agriculture news in Marathi fast agitation in state Maharashtra | Agrowon

अन्नदात्यासाठी राज्याभरात किसानपुत्रांचे अन्नत्याग आंदोलन

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 मार्च 2020

पुणे ः शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांविषयी चिंता व शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने गुरुवारी (ता.१९) राज्यासह देशात आणि विदेशातही ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन’ करण्यात आले. 

किसानपुत्र आंदोलनाचे कार्यकर्ते अमर हबीब म्हणाले, की देशात कोरोना व्हायरसच्या निमित्ताने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ह्या कारणास्तव सार्वजनिक उपवास करण्याऐवजी वैयक्तिक उपवास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किसानपुत्रांनी एक दिवसाचा उपवास धरून यामध्ये सहभागी झाले आहेत.

पुणे ः शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांविषयी चिंता व शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने गुरुवारी (ता.१९) राज्यासह देशात आणि विदेशातही ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन’ करण्यात आले. 

किसानपुत्र आंदोलनाचे कार्यकर्ते अमर हबीब म्हणाले, की देशात कोरोना व्हायरसच्या निमित्ताने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ह्या कारणास्तव सार्वजनिक उपवास करण्याऐवजी वैयक्तिक उपवास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किसानपुत्रांनी एक दिवसाचा उपवास धरून यामध्ये सहभागी झाले आहेत.

प्रामुख्याने औरंगाबाद, जालना, जळगाव, पुणे, बुलढाणा अशा अनेक जिल्ह्यांतील नागरिक सहभागी झाले होते. बांधिलकीला
बळ द्यावे, समाजमध्ये जागृती निर्माण व्हावी, सरकारने शेतकरी विरोधी कायदे रदद् करावेत, व्यक्तीगत शेतकऱ्याविषयीची बांधिलकी बळकट व्हावी, या हेतूने अन्नत्याग केला आहे. 

‘‘या आंदोलनाची सुरुवात २०१७ मध्ये साहेबराव करपे यांच्या मुळगावी चिलगव्हाण (यवतमाळ) येथून सुरुवात झाली. दुसऱ्या वर्षी साहेबराव करपे यांनी आत्महत्या केलेल्या पवनार (वर्धा) येथे, तर तिसऱ्या वर्षी महात्मा गांधी समाधी असलेल्या राजघाट (दिल्ली) येथे अन्नत्याग केले आहे.

यंदा हे चौथे वर्ष असून ते पुण्यातील महात्मा फुले यांना अभिवादन करून अन्नत्याग केले आहे. यामध्ये शेतकरीप्रश्री काम करत असलेल्या विविध संघटनाही सहभागी झाल्या आहेत,’’ असेही श्री. हबीब यांनी सांगितले. 

किसानपुत्र आंदोलनातर्फे करण्यात आलेल्या अन्नदात्यांसाठी अन्नत्याग आंदोलनात नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील विविध ठिकाणचे शेतकरी, संघटनांचे कार्यकर्ते आदी वैयक्तिक उपवास ठेवत या आंदोलनात सहभागी होते.

अकोल्यातील शेतकऱ्यांनी उपवास करत आंदोलन केले. आत्महत्यांच्या प्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने गुरुवारी (ता. १९) ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ करण्यात आला. येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कार्यकर्त्यांनी दिवसभर आंदोलन केले.

शहरातील गांधी जवाहर पार्कमधील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलन सुरू करण्यात आले. या वेळी अविनाश नाकट, विलास ताथोड, धनंजय मिश्रा, डॉ. नीलेश पाटील, कृष्णा अंधारे, जगदीश मुरुमकर, ज्ञानेश्‍वर गावंडे, मनोज तायडे, दीपक गावंडे, अजय गावंडे यांच्यासह इतर उपस्थित होते. यानंतर कार्यकर्त्यांनी दिवसभर आपापल्या ठिकाणी वैयक्तिक उपवास केला. 

वागद (ता. महागाव, जि.यवतमाळ) येथे सरपंच छाया खंदारे, खामवाडी ब्रह्मी सरपंच रामराव चव्हाण, मनीष जाधव, फकिरा पवार, साक्षी जाधव, अभिनव जाधव यांनी आंदोलन केले. अन्नत्याग आंदोलनाच्या सुरुवातीला साहेबराव करपे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...