साताऱ्यात मागेल त्याला शेततळे योजनेस मिळतोय कमी प्रतिसाद

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा  ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस जिल्ह्यात मागील एप्रिल, मे महिन्यापासून प्रतिसाद काहीसा कमी झाला आहे. तापमानवाढीचा हा परिमाण असल्याचे बोलले जात आहे. योजनेतून जिल्ह्यात १७०२ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, एका महिन्यात एकही शेततळे पूर्ण झाले नाही.

जिल्ह्याच्या पूर्व भागात तीव्र दुष्काळी स्थिती आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शेततळे हा प्रभावी उपायांपैकी एक आहे. संरक्षित पाणीसाठा करण्यासाठी शेततळे फायदेशीर असल्याने जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी शेततळे उभारणे आवश्यक आहे. यासाठी राज्य शासनाने फेब्रुवारी २०१६ मध्ये मागेल त्याला शेततळे ही योजना जाहीर केली आहे. या योजनेतून जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे ५९११ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये ४६६० अर्ज पात्र; तर १२११ अर्ज अपात्र ठरले असून, ६० अर्जांच्या छाननीचे काम सुरू आहे. पात्र अर्जापैकी ४०५२ अर्जांना मंजुरी देण्यात आली. ३१९४ शेततळ्यांची आखणी करून दिली आहे. गेल्या एक महिन्यापासून २९ शेततळ्यांची कामे सुरू आहेत. या व्यतिरिक्त नवीन शेततळ्यांची कामे ठप्पे झाली आहे. उष्णतेत झालेली वाढ, अपुरे पर्जन्यमान आदी कारणास्तव नवीन शेततळे खोदाईकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.

सध्या जिल्ह्यात १७०२ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. १७ एप्रिललाही जिल्ह्यात १७०२ शेततळी पूर्ण झाली होती. आजही तोच आकडा कायम आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शेततळे योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असतानाही तिच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.      तालुकानिहाय शेततळ्यांची पूर्ण झालेली कामे : सातारा १०८, कोरेगाव २४७, खटाव २५१, माण ३५५, फलटण ३१७, वाई ७५, खंडाळा १०५, महाबळेश्वर ११, जावली १७, पाटण ५४, कऱ्हाड ११७.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com