पावसामुळे शेतरस्त्यांची अवस्था दयनीय

मी तीन एकर क्षेत्रात मुगाची पेरणी केली होती. सततच्या पावसामुळे शेतरस्ते खराब झाल्याने पीक घरी आणता आले नाही. त्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक गेल्याने दिवाळी सण कसा साजरा करावा हा मोठा प्रश्‍न समोर उभा झाला आहे. - गजानन दामोदर, शेतकरी, तरोडा, अकोला
पावसामुळे शेतरस्त्यांची झालेली दुरवस्था
पावसामुळे शेतरस्त्यांची झालेली दुरवस्था

तरोडा, जि. अकोला  ः अकोट तालुक्यातील तरोडा येथील अनेक शेतरस्ते व पाणंद रस्त्यांची सततच्या पावसामुळे दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे तरोडासह परिसरातील शेतरस्ते चांगले नसल्याने शेतकऱ्यांना शेतातील शेततीमाल घरी आणण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यांना आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे. अपुऱ्या निधीमुळे रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकत नसल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

येथील शेतकरी गजानन दामोदर यांनी आपल्या तीन एकर क्षेत्रात मूग पिकाची पेरणी केली होती. पण, सततच्या पावसामुळे त्यांच्या शेतात जाणारा शेतरस्ता पूर्ण खराब झाला आणि शेतात जाण्याचा मार्ग बंद झाला. त्यामुळे बैलगाडी, ट्रॅक्टर शेतात जात नसल्याने मुगाचे पीक घरी आणता आले नाही. दामोदर यांच्या तीन एकरांतील पूर्ण पिकाचे नुकसान झाले. परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पिकासह शेतात जाणाऱ्या शेतरस्त्यांची अवस्था बिकट झाली.  ग्रामपंचायतीने अनेकवेळा वरिष्ठांकडे लेखी निवेदन देऊन रस्त्यांची कामे करण्याची विनंती केली. परंतु, त्यांनी देखील याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येथील तरोडा ते मुंडगाव- मरोडा शेतरस्ता, तरोडा ते पनोरी याच मार्गांवर मोठ्या प्रमाणात शेतीक्षेत्र आहे. परंतु, शेतरस्ता व्यवस्थित नसल्याने शेतकऱ्यांना शेतीमाल घरी आणणे कठीण झाले. आता सोयाबीनचा हंगाम सुरू आहे. सोयाबीन, ज्वारी पिकाची काढणी करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात जाता-येत नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com