबंधित कंत्राटदाराकडून याची वसुली व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com