कोल्हापुरात रंगला म्हशींचा फॅशन शो

कोल्हापुरात रंगला म्हशींचा फॅशन शो
कोल्हापुरात रंगला म्हशींचा फॅशन शो

कोल्हापूर : शहर व परिसरात पाडव्यानिमित्त म्हशींच्या फॅशन स्पर्धेची धूम राहिली. गवळी गल्ली, कसबा बावडा, पाचगाव आदी ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणचे शेतकरी पाडव्याच्या मुहूर्तावर म्हैशींना सजवून एक प्रकारे फॅशन शो आयोजित करतात.

या अनोख्या स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी शेतकरी सकाळी आपल्या म्हशीला गरम पाण्याने अंघोळ घालतात. त्यानंतर त्यांना सजवून या स्पर्धेत भाग घेतात. अनेक शेतकऱ्यांच्या सजलेल्या म्हशी या स्पर्धेत सहभागी होतात. म्हशींच्या अंगावर वेगवेगळ्या प्रकारची कलाकुसर काढण्यात येते, तर काहीजण वेगवेगळ्या रंगांची चित्रे काढतात. डोक्यावर शिंगे आकर्षक रंगांनी रंगवली जातात.

तसेच नक्षीदार वस्त्र, गळ्यात फुलांच्या माळा घातल्या जातात. म्हशींना आवाज दिल्यावर त्या किती प्रतिसाद देतात, याची प्रचितीच या वेळी येते. सुंदरी, राधा, हौसा यासारख्या नावाने परिचित म्हैशी पाडव्यानिमित सजून आपल्या मालकाबरोबर स्पर्धेत सहभागी होतात. ही आगळी-वेगळी स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होते.

सुगीची कामे आटोपल्यानंतर बळीराजाला विरंगुळा म्हणून देखील या स्पर्धेकडे पाहिले जाते. शेतीच्या उत्पन्नाबरोबर दुग्धव्यवसायावर शेतकऱ्यांची आर्थिक मदार असते. यामुळे या दिवसांमध्ये जनावरांची खास बडदास्त ठेवून त्यांचे औक्षणदेखील करण्यात येते. दिवसभर स्पर्धेच्या निमित्ताने या भागाचा उत्साहाचा माहोल कायम होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com