agriculture news in marathi, farmlands damage due to rain, nagar, maharashtra | Agrowon

अतिपावसाने नगरमधील शेतजमिनी चिबडल्या

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

नगर  : अतिपावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जास्त पावसामुळे शेतजमिनी उपळल्या आहेत. त्यामुळे पावसाने विश्रांती देऊनही रब्बी ज्वारीसह अन्य पिकांची पेरणी करण्यासाठी वापसा नसल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे या जमिनींमध्ये रब्बी पिकांचे नियोजन करायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. वेळेत वाफसा झाला नाही, तर रब्बीतील कामे लांबण्याची शक्‍यता आहे. 

नगर  : अतिपावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जास्त पावसामुळे शेतजमिनी उपळल्या आहेत. त्यामुळे पावसाने विश्रांती देऊनही रब्बी ज्वारीसह अन्य पिकांची पेरणी करण्यासाठी वापसा नसल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे या जमिनींमध्ये रब्बी पिकांचे नियोजन करायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. वेळेत वाफसा झाला नाही, तर रब्बीतील कामे लांबण्याची शक्‍यता आहे. 

नगर जिल्ह्यामधील सर्वच तालुक्यांत मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप व रब्बीतील पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसाने ओढे, नाले वाहते तर विहिरी, तलाव तुडुंब भरले आहेत. उभ्या पिकांत पाणी साठल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असली, तरी अतिपावसाने जमिनीत पाणीसाठा वाढल्याने हे पाणी बाहेर पडू लागले आहे. या उपळलेल्या शेतजमिनीवर असलेली पिके, चारा सडून गेली आहेत.  

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अकोले तालुक्‍यात मॉन्सूनोत्तर पावसाने हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन, बाजरी, भुईमूग, मका, भाजीपाला, तसेच भात आदी ७० ते ८० टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. त्यापैकी ६० टक्के पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यासाठी कृषी सहायक, तलाठी आणि ग्रामसेवक यांची त्रिस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीकडून पंचनामे सुरू असून, उर्वरित पंचनामे दोन दिवसांत पूर्ण होतील. जमिनीत पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर टिकून असल्याने काही जमिनी उपळल्याने रब्बी हंगाम सुमारे महिनाभर लांबण्याची शक्‍यता आहे. त्यात पावसाने उघडीप दिल्याने काही ठिकाणी शेतकऱ्यांनी रब्बीची मशागत सुरू केल्याचे दिसून येत आहे. चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे आता रब्बीची पेरणी करायची आहे, पण वापसा नसल्याने अनेक ठिकाणी पेरणी करता येत नसल्याची स्थिती आहे.


इतर ताज्या घडामोडी
मधमाशीला हानिकारक कीटकनाशके टाळा : आर....‌अंबाजोगाई : ‘‘शेतकऱ्यांनी मधमाश्यांच्या जाती...
परभणी जिल्ह्यात साडेसहा हजारांवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात...
सोलापूर : कांदा लिलाव बंद पाडण्याचा डाव...सोलापूर : सोलापूर बाजार समितीमध्ये गेल्या काही...
कोल्हापूर : शेती, घरांच्या नुकसानीसाठी...कोल्हापूर : जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि...
विज्ञान, अध्यात्माच्या ताकदीने देश विश्...कुंडल, जि. सांगली :  ज्ञान, विज्ञान, संगणक व...
संत्र्याचे विपणनाचे जाळे विणण्याची गरज...अमरावती  ः सांघिक तत्त्वावर संत्रा...
फडणवीसांविरोधात पक्षांतर्गत नाराजांची...मुंबई ः भाजपवर विरोधी पक्षात बसण्याची नामुष्की...
कृषी पदवीधर तरूणांनी समाजासाठी काम...नगर : ‘‘देशात प्रामाणिकपणे काम केलेले अनेक शेतकरी...
फडणवीस सरकारची ३१० कोटींची हमी रद्द...मुंबई ः शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र...
आचारसंहितेपूर्वीच्या निर्णयांची...मुंबई ः विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू...
पुणे जिल्ह्यात भातकाढणी अंतिम टप्प्यातपुणे ः पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी...
पश्‍चिम महाराष्ट्रात...पुणे ः पश्‍चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि...
सातारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना...कऱ्हाड, जि. सातारा ः राजकीय पक्षांचा आदर्श घेऊन...
नगर जिल्ह्यात रोजगार हमीच्या कामावर सात...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये आता रोजगार हमी योजनेच्या...
चंद्रशेखर भडसावळे यांना मार्टचा ‘फादर...खडकवासला, जि. पुणे : कृषी पर्यटन संकल्पनेचे...
देशी कापूस संशोधन केंद्राचा उद्या...परभणी: वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या...
गांडूळखत अर्क निर्मितीसेंद्रिय शेतीमध्ये गांडुळे व गाडूळखताचे मोठे...
राज्यात काकडीला ५०० ते २००० रुपये दरअकोला येथील बाजारात गुरुवारी (ता. ५) काकडीची...
मंत्रिमंडळाचा विस्तार २१ डिसेंबरनंतरचमुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २१...
केंद्राने कांदा साठवणूक मर्यादा ५०...नाशिक : गेल्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस...