मराठवाड्यात ४१ हजारांवर शेततळी पूर्ण

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद : कोरडवाहू जमिनीला संरक्षित पाणी देण्याची सोय व्हावी म्हणून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी मागेल त्याला शेततळे योजनेतून २०१६-१७ ते २०१८-१९ या कालावधीत ४१ हजारांवर शेततळी केली आहेत. या महिन्याच्या मध्यापर्यंत यापैकी ३८ हजारांवर शेततळ्यांसाठी अनुदानाचे वाटपही करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.  

दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाड्यात कृषी विभागाच्यावतीने शेततळेनिर्मितीच्या योजनेला गती देण्यात आली होती. मागेल त्याला शेततळे योजनेतून ४६ हजार १०० शेततळेनिर्मितीचा लक्ष्यांक देण्यात आला होता. त्या तुलनेत कृषी विभागाच्या संबंधित यंत्रणेकडे १ लाख २८ हजार ८७२ शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले होते. प्राप्त अर्जापैकी १ लाख ३ हजार ४८८ अर्जांना मंजुरी देण्यात आली होती. मंजुरी दिलेल्या एकूण अर्जापैकी ९७ हजार ३५९ शेततळ्यांना प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश देण्यात आले. त्यापैकी ८७ हजार ९०१ शेततळ्यांची प्रत्यक्ष आखणी करून देण्यात आली. आखणी करून देण्यात आलेल्या शेततळ्यांपैकी ४१ हजार ८५९ शेततळे प्रत्यक्षात पूर्ण झाली असून ८७० शेततळ्यांची कामे सुरू आहेत. 

३८ हजार ८३२ शेतततळ्यांना अनुदान वितरित मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत प्रत्यक्षात पूर्ण झालेल्या ४१ हजार ८५९ शेततळ्यांपैकी ३८ हजार ८३२ शेततळ्यांना अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. २०१६-१७ व २०१८-१९ या कालावधीत शेततळ्यांचे अनुदान वितरित करण्यासाठी मराठवाड्याला १९१ कोटी १९ लाख ३५ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी १८४ कोटी ३ हजार रुपयांचा निधी अनुदानापोटी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

३०२७ शेततळ्यांचे अनुदान बाकी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ३०२७ शेततळ्यांना अनुदान मिळणे बाकी आहे. त्यामध्ये औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांतील २५०५ तर लातूर,  उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांतील ५२२ शेततळ्यांचा समावेश आहे.   

जिल्हानिहाय पूर्ण झालेली शेततळी
जिल्हा  शेततळ्यांची संख्या
औरंगाबाद १२,४८४
जालना  ७६०१
बीड ७८८५
लातूर २२६२
उस्मानाबाद   ३३५२
नांदेड   २२३७
परभणी   २७३१
हिंगोली   ३३०७
अनुदानवाटप झालेल्या शेततळ्यांची संख्या  
औरंगाबाद  ११,३४२
जालना ७१७५
बीड  ६९४९
लातूर  २२२४
उस्मानाबाद ३२७७
नांदेड २१४१
परभणी २५३७
हिंगोली ३१८८
अनुदान बाकी असलेल्या शेततळ्यांची संख्या
औरंगाबाद   ११४२
जालना ४२६
बीड    ९३७
लातूर ३८
उस्मानाबाद   ७५
नांदेड ९६
परभणी  १९४
हिंगोली  ११९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com